ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, रवि धनु राशीत, प्लुटो मकर राशीत, शुक्र, शनि कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कर्क राशीत. दिनविशेष : ७ जानेवारी दुर्गाष्टमी, १० जानेवारी पुत्रदा एकादशी.
– – –
मेष : नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांच्या साथीमुळे कामाचा ताण हलका होईल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील, आर्थिक उलाढाल वाढेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पत्नीच्या मदतीने कामे मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या छोट्या कारणामुळे हिरमोड होईल. नव्या कल्पना साकारताना मोठ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. नोकरीत बदल स्वीकारा. नाराज होऊ नका. तरुणांना यशासाठी अधिक कष्ट करावे लागतील.
वृषभ : तरुणांना अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. संततीकडून आनंद वाढवणारी बातमी कानी येईल. नोकरीतून विदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. घरात खर्च वाढेल. मन शांत ठेवा. पैसे दामदुप्पट करण्याच्या मोहात अडकू नका. निर्णय घेताना घाई नको. आपलेच खरे करू नका. नोकरीत आपण भले आणि आपले काम भले ही भूमिका ठेवा. ध्यान, योगासाठी वेळ द्या. काही वेळ मौजमजेवर खर्च होईल. आर्थिक बाजू चांगली ठेवण्यात यश मिळेल.
मिथुन : तरुणांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. अनपेक्षितपणे नव्या संधी चालून येतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ वेगळी जबाबदारी देतील. सकारात्मकता वाढवा. मुलांकडून शुभवार्ता कळेल. मित्र-नातेवाईकांच्या सहकार्याने अडकलेली कामे मार्गी लागतील. कामाचे नियोजन करा. वेळेची आणि पैशांची बचत होईल. भावंडाचे सहकार्य मिळेल. क्रीडापटूंना यश मिळेल. कलाकार, संगीतकार, गायकांना काम मिळेल. कौटुंबिक सहलीला जाल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा.
कर्क : कामात काळजी घ्या. चिंता वाढवून घेऊ नका. नोकरीत कामाचा ताण येऊन वाद होतील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. व्यवसायात कामानिमित्ताने जागरण घडेल. पत्नीशी जमवून घ्या. विचारपद्धती बदला. यशप्राप्तीसाठी दोन पावले पुढे जा. उच्चशिक्षणासाठी विदेशातील प्रयत्नात यश मिळेल. घरातली मालमत्तेसंदर्भातील चर्चा पुढे ढकला. भागीदारी व्यवसायात कागदपत्रे नीट तपासा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. पर्यटनात सावधगिरी बाळगा.
सिंह : नियोजनपूर्वक काम करा. व्यवसायात संमिश्र घटना अनुभवाल. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष राहतील. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. भागीदारीत सबुरीने घ्या. घरासाठी अचानक खर्च झाल्याने चिडचिड होईल. मित्रमंडळींशी वागताना बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवा. कसोटीचे प्रसंग येतील. कामात जबाबदारी वाढेल. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. नातेवाईकांशी बोलताना काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. कोणाला तोंडी आश्वासन देणे टाळा. शेअर ब्रोकर, रियल इस्टेटमध्ये आर्थिक लाभदायक काळ आहे. कलाकार, क्रीडापटू, साहित्यिकांचा गौरव होईल.
कन्या : मनस्वास्थ्य उत्तम राखा. मनाची चंचलता कमी करा. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. सार्वजनिक ठिकाणी कोणाचा रोष ओढवून घेऊ नका. पतीपत्नीमध्ये छोट्या कारणामुळे मिठाचा खडा पडू शकतो, काळजी घ्या. गुंतवणूक करताना नव्या प्रलोभनाला बळी पडू नका. नवीन ओळखीतून भविष्यात लाभ मिळू शकतो. आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र खर्च करताना काळजी घ्या. तरुणांना नोकरी मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. प्रेमप्रकरणात आनंदाचे दिवस अनुभवाल.
तूळ : नोकरीच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. व्यवसायात शॉर्टकट घेऊ नका. विदेशातील प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मित्रमंडळींशी वागताना बोलताना गैरसमज टाळा. नवीन नोकरी मिळेल. व्यवसायात बुद्धी कौशल्याच्या जोरावर यश मिळेल. काम पुढे नेताना मन स्थिर ठेवा. मनाचा तजेला टिकवण्यासाठी ध्यानधारणा, योगामध्ये मन रमवा. खाताना उतावळेपणा नको. व्यवसायात परखडपणा नको. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. सामाजिक कार्यात कौतुक होईल, त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.
वृश्चिक : अपेक्षित यश मिळेल. तरुणांचा उत्साह वाढेल. तणाव वाढवू नका. कामाबरोबरच खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. बँकेची कामे मार्गी लागतील. वाहन चालवताना काळजी घ्या. थकीत येणे वसूल होऊन आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीत कामचुकारपणा नको. हातातली व्यवसायाची संधी जाऊ देऊ नका. घरात शांतपणे वागा. नातेवाईकांना आर्थिक मदत कराल. मित्रमंडळींशी चेष्टामस्करी नको. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. घरात आणि बाहेर काळजी घ्या. उधार उसनवारी देणे टाळा.
धनु : व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. जुगार, सट्ट्यापासून दोन हात दूरच राहा. कुटुंबाशी जमवून घ्या. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. नोकरीत तत्त्वाला धरून काम करा, घाई टाळा. कलागुणांना वाव मिळेल. एखादी व्यावसायिक कल्पना त्यामधून आकाराला येईल. प्रेमप्रकरणात वाद होतील. मानसिक संतुलन बिघडेल. विदेशात नोकरीनिमित्ताने जाल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. व्यवसायात कामांना विलंब होईल. चिडचिड होईल. तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामाचा कंटाळा येईल.
मकर : वाणीच्या जोरावर कामे पुढे न्याल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. जुना आजार डोके वर काढेल. सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करा. व्यवसायात भूमिका घेणे टाळा. आर्थिक बाजू भक्कम ठेवा. अचानक खर्च वाढेल. मित्रांशी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. व्यावसायिकांचा उत्कर्ष होईल. विदेशात शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांत यश मिळेल. मुलांकडे लक्ष ठेवा. समाजसेवेत चांगला अनुभव येईल, कामाचा हुरूप वाढेल. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. बोलताना काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांशी संवाद करताना काळजी घ्या. त्यांच्या होमध्ये आपला हो मिसळा.
कुंभ : घरात आनंददायी प्रसंगामुळे छोटेखानी समारंभ होईल. त्यानिमित्ताने नातेवाईक, जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. तरुणांचा उत्साह वाढेल. नोकरीत आपण कसे श्रेष्ठ आहोत, हे दाखवू नका. कामात अचूकता ठेवा. मित्रमंडळींशी गोडीगुलाबीने घ्या. व्यवसायात नव्या संधी येतील. शेअर, लॉटरीतून लाभ मिळेल. पैसे उधार देणे टाळा. सोशल मीडियावर काळजी घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. घरात निर्णय घेताना काळजी घ्या. नोकरदारांचा उत्कर्ष होईल.
मीन : तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. कामे पुढे सरकतील. सकारात्मक ऊर्जा वाढेल. नातेवाईकांशी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरदारांना चांगला अनुभव देणारा काळ. वरिष्ठ खूष होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे ढकला. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. प्रेमप्रकरणात जरा जपून. घरात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत नियम पाळा. परिस्थिती हाताळताना कौशल्य पणाला लागेल. दांपत्य जीवनात आनंदाचे दिवस अनुभवाल.