• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

देवा ट्री गणेशा…

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 1, 2022
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0
देवा ट्री गणेशा…

ट्री गणेशा ही संकल्पना दत्ताद्री कोत्तुर यांनी राबवली आहे. ते म्हणतात, श्री मूर्तीत सगळ्यात विशेष म्हणजे डोळे. डोळ्याचं काम सगळ्यात शेवटी म्हणजे गणेशोत्सवापासून साधारण दोन ते तीन महिने आधीपासून सुरू होते. आमचं स्टुडिओतील काम हे वर्षभर सुरूच असतं. ट्री गणेशातली प्रमुख अडचण म्हणजे मूर्ती पूर्ण मातीची असल्याने वजनास थोडी जड असते, मूर्तीची ने-आण करताना अथवा उचलताना काळजी घ्यावी लागते.
– – –

प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिया मिर्झा लोअर परळच्या, इक्बाल मॅन्शन चाळीच्या गच्चीवरील गणपती बनविण्याच्या एका छोटेखानी स्टुडिओला भेट देते आणि स्वतःच्या हाताने गणपती बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. व्हिडिओ वायरल होतो आणि गणपती बनवणारा दत्ताद्री कोत्तुर हा तरुण एका रात्रीत फेमस होतो… खरं तर दियाने त्याची अशी प्रसिद्धी करायला दत्ताद्री काही दिया मिर्झाचा मित्र नाही की स्टाफ नाही. प्रमोशन, जाहिरातीसाठी लाखो रुपयांच्या ‘सुपार्‍या‘ घेणार्‍या एका सेलिब्रिटीने एकही रुपया न घेता एका उगवत्या मूर्तिकाराला फेमस केलं, याचं एकमेव कारण म्हणजे ‘ट्री गणेशा‘ ही त्याची संकल्पनाच दमदार होती. त्यानंतर हृतिक रोशन, रितेश देशमुख, सई ताम्हणकर, रिचा चढ्ढा, सागर कारंडे अशा अनेक सेलेब्रिटी, उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांच्या घरी दत्ताद्री यांच्या अभिनव कल्पनेतून साकारलेला गणपती आजतागायत विराजमान होतोय. २०१५ साली चाळीच्या गच्चीत गणेशमूर्ती बनवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज वरळीतील म्युनिसिपल इण्डस्ट्रीअल इस्टेटमधील मोठ्या स्टुडिओत स्थिरावला आहे. निसर्गाचा भाग असलेल्या लाल मातीचा वापर करून, ‘ट्री गणेशा‘ ही संकल्पना ज्यांना सुचली आणि गेली सात वर्षे देश-विदेशात ज्यांच्या गणेश मूर्तीचा बोलबाला आहे अशा दत्ताद्री कोत्तुर यांची त्यांच्या त्या स्टुडिओतच भेट घेतली. वर्षभरातील त्यांच्यासाठी सर्वात धावपळीच्या काळात म्हणजेच श्री प्रतिष्ठापनेआधीच्या पंधरवड्यात त्यांनी मला वेळ दिला आणि त्यांचं गणपती प्रेम, वेगळा विचार करण्याची क्षमता, व्यवसायाचा प्रवास हे सगळं उलगडून सांगितलं.
‘माझा जन्म मराठमोळ्या गिरणगावात लोअर परळ येथे झाला, महानगरपालिकेच्या गणपतराव कदम मार्ग शाळेत माझं शालेय शिक्षण झालं. चाळीत आणि शाळेत सर्व मराठी मित्र, त्यामुळे मातृभाषा तेलगू असली तरी मी मराठीच झालो. कारण, मराठी भाषेचे, संस्कृतीचे, सणांचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावर घडत गेले. बाबा मोरारजी मिलमध्ये कामाला होते. आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार. घरी मध्यमवर्गीय वातावरण होते. सगळ्यांनाच कलेची आवड. बाबांना रंगांची विशेष आवड. दोन्ही भाऊ अभ्यास आणि चित्रकलेत हुशार, मला मात्र लहानपणापासून अभ्यासापेक्षा चित्रकलेची आवड होती. गणपतीबाप्पाचं चित्र काढणं हा तर माझा छंद. आमच्यासमोरील चाळीत प्रसिद्ध मूर्तिकार आणि चित्रकार सूर्यकांत शिंदे आणि त्यांचे सुपुत्र विशाल यांचा त्रिमूर्ती स्टुडिओ आहे. तिथे मी दहा वर्षांचा असल्यापासून गणपती कसे बनतात, हे पाहायला जायचो. माझी आवड लक्षात घेऊन सूर्यकांत सर, विशाल सर यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. गुरूंच्या हाताखाली मातकाम रंगकाम यांचे धडे घेत मी मातीला आकार देऊ लागलो. दहावी झाल्यानंतर मी जेजे कॉलेज ऑफ आर्ट्सला प्रवेश घेण्याचे ठरवले होते, परंतु त्याच वर्षी शासनाने प्रवेशाचा नियम बदलला आणि जेजेला प्रवेश बारावीनंतर मिळेल असा निर्णय घेतला. त्यामुळे मी सिद्धार्थ कॉलेजला बारावी कॉमर्स करून मग वरळीत रहेजा कॉलेजला तीन वर्षांच्या कमर्शियल आर्ट्सला प्रवेश घेतला. या कला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चित्रकला हा माझा प्लस पॉइंट ठरला. सलग तिन्ही वर्षी स्केचिंगमधली सगळी बक्षिसे मीच पटकावली. तिथे फायनल इयरला गणपतीचा प्रोजेक्ट बनवला होता, त्याचं खूप कौतुक झालं. आम्हाला शिकवायला नाबर सर, केतकी मॅम, पवार सर असे खूप शिस्तप्रिय शिक्षक होते. त्या वयात एवढी शिस्त नको वाटायची, पण आज त्या शिस्तीचं महत्व पटतं. ते तसे नसते तर कदाचित आम्ही कलेतले बारकावे आत्मसात करू शकलो नसतो. २००७ला कॉलेज संपलं, त्यानंतर मला सर्कल क्रिएशन या जाहिरात कंपनीत व्हिज्युअलायझरची पहिली नोकरी मिळाली. प्रत्येक नोकरी तुम्हाला अनुभवसंपन्न करत असते, फक्त तुमची शिकण्याची तयारी हवी. व्हिज्युअलायझेशन आणि इलस्ट्रेशन या विषयात माझा हातखंडा आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल या विमा कंपनीसाठी मी खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी तयार केल्या. त्यांच्यासाठी नोट पॅड, होर्डिंग्ज, पॉपअप पत्रके, डायरी बनवण्याच्या कामात मी साधारण दोन वर्षे व्यग्र होतो. आतापर्यंत मी चार अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपन्यांमध्ये काम केलं, लिंटासमध्येही काही वर्षे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून होतो; तिथे किर्लोस्करांसाठी केलेला प्रोजेक्ट विशेष लक्षात आहे. किर्लोस्कर कंपनीच्या स्पेअर पार्टसाठी, अ‍ॅक्सिस बँकेसाठी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांसाठी काम करण्याने बर्‍याच क्षेत्रातले अनुभव गाठीशी आहेत. कॉलेज, नोकरी, प्रोजेक्ट्स या सगळ्यात कितीही व्यग्र असलो तरी गणपती बाप्पाची मूर्ती घडवण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी माझ्याकडे वेळ असायचाच; आवड असली की सवड मिळते म्हणतात ना तसंच हे. मला आठवतं, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी घरचे गणपती बनवायला सुरुवात केली. कलाकुसर सजावट या सार्‍यांची आवड होतीच. बाप्पाला मखरात विराजमान करण्याआधी आम्ही सर्व सजावट तयार ठेवत असू. तिथेही माझा रोल व्हिज्युअलायझरचाच होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझ्या मनातलं डिझाइन आणि इंजिनिअर असलेल्या भावांची साधनं वापरून त्यांच्या मदतीने केलेले जिवंत देखावे हे आमच्या कोत्तुर गणपतीचं वैशिष्टय असायचं. दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन आम्ही बाप्पासमोर आरास तयार करायचो. जसजसे मोठे होऊ लागलो तसे पर्यावरणपूरक आरास करण्याकडे आमचा कल वाढू लागला. त्यातूनच मग कधी कागदाचा गणपती तयार कर, कधी पानांचा, कधी फक्त शाडूमातीने संपूर्ण देखावा काढायचा, कधी काळ्या मातीची सजावट करायची, अशा वेगवेगळ्या युत्तäया वापरू लागलो.
देव चराचरात सामावलेला आहे या संकल्पनेवर आधारलेला कॅमोफ्लाज देखावा २०१३ साली तयार केला. त्यात समोरून पाहताना गणेशमूर्ती आणि मखर एकरूप दिसत होते. त्याला लोकसत्ता आणि लोकमत या दैनिकांची पारितोषिके मिळाली. पुढील वर्षी प्राणी, पक्षी, झाडी, फळे, फुले, डोंगर असा निसर्गावर आधारित ‘नेचर इज गॉड, गॉड इज नेचर‘ या संकल्पनेवर देखावा तयार केला. त्यालाही या दैनिकांची पारितोषिकं मिळाली. सलग दोन वर्षे पारितोषिक पटकावल्यावर आमच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या वर्षी काय वेगळं करता येईल याचा विचार करताना, बाप्पाचं विसर्जन झाल्यावर प्रसादरूपात भक्तांना काही वेगळं देता येईल का, ते पर्यावरणपूरकही हवे असा विचार करत होतो… आणि युरेका!!… एक दिवस बाप्पानेच ही कल्पना सुचवली… बाप्पांची मूर्ती विसर्जित केल्यावर त्या मूर्तीतून, त्या मातीतूनच एक झाड उगवलं तर किती छान. कल्पना आवडली होती, वेगळी होती. पण ही कल्पना सत्यात उतरेल याची खात्री नव्हती. त्यामुळे लगेच कामाला लागलो. कुठल्या बिया मूर्तीच्या मातीत मिसळल्या तर झाड योग्य प्रकारे येईल, त्यासाठी श्री मूर्तीची उंची किती असावी, कुठल्या खतांचा वापर करावा, झाड योग्यप्रकारे येण्यासाठी किती दिवस आधी श्री मूर्ती तयार करावी, असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी प्रयोगाला सुरुवात केली. वेगवेगळ्या बिया आणि खते यांचे प्रयोग करून मूर्ती बनवल्या. साधारण दोन महिन्यात एक प्रयोग आकाराला येताना दिसू लागला, तेव्हा काही मूर्तींचे विसर्जन करून त्यातून येणार्‍या झाडांची गुणवत्ता तपासली. या प्रयोगावर मी स्वतः आणि घरचेही खुश होतो. २०१५ साली गणेश चतुर्थीला, माझ्या संकल्पनेवर आधारित ‘ट्री गणेशा’ची प्रतिष्ठापना केली. ही कल्पना उत्तम असल्याची दाद अनेक मित्रमंडळींनी दिली. माझी ही नेचर प्रâेंडली कल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी माझ्या जाहिरात क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करण्याचे ठरवले. त्यानुसार मित्र अभिषेक जाधवच्या मदतीने एक व्हिडिओ बनवून युट्युबवर टाकला. अल्पावधीतच तो व्हिडीओ वायरल झाला. सर्वसामान्य माणूस ते अनेक नामांकित सेलिब्रिटींपर्यंत तो पोहचला. २०१५च्या ऑलिव्ह क्राऊन ग्रीन अवॉर्डसाठी या कल्पनेची निवड झाली. भारतातील त्या वर्षीची बरीच बक्षिसे मिळालीच, त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मी शॉर्टलिस्ट झालो. टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, लोकमत या सगळ्या दैनिकांच्या स्पर्धांमध्ये ट्री गणेशाने प्रथम क्रमांक मिळवला. लोकसत्ता आणि लोकमतची सलग तीन वर्षे बक्षिसे मिळवून हॅटट्रिक केली.
‘ट्री गणेशा’चा बाप्पा चौरंगासारख्या दिसणार्‍या कुंडीत विराजमान असतो. या चौरंगावर तसेच मूर्तीत खतमिश्रित लाल माती असते. तुळस, सूर्यफूल, कडुनिंब, भेंडी अशा उगविण्यास आणि वाढण्यासाठी सोप्या असणार्‍या कुठल्यातरी एका प्रकारच्या बिया असतात. ग्राहकाला विशेष बिया हव्या असतील तर त्यानुसार आम्ही पुरवठा करतो. एवढेच नव्हे तर श्री मूर्तीसोबत बियांचे अजून एक पुडके देखील भेट देतो. लहान गणपती मूर्तीवर संततधार पाणी घातले की ती मूर्ती चौरंगावरील मातीत मिसळते आणि त्याच कुंडीत काही दिवसातच हिरवे रोप उगवते. मोठे गणपती बादलीत विसर्जित करून मग ती माती कुंडीत अथवा बागेत टाकता येते. विसर्जनानंतर देखील बाप्पा माती आणि रोपाच्या नव्या रूपात आपल्या घरात रुजतो.. वाढतो.. बहरतो. त्यासोबतच याने पर्यावरणास किंचितही हानी न पोहोचता, पर्यावरणास पोषक निर्मिती होते.
नदीत, विहिरीत किंवा समुद्रात विसर्जन केल्यानंतर मूर्ती नैसर्गिक मातीत पूर्णपणे एकरूप होतच नाही. गणेश विसर्जनातून जलप्रदूषण होऊ नये यासाठी नागरिकांबरोबरच मंडळे आणि शाळाही पुढाकार घेत आहेत. यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. मात्र मुंबई, गुजरात भागात मिळणारी पांढुरकी शाडू माती आता कमी झाली आहे. त्याऐवजी हुबेहूब तशाच दिसणार्‍या फायर क्लेत, बॉम्बे क्लेत किंवा चायना क्ले च्या मूर्ती विकून ग्राहकांची फसवणूक होते आहे. मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी या क्लेतचा वापर ‘इको-फ्रेंडली‘ नक्कीच नाही. त्यातील अ‍ॅल्युमिनिअम आणि सिलिका हे घटक कारागिरांच्याही आरोग्याला घातक आहेत. यामुळेच कोणतीही भेसळ नसलेल्या लाल मातीचा वापर करून आम्ही गणेश मूर्ती साकारतो. याची सुरुवात गुजरात व कोकणातून लाल माती मागवण्यापासून होते. माती साठविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आवश्यक तेवढीच माती आम्ही मागवतो. आणलेल्या मातीत पाणी मिसळून त्याची मऊसूत घट्ट माती तयार करतो. माती पुरेशी मऊ झाली की साच्यात टाकून त्याचे गणपती बनवले जातात. एक मूर्ती बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. या एका दिवसात मूर्तीचे मोल्डिंग आणि फिनिशिंग होते. तर पुढचा आठवडा ते दहा दिवस मूर्ती वाळण्यासाठी लागतो. श्री मूर्तीत सगळ्यात विशेष म्हणजे डोळे. डोळ्याचं काम सगळ्यात शेवटी म्हणजे गणेशोत्सवापासून साधारण दोन ते तीन महिने आधीपासून सुरू होते. आमचं स्टुडिओतील काम हे वर्षभर सुरूच असतं. ट्री गणेशातली प्रमुख अडचण म्हणजे मूर्ती पूर्ण मातीची असल्याने वजनास थोडी जड असते, मूर्तीची ने-आण करताना अथवा उचलताना काळजी घ्यावी लागते. मूर्तीचे वजन साधारण तीन किलोपासून बावीस किलोपर्यंतचे आहे, तर उंची नऊ इंचापासून ते बावीस इंचापर्यंत असते. या पर्यावरणपोषक श्री मूर्ती भाविकांना सहज उपलब्ध कशा करून देता येतील, याचा विचार सुरू होता. मी जाहिरात क्षेत्रात असल्यामुळे माझ्या कामात सतत नवनवीन कल्पना राबवत असतो. ट्री गणेशाच्या डिलिव्हरीज सोप्या करण्यासाठी आम्ही पिकअप पॉइंट ठरवले. वेगवेगळ्या शहरांमध्ये आमच्या टीम काम करत आहेत. डिलिव्हरीसाठी वेगळी टीम आहे. गणेश मूर्तींच्या वितरणासाठी पिकअप पॉइंट ही संकल्पना राबवणारा, आमचा पहिलाच कारखाना आहे. मुंबईमध्ये ठाणे, कल्याण, अंधेरी, भाईंदर, वाशी, सानपाडा इत्यादी ठिकाणी आमचे पिकअप पॉइंट आहेत. पुण्यामध्ये बाणेर, शिवाजी नगर, हडपसर येथे आमचे पिकअप पॉइंट आहेत. याशिवाय होम डिलिव्हरीची सुविधाही अधिक चार्जेस मोजून उपलब्ध आहे. त्यामुळे ट्री गणेश अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचतो आहे.
ट्री गणेश हा प्रकल्प यशस्वी झाल्यापासून अनेक मूर्तिकारांनी या प्रकल्पाची कॉपी करण्यास सुरुवात केली आहे. कल्पना कॉपी केली असली तरी दर्जा मात्र राखता आला नाही, इतर श्री मूर्तीतून नेहमी रोप उगवेल, किंवा उगवलेल्या रोपांची निकोप वाढ होतेच असे नाही. बऱ्याचदा पहिल्यांदा ट्री गणेश घेणारे भाविक अपुऱ्या माहितीअभावी ओरिजनल ट्री गणेशापेक्षा वेगळी मूर्ती विकत घेतात. त्यातून रोप येत नाही तेव्हा तक्रार मात्र ते आमच्याकडे येऊन करतात. तेव्हा सांत्वन करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही. म्हणूनच ट्री गणेश ओरिजनल ठिकाणाहून घ्यावा असा माझा सगळ्यांना आग्रह असतो. आमच्याकडे प्रशिक्षित टीम आहे. मूर्तीचा आकार, वजन यानुसार कुठल्या बिया, किती खत याचे एक प्रमाण निश्चित केले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने काम करणार्‍या माझ्या टीममधे मराठी आणि तेलगु गुजराती व्यक्तींचा समावेश आहे. सुरुवातीपासूनच्या या टीममधे आजही ९० टक्के जुने कलाकार आहेत. कोरोनामध्ये देखील माझ्या टीमने एकत्र येऊन उत्तम कामगिरी बजावली. २०१८पासून माझा स्टुडिओ सुरू आहे. कोविड काळात कितीतरी उद्योग बंद पडले असताना आमचा स्टुडिओ मात्र सुरू होता, याचे कारण बाप्पाचा आशीर्वाद हे आम्ही मानतो. देंडे फॅमिली, राहुल, विनोद हे माझे टीममधील सहकारी आहेत. ट्री गणेशाची गुणवत्ता राखणं या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे शक्य होतं. गणेशोत्सवासाठी माझी टीम साधारण तीन हजार मूर्ती बनवते. या सगळ्या प्रक्रियेत माझी बायको सौ. रत्ना हिचाही मोलाचा वाटा आहे. तिची फायनान्समध्ये डिग्री असून आमचे ऑनलाईन बुकिंग कस्टमर फीडबॅक, कस्टमर पेमेंट वर्कर पेमेंट, वेबसाईट, अकाउंट फायनान्स या सार्‍या गोष्टी रत्ना बघते, तर मी प्रोडक्शन, एक्झिक्युशन, नवनवीन आयडियाज आणि मार्केटिंग याचं काम बघतो. पुढील वर्षी सहा महिने आगावू मागणी नोंदवून, ग्राहकांच्या मनातील बाप्पा (कस्टमायझेशन) त्यांना बनवून देण्याचा आम्ही विचार करत आहोत. या सर्व प्रयत्नांनी ट्री गणेशा ही संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. पण त्यासाठी किंमत खूप वाढवून चालणार नाही याची जाणीव देखील आम्हाला आहे. यामुळेच ही पर्यावरण उपयोगी संकल्पना किफायतशीर असावी असा आमचा उद्देश आहे.‘
दत्ताद्री कोत्तुर यांची ट्री गणेशाची संकल्पना युनिक आहेच पण या कल्पनेवर आधारित व्यवसाय बांधणी करताना त्यांनी निर्मिती, मूल्य आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सुलभ मार्ग यांचेही भान राखले आहे. कालमानानुसार आपण गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आपलीच आहे. बारा कोटी जनसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील घराघरात आज गणेशोत्सव साजरा केला जातो. समजा त्यातील पन्नास लाख घरात ट्री गणेशांचे आगमन झाले, तर दर वर्षी गणेश विसर्जनानंतर पन्नास लाख वृक्षांची लागवड होईल. हीच आपल्याकडून गणपती बाप्पाला आपली मानवंदना असेल.
बोला, देवा ट्री गणेशा!!

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

गजवदना सुखसदना विघ्नसुरदमना…

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
Next Post

गजवदना सुखसदना विघ्नसुरदमना...

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.