• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home कारण राजकारण

कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

- खणखणपाळ (अराळ-फराळ)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 2, 2023
in कारण राजकारण
0
Share on FacebookShare on Twitter

नरीमन पॉइंटच्या कमळीच्या घराच्या दरवाजासमोर पायरीवरच त्यानं बसकण मारलीय. त्याच्या पेकाटात लोकायुक्तांनी लाथ घातलीय. मुंबई महापालिकेनं त्याच्या वाकड्या शेपटीला सरळ खुलाशाच्या नळीत घातलंय. ईडीवाले म्हणू लागलेत, `नको बाबा तुझी ती खिचडी आम्हाला, न्यायालयं आमची गचांडी धरताहेत.’ तरी बिचारा शेपटी खाली असलेल्या छिद्रातून भुंकतोच आहे, भूंऽऽ भूंऽऽ भ्यांऽऽ
भुंकय्याची अगदी हालत झालीय. अरेरे…! बिचारा अजून कोविडमधून बाहेर पडलेला नाहीय. त्याच्या मालकासमोर मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांची तारीफ केली. पण ह्याला भुंकायची उबळ आलीच. लगेच भूं भूं… `सुजित पाटकरने खोटे स्टॅम्प पेपर बनवले, खोटी कंपनी काढली, महापालिकेचा १०० करोड रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका घेतला. भ्रष्टाचार केला. आयुक्तांची पण चौकशी झालीच पाहिजे. भुंकय्याला वाटलं चहल आपल्याला घाबरतील, आपण म्हणू ती स्टेटमेंटस प्रेसला देता, या निमित्ताने महाविकास आघाडीची बदनामी करण्याची आणखी एक निमित्त मिळेल. पण चहल वस्ताद निघाले. गेले डायरेक्ट ईडीच्या ऑफिसमध्ये. करा चौकशी. १९८९च्या बॅचचे `आयएएस’ असलेल्या चहल यांनी सगळी कागदपत्रं सादर केली. भुंकय्याला हे माहीत होतं की चहल यांनी कोरोनकाळात दिवसरात्र झोकून काम केलं, मुंबईला मोठ्या संकटातून वाचवलं. धारावीसहित ५५ झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणात विषाणू तपासणी केंद्रं उभारली. उपचार केंद्रं सुरू केली. कोविड संचारबंदीच्या काळात कोणीही घरी, झोपडीत, रस्त्यावर, फुटपाथवर उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. चहल यांच्या या `मुंबई मॉडेल’ भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं. मुंबई उच्च न्यायालयानं तोंड भरून तारीफ केली. हे सगळं ठाऊक असताना मग भुंकय्या का भुंकला? काही नाही, आदत से मजबूर.
बरं इतकं अखंड भुंकत राहून भुंकय्यांचं नरडं दुखत नाही? दुखतं. पण काय करणार बिचारा! कमळाबाईनं काहींच्या गळ्यात पट्टा बांधून फक्त भुंकण्याचं काम सोपवलंय. त्या गटाचा हा प्रमुख. मालक केव्हा एकदा मंत्रीपदाचा शिळा-पाका तुकडा समोर टाकेल अशी आशाळभूत लाळ गाळत, शेपटी हलवत ह्या कॅमेर्‍यासमोरून त्या कॅमेरासमोर नि एका माईकवरून दुसर्‍या माईकवर भुंकत राहायचं… पण बिचार्‍याकडे कुणी लक्षच देत नाही. मग ह्याचं वैफल्य वाढत जातं. परत दुसरा विषय. मग तिसरा. मग चौथा. चटक लागलीय बिचार्‍याला भुंकत राहायची. आणि मीडियालाही चटक लागलीय की अशा टिनपटांना पडद्यावर दाखवत राहायची. अरे रोज उठून तो बढा-चढाके आरोप करतो त्यांची शहानिशा करायची जबाबदारी नाही मीडियाची? की पाकीटं मिळाली की लगेच तिकीटं फाडायची?
बरं मीडियामधल्या कोणी एखाद्या विदाऊट पाकीट पत्रकारांनं भुंकय्याला कधी विचारलंच की अरे तू त्या प्रताप सरनाईकांवर भुंकला होतास, त्याचं पुढे काय झालं? की लगेच ह्याच्या नरड्यातून भू भू ऐवजी गूं गूं गूं असा आवाज यायला लागतो. कोणाला वाटेल की डास गुणगुणतोय. पण याच्या शेपटीकडे लक्ष गेल्यावर दुसरा एखादा विचारतो, त्या भावना गवळींच्यावर तू आरोप केले होतेस ना रे? कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलं त्यांना तुझ्या मालकांनी? तर भुंकय्याची वाचाच बसते. कधी कुणी त्या यशवंत जाधवांबद्दल याला विचारून बघा, हा धूम पळत सुटतो की नाही बघा. शिंदुर्गवाल्या लघुसूक्ष्म उद्योगाकडे हा आता फिरकणारच नाही, असा जमालगोटा त्याला त्याच्या मालकांनंच देऊन ठेवलाय.
पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत जातील, तसा भुंकय्या चेकाळत जाईल. त्याच्या गळ्यातली साखळी सैल केली जाईल. छूऽऽ म्हटलं की हा धावून जाईल. उकिरडे हुंगत, हाडकं चघळत कॅमेर्‍यांसमोर आपल्या बोबड्या बोलांनी, मान हलवत, भेसूर हसत, हातवारे-पायवारे करत नाचत राहील. माझ्याकडे पुरावे आहेत पुरावे आहेत म्हणून कागदांचे कपटे फेकत राहील. आणि तरीसुद्धा पुन्हा पुन्हा पेकाटात लाथ खात राहील.
त्याला वाटलं होतं, लोकायुक्तांकडेही, महापालिका आयुक्तांकडेही आपली ईडी खिचडी मेथड चालेल. पण रेमडेसीवीर खरेदी आरोप प्रकरणातही भुंकय्या उघडा पडला (नागडा तर तो आधीचाच आहे). कोरोना असताना ठाकरे सरकारच्या काळात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या खरेदीत अनियमितता आणि लांडी-लबाडी झाली असा भाँरोप त्यानं केला. महापालिका प्रशासनाबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे केली. पण या जोकायुक्ताला लोकायुक्तांनी दणका दिला…
…बघा, आपल्या लंगड्या पेकाटावर शेपटी फिरवत तो कमळीसमोर बसून आहे, मुंबई महापालिकेनं एफडीएकडून रेमडीसीवीर न घेता जे छोटे-छोटे इंजेक्शन पुरवणारे डीलर्स आहेत त्यांच्याकडून वाढीव दराने इंजेक्शन खरेदी करून घोटाळा केला असा याचा आरोप होता. लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत महापालिकेने आपली बाजू मांडली. सगळ्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर लोकायुक्तांनी निर्णय दिला की या संपूर्ण प्रकरणात भुंकय्याने केलेले आरोप सिद्ध होत नाहीत. जे तथाकथित पुरावे भुंकय्याने आणले होते ते इतके तकलादू होते की त्याचीच लबाडी पारदर्शक झाली. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार रेमडीसीवीर खरेदीत झालेला नाही, अशा स्पष्ट शब्दात लोकायुक्तांनी महापालिकेला क्लीन चिट दिली.
मग तुम्हाला वाटेल की आता एवढी सगळी नसलेली अब्रू गेल्यावर त्या तरी भुंकय्याचं भाँ भाँ बंद होईल का? नाही होणार. जोपर्यंत त्याला `कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड’ मिळत नाही, तोपर्यंत ईमानदारीने तो भुंकत राहणार. ह्याला-त्याला चावत राहणार. सुडाने पिसाळलेल्या भटक्या भुंकय्यांना पकडायला खरं तर महापालिकेनं ताबडतोब गाडी पाठवायला हवी. पोत्यात भरायचं. गाडीत टाकायचं आणि नसबंदी करून टाकायची. खोटी तक्रार करून महापालिकेचे बदनामी केली म्हणून चहल यांनी भुंकय्यावर १०० कोटी नुकसान भरपाईचा दावा टाकला पाहिजे. बोबडी वळेल बघा त्याची.

Previous Post

महायुतीची मिंध्यांना महाभीती!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

कारण राजकारण

मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

March 23, 2023
कारण राजकारण

चिखल पॉलिटिकल

February 16, 2023
कारण राजकारण

सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

February 16, 2023
कारण राजकारण

शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

January 5, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

कुवत पाहा, त्यानुसार शिक्षण घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.