• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
February 2, 2023
in वात्रटायन
0

भगतसिंह कोश्यारी

राजभवन असले तरी
तुरुंगासारखे भासले मला
कधी तिथून सुटका होते
जीवच माझा घुसमटला

आता सगळे पाठी लागले
हाकला त्या धोतरवाल्याला
थोर नेत्यांची उडवून खिल्ली
लाज आणली महाराष्ट्राला

मोदींपाशी व्यक्त केली
माझ्या मनाची अवस्था
गरज सरो वैद्य मरो
हीच भाजपची व्यवस्था

—– —– —–

एकनाथ शिंदे

कोकिळेला कंठ फुटतो
तसा मला कंठ फुटला
मोदीभक्तीचे नकली गाणे
गाऊन माझा घसा सुकला

मी तर मोदींचाच माणूस
गद्दारी पाहून दिली संधी
कित्ती मोठे मनही त्यांचे
मी भाजपला देईन बुंदी

डबल नव्हे ट्रिपल इंजीन
लावू भाजप-रेलगाडीला
मोदीमय मी झालो आता
सफेद डाय फासू दाढीला

—– —– —–

नरेंद्र मोदी

फेरीवाले, टपरीवाले
मजुरांनाही आमची हाक
देऊ तुम्हाला मागाल ते ते
फक्त मते द्या नव्वद लाख

मुंबई-पालिका सत्तेसाठी
केलाय आम्ही निर्धार पक्का
तरीही भीती वाटते मनात
मुंबईकर देतील का बुक्का?

दाढीवाल्यांना धरून हाताशी
शिवसेनेत मी पाडली फूट
लाळघोट्यांना कळलेच नाही
घरफोडीचे सफेद झूठ

—– —– —–

देवेंद्र फडणवीस

हरभर्‍याच्या झाडावर चढवून
मोदींनी त्यांना केले मामा
आवळा देऊन कोहळा काढतील
येणार नाही कुणीही कामा

सभेत दाखवून त्यांची जागा
दाखवलाय मी माझा हिसका
चार दिवसांचा नखरा त्यांचा
कळेल जगाला बार हा फुसका

ज्यांच्या जीवावर झाले मोठे
त्यांनाच मारून आले लाथ
जनता ओळखून आहे त्यांना
कधी कुणाचा करतील घात

—– —– —–

सच्चे शिवसैनिक

केवळ स्वार्थासाठी घुसले
भुंग्यासारखे ते कमळात
मोदी चालीसा गाऊन दमले
आता अडकतील ते चिखलात

अंगापेक्षा बोंगा मोठा
गर्वाचे घर नेहमीच खाली
आता मोठ्या बाता सांगतात
पूर्वी हिंमत का नाही झाली?

बाळासाहेबांचे घालून मुखवटे
फिरताहेत मते मागण्यासाठी
ढोंगबाजी जनतेला कळते
अद्दल घडवेल ती मतपेटी

Previous Post

कुवत पाहा, त्यानुसार शिक्षण घ्या!

Next Post

महिला टेनिसचा सा… सानिया मिर्झा!

Next Post
महिला टेनिसचा सा… सानिया मिर्झा!

महिला टेनिसचा सा... सानिया मिर्झा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.