• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

- संदेश कामेरकर (बॉक्स ऑफिस)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 3, 2024
in मनोरंजन
0

कालपर्यंत एकेका राज्यापुरता वकूब असणारा प्रादेशिक सिनेमा आता सीमोल्लंघन करून हिंदी बेल्टमधे घुसायला लागला आहे. प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ सिनेमाने भारतात सहाशे कोटीपेक्षा जास्त कमाई करून हिंदी सिनेमातील सुपरस्टार हिरोंची झोप उडवली. भारतीय सिनेमा उद्योगाची एकूण उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण एकूण प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी उत्तम कमाई केलेले चित्रपट दहा टक्के असतात. भारतात बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटीपेक्षा जास्त कमाई केलेले चित्रपट हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. कश्मीर से कन्याकुमारी तक सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन आम्हीच करू शकतो हे हिंदी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सिद्ध केलं होतं. प्रादेशिक सिनेमा त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. मात्र कालपर्यंत डाऊन मार्वेâट म्हणून हिणवला गेलेला दाक्षिणात्य चित्रपट आता भारतभर झेंडे गाडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा वारसा पुढे चालवत, महाराष्ट्राच्या मातीत, मुंबईत पाळेमुळे भक्कम झालेला हिंदी सिनेउद्योग इतकी वर्ष भारतावर राज्य करत होता. पण मागील काही वर्षांत दाक्षिणात्य सिनेमा हिंदी सिनेसृष्टी पादाक्रांत करत सुटलाय.

दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे काय?

काही वर्षांपूर्वी हिंदी सिनेमांतल्या चित्रणाच्या प्रभावामुळेच कोणत्याही दाक्षिणात्य माणसाला मद्रासी म्हटलं जायचं, तसा अजूनही काही सिनेरसिकांना साऊथचा सिनेमा म्हणजे हिंदीसारखा एका भाषेतील सिनेमा वाटतो. कारण टीव्हीवर किंवा सिनेमागृहात दिसणारा साऊथचा सिनेमा हिंदी भाषेत डब झालेला असतो. काही संवाद प्रादेशिक असले तरी त्याची भाषा आपल्याला कुठे समजते आणि ओळखता येते? साऊथ इंडियन सिनेमात तेलगू सिनेमा हा सध्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधे सर्वात मोठा भाऊ आहे. चिरंजीवी (आज का गुंडाराज), नागार्जुन (शिवा), वेंकटेश (अनाडी) यांची परंपरा महेश बाबू, ज्यु. एनटीआर, राम चरण तेजा (आरआरआर), प्रभास (बाहुबली, कल्की) या स्टार्सनी पुढे चालवली आहे. यानंतर तमिळ सिनेमाचा नंबर लागतो. तामिळनाडूत १९७५पासून सुरू झालेला रजनीकांत महिमा आजतागायत सुरू आहे. जेलर सिनेमाच्या यशामुळे वयाच्या ७३ व्या वर्षी देखील रजनीकांत स्टार व्हॅल्यू सांभाळून आहेत. थलपती विजय (लिओ), धनुष (रांझना), विजय सेतुपती (महाराजा), कमल हसन (कल्की, इंडियन २), सूर्या (रक्तचरित्र, जयभिम) असे मोठे स्टार्स तमिळ सिनेमाची धुरा सांभाळत आहेत.
सहा वर्षांपूर्वी कन्नड सिनेमा वाईट अवस्थेतून जात होता. २०१८ साली केजीएफपासून कन्नड सिनेमाने कात टाकली आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पुन्हा ताठ मानेने उभा राहिला. कन्नड सिनेसृष्टीतला यश अर्थात रॉकी भाई सर्वात मोठा स्टार आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कांतारामधून तीनशे कोटी रुपयांची कमाई करणारे ऋषभ शेट्टी, सुदीप, दर्शन हेही कन्नड सिनेमाचे सुपरस्टार आहेत. जेमतेम साडे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या केरळ राज्यात मोहनलाल, मामुट्टी हे दोन सुपरस्टार्स आणि फाहाद फाझिल, पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखे असंख्य अभिनेते आशयघन मल्याळम चित्रपट जगभरात पोहोचवत आहेत. या चार वेगवेगळ्या भाषांत तयार होणार्‍या सिनेमांना आपण दाक्षिणात्य सिनेमा म्हणून ओळखतो.
हिंदी सिनेमात दाक्षिणात्य हिरोंना मोठी कामगिरी करणं बराच काळ शक्य नाही. तमिळ सुपरस्टार रजनीकांतला ऐन उमेदीच्या काळात अंधा कानूनने यशाचा हात दिला असला तरी नंतर हमसारख्या सिनेमात तो सहायक अभिनेताच होता. त्या काळात बॉक्स ऑफिसवर १९८१ साली एक दुजे के लियेसारखा सुपर हिट सिनेमा देणार्‍या कमलहासनलाही नंतर इथे बस्तान बसवता आलं नाही. चिरंजीवी, नागार्जुन, वेंकटेश, आर. माधवन (रहना हैं तेरे दिल मे) यांनी काही प्रमाणात यश मिळवले, पण हे सहसा ते एखाद दुसर्‍या सिनेमापर्यंतच मर्यादित राहिलं.
दाक्षिणात्य अभिनेत्रींनी मात्र हिंदी सिनेमात फार पूर्वीपासून मानाचं स्थान पटकावलं. वैजयंतीमाला, पद्मिनी, हेमा मालिनी, रेखा, जयाप्रदा याच्या जोडीला हिंदी सिनेमाची महिला सुपरस्टार श्रीदेवी ते आजच्या रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया या दाक्षिणात्य अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग झाल्या आहेत.
दक्षिणेने हिंदीवर केलेल्या दिग्विजयी स्वारीचा प्रारंभ झाला १० जुलै २०१५ रोजी. या तारखेला बाहुबली हा तेलगू सिनेमा हिंदीसह अन्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला. जुरासिक पार्क, टायटॅनिक असे भव्य दिव्य चित्रपट फक्त हॉलिवुडमध्येच बनू शकतात या समजाला खोटं ठरवत दिग्दर्शक राजा मौलीने जागतिक तोडीचा भव्य सिनेमा दिला. या सिनेमाने भारतात ४२१ कोटी रुपयांची कमाई करत एक प्रादेशिक सिनेमा किती उंच भरारी घेऊ शकतो याची चुणूक दाखवून दिली. यानंतर दोन वर्ष कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेक्षक बाहुबली २ या सिनेमाची वाट पाहत होते. या सिनेमाने आजवर हिंदी सिनेमालाही अशक्य असलेला एक हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला. हिंदी सिनेमातले सुपरस्टार शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचल्याबद्दल पाठ थोपटून घेत असताना बाहुबली २ एक हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठतो ही हिंदी सिनेउद्योगासाठी धोक्याची घंटा होती. हे दोन्ही सिनेमे हिंदी बेल्टम्ाध्ये भरपूर चालण्याचं एक प्रमुख कारण शरद केळकर या कसलेल्या अभिनेत्याने केलेलं प्रभासचं अप्रतिम डबिंग. तत्पूर्वी दाक्षिणात्य सिनेमांच्या हिंदी डबिंगचं काम व्यावसायिक डबिंग आर्टिस्ट उत्तम करायचे. पण, कसलेला अभिनेता पडद्यावरील व्यक्तिरेखा वेगळ्या भाषेत कसा जिवंत करतो, ते शरदने दाखवून दिले. असाच अनुभव पुष्पा सिनेमात श्रेयस तळपदेच्या डबिंगने दिला. पुष्पा… फ्लॉवर नही फायर हैं मैं… या डायलॉगला थिएटरमध्ये टाळ्या पडल्या, ते उगीच नाही.
बाहुबली २नंतर जेमतेम एकदोन राज्यांपुरता (दक्षिणी सिनेमांचं एकमेकांत डबिंग, रिमेक असं बरंच साटंलोटं सुरू असतं, म्हणूनच श्रीदेवी एका वेळी पाच भाषांची स्टार होती) वकूब असणारा प्रादेशिक सिनेमा आता सीमोल्लंघन करून हिंदी बेल्टमध्ये घुसायला लागला. तेलगूपाठोपाठ कन्नड केजीएफ २ने ८६० कोटी कमाई करून दुसरा नंबर पटकावला. तिसर्‍या नंबरवर आरआरआर (७८२ कोटी). भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार्‍या या तीन दाक्षिणात्य चित्रपटांनंतर चौथ्या नंबरवर शाहरुख खानचा जवान येतो, म्हणजे पाहा! २०२३मधील शाहरुख खानचे दुहेरी यश वगळता मागील काही वर्षात कमाईच्या बाबतीत दाक्षिणात्य सिनेमांनी हिंदी सिनेमांना मागे टाकलं आहे असं दिसतंय.
या वर्षी २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मंजुम्मेल बॉईज’ या मल्याळम सिनेमाने इतिहास घडवला. २० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमाने जगभरात २४० कोटींचा गल्ला जमवला. मामुट्टी, मोहनलाल यांना जे जमलं नाही ते या नवीन कलाकारांनी करून दाखवलं. मल्याळम सिनेमात पहिली बॉक्स ऑफिस डबल सेंच्युरी झळकावण्याचा मान या सिनेमाला मिळाला. याच्या जोडीला आज कल्की सिनेमाचा डंका जगभरात वाजतो आहे. ‘साहो’, ‘राधेश्याम’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमांच्या निराशाजनक कामगिरीनंतर बाहुबलीचं प्रभासी यश आभासी होतं असं म्हणणार्‍या टीकाकारांना प्रभासने सहा महिन्यांपूर्वी सालारच्या (४०६ कोटी) तडाखेबंद यशाने चोख प्रत्युत्तर दिलं होतंच. आता २७ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘कल्की’ने भारतात ६२५ कोटींची आणि जगभरात १०१५ कोटींची कमाई करून दुष्काळग्रस्त बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला. या सिनेमाने सिनेमागृहाची वाट विसरलेल्या दोन कोटी प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहात आणलं, हे विशेष.
‘आरआरआर’ (२७२ कोटी), ‘रोबोट’ (१९० कोटी), ‘सालार’ (१५२ कोटी), ‘आदिपुरुष’ (१४८कोटी), ‘कल्की’ (१२८ कोटी), ‘बाहुबली’ (११८ कोटी), ‘पुष्पा’ (१०६ कोटी) हे आकडे आहेत या सिनेमांनी हिंदी डब व्हर्जनच्या माध्यमातून केलेल्या कमाईचे. या कमाईमुळे हिंदी सिनेमा हाच पॅन इंडिया कमर्शियल सिनेमा या समजुतीला तडे गेले आहेत. कल्कीच्या यशाने भारतीय सिनेमांचे खरे बाहुबली दक्षिणेतील आहेत यावर शिकामोर्तब झालं आहे. हिंदी साऊथ भाई भाई असं म्हणायची वेळ हिंदीतील मोठ्या निर्मात्यांवर आली आहे. पण आलू पराठे, गाजर का हलवा आवडणार्‍या हिंदी प्रेक्षकांना आता दाक्षिणात्य इडली, डोशाची चटक का लागली आहे?
हा बदल एका वर्षात झालेला नाही तर याची सुरुवात खूप आधी झाली होती. काळवीट शिकार प्रकरण, रस्त्यावरचा अपघात आणि एकामागोमाग एक फ्लॉप सिनेमे या दुष्टचक्रात अडकलेल्या सलमान खानला ‘वॉन्टेड’ (२००९) या सिनेमाच्या यशाने दक्षिणेकडून येणारी स्टायलिश वाट सापडली. कधी गॉगल उडवून तर कधी बेल्ट नाचवून त्याने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. सलमानचे यश पाहून इतर बॉलीवुड हीरोंनी देखील दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक अथवा त्यांतील प्रसंगांची कॉपी करण्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमातील बस, कार, हातगाड्या, डोईवरील केस आणि अगणित माणसं स्लो मोशनमध्ये उडायला लागली. पण यातून आपणच साऊथच्या मसाला सिनेमांसाठी रस्ता तयार करून देतोय याची जाणीव आपल्या हिंदी सिनेमातील सुपरस्टार्सना नव्हती. दक्षिणी सिनेमांनी उपग्रह वाहिन्यांमधून हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांच्या घरात प्रवेश केला होताच तत्पूर्वी.
शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत होता, तेव्हा या सिनेमाचं मूळ असलेल्या तेलगू अर्जुन रेड्डीची उपग्रह वाहिनीवर पारायणं होत होती. टीव्ही वाहिन्यांनी तसेच ओटीटी चॅनल्सनी दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करून दिल्यामुळे हिंदीतली कॉपी बघण्यापेक्षा ओरिजनल सिनेमा हिंदीतच पाहावा, असं प्रेक्षकांना वाटू लागलं. उत्तम कथा आणि भव्य दिव्य सादरीकरणाच्या बळावर प्रेक्षकांना खेचता येतं, हे माहिती असलेल्या दक्षिणी सिनेमांच्या निर्मात्यांना आता पॅन इंडिया व्यवसायाचे वेध लागले. २०१५ साली बाहुबली भारतभर प्रदर्शित करताना करण जोहरची प्रेझेंटर म्हणून मदत घ्यावी लागली, कारण तेव्हा भारतातील हिंदी सिनेमा वितरणाचे जाळे गुंतागुंतीचे होते. आज कल्की सिनेमा प्रदर्शित करताना निर्मात्यांना कोणाचीही मदत घेण्याची आवश्यकता उरलेली नाही. कारण चित्रपटगृह मालकांनाच आता दक्षिणात्य सिनेमा हवा आहे. हिंदी सिनेमापेक्षा साऊथचा सिनेमा लावला तर सिनेमागृहात गर्दी होईल आणि ज्यात मुख्य कमाई आहे ते समोसे, पॉपकॉर्न विकले जातील याची चित्रपटगृह मालकांना खात्री वाटते.
वर्षाला चार हिट चित्रपट देणारा अक्षय कुमार आज एका हिटसाठी चाचपडतोय. साऊथच्या कथेची, स्टाईलची कॉपी करता करता हिंदी सिनेमातील मंडळी त्यांच्या मार्केटिंग आणि प्रमोशनच्या आयडियांची देखील कॉपी करत आहेत. म्हणूनच आधी हिंदी सिनेमे माऊथ पब्लिसिटीने चालायचे आता ते साउथ पब्लिसिटीने चालतील असं गमतीने म्हटलं जातं.
दक्षिणेकडील राज्यांत सिनेमा हा जनतेच्या जगण्याचा भाग आहे. महाराष्ट्रात भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली असली तरी खर्‍या अर्थाने सिनेमा बहरला तो दक्षिणेतील राज्यांतच. सिनेमा ही त्यांची सांस्कृतिक चळवळ झाली. अशक्य ते शक्य करणारे हिरो वास्तवातही आपले तारणहार बनू शकतात अशी खात्री खात्री असल्यानेच एमजी रामचंद्रन, एनटी रामाराव, जयललिता यांच्यासारखे स्टार मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. रील ते राजकारण असा प्रवास करत पवन कल्याण, विजयकांत, चिरंजीवी, राम्या, थलपती विजय, खुशबू अशा अनेक कलाकारांनी राजकारणावर ठसा उमटवला आहे.
भारतीय प्रेक्षक क्रिकेट आणि सिनेमावेडा असला तरी आता तो मोबाईलवेडा झाला आहे. दहा सेकंदाचे रील्स पाहण्याच्या नादात तो थिएटरपासून दुरावला आहे. प्रेक्षकांअभावी सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडत आहेत. प्रगत महाराष्ट्रात एकूण ६१० सिनेमागृहे आहेत, तर भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यांत ९७० सिनेमागृहे आहेत. या तुलनेत आंध्र प्रदेशात २८०९, तामिळनाडूत १५४६, कर्नाटकमध्ये ९५०, तर केरळमध्ये १०१५ सिनेमागृहे आहेत. भारतातील एकूण १०१६७ चित्रपटगृहांपैकी दक्षिणेतील चार राज्यात निम्यापेक्षा जास्त म्हणजेच ६३२० सिनेमागृहे आहेत. २०१९ साली १४३ कोटी भारतीयांनी सिनेमागृहात सिनेमे पाहिले. हेच प्रमाण २०२३ मध्ये ९० कोटीवर आले आहे. याचा अर्थ सिनेमावर प्रेम करणारा आणि सिनेमाचे तिकीट काढून सिनेमा पाहणारा प्रेक्षकवर्ग कमी होतोय. पण ही घट हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांचीच होती, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलं की लक्षात येतं.

आमची माती आमची माणसं

विषय कोणताही असो, साऊथवाल्या सिनेमात गावगाडा दिसतोच. असं म्हणतात की ही मंडळी चंद्रसूर्यावर सिनेमा काढतील किंवा दुबई, अमेरिकेची सफर घडवून आणतील, पण त्यात प्रादेशिक प्रसंग असतीलच. लोकल ते ग्लोबल हा फॉर्म्युला दाक्षिणात्य सिनेमा उद्योगाला चांगलाच उमगला आहे. दक्षिणेत चारही भाषांची आपापली खासियत आहे. तेलगू, कन्नड आणि तमिळ चित्रपट मुख्यत मसाला मनोरंजनपर असतात. तर मल्याळम भाषेतील सिनेमा आशयघन असतो. दाक्षिणात्य हीरोंच्या कटआउटवर दुधाचा अभिषेक करून त्यांना देवासारखं पुजलं जातं. रजनीकांतचा सिनेमा असेल तर शहरातील सर्व रिक्षाचालक व्यवसाय बंद ठेवून सिनेमा पाहायला जातात. हीरोंची नाळ सर्वसामान्य प्रेक्षकांशी जोडलेली असणे हे अजून एक वैशिष्ट्य. हिंदी सिनेमात दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंदपासून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान या सुपरस्टार मंडळींना चाहत्यांनी देवत्व बहाल केलं होतं. पण नंतर बहुतेक स्टार मंडळी टीव्हीवरच्या जाहिरातीत डोक्यावरच्या तेलापासून ते पायातील चपलेपर्यंत सर्व काही विकू लागल्यावर त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. दक्षिणेतील कलाकार त्यांच्या राज्यांतील प्रश्नांवर जाहीरपणे मत मांडतात. प्रसंगी आंदोलनात सहभागी होतात. सार्वजनिक जीवनात भेटणार्‍या चाहत्यांशी प्रेमाने वागतात. याचीच परतफेड म्हणून हीरोचा नवीन सिनेमा असंख्य वेळा पहिला जातो. यातूनच सुपरस्टार्सच्या प्रत्येक सिनेमाला चांगली ओपनिंग मिळते. सिनेमा फ्लॉप झाला तरी निर्मात्याने गुंतवलेले पैसे परत मिळतात. एखाद्या सिनेमात नुकसान झालं तर स्टार मंडळी आपल्या फीमधून काही पैसे परत करतात. हिंदीतले स्टार चाहत्यांशी अशा प्रकारचा स्नेहबंध निर्माण करू शकलेले नाहीत.

बडा घर पोकळ वासा

मोठ्या हिंदी सिनेमानिर्मितीचा खर्च १००-२००-३०० कोटी इतका सांगण्यात येतो. एवढे पैसे खर्च करूनही चित्रपट हा आरआरआर किंवा पुष्पासारखा भव्य दिसत नाही. मग पैसे जातात कुठे? ३०० कोटी बजेटमध्ये हिरोची फी १०० कोटी इतकी असू शकते. हिरो चांगली कमाई करून देत होते तोवर हे पैसे द्यायला निर्मात्यांचीही हरकत नव्हती. सातत्याने फ्लॉप सिनेमे देऊनही अनेक स्टार आपली फी कमी करायला तयार नाहीत. हे पैसे दिल्यानंतरही हिरो हिरोईनची बडदास्त ठेवताना होणार्‍या प्रचंड खर्चावर निर्मात्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. मोठ्या स्टारचा मेकअपमन, हेअर ड्रेसर दिवसाचे एक लाख रुपये घेतो. आजूबाजूला चार सुरक्षारक्षक असतात ते प्रत्येकी पंधरा हजार रुपये घेतात. हीरोला चहा आणून देण्याचे काम करणार्‍या स्पॉट बॉयला देखील दिवसाचे पंचवीस हजार रुपये निर्मात्यांना द्यावे लागतात. हा अनावश्यक पंचतारांकित खर्च हल्ली चर्चेत आला आहे. हिंदीत सकाळी सातच्या शिफ्टला हिरो दुपारी दोन वाजता पोहोचायचे असे किस्से आपण अनेकदा ऐकले आहेत. आज काही प्रमाणात व्यायसायिकता आली असली तरी ‘सब चलता हैं’ ही वृत्ती अजूनही बदललेली नाही.
या उलट दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात अधिक व्यावसायिक पद्धतीने काम केलं जातं. वेळ पाळणे हा त्यांनी वर्षानुवर्ष जपलेला मूलमंत्र. रजनीकांतसारखा सुपरस्टार देखील शूटिंगला लवकर पोहोचता यावं आणि निर्मात्यावर अधिक भार नको म्हणून शूटिंग काळात लहानशा जागेत राहतो. सिनेमा वेळेत आणि आखलेल्या बजेटमध्ये पूर्ण व्हावा यासाठी स्पॉट बॉयपासून स्टारपर्यंत एकूण एक माणूस झटत असतो. साऊथचा प्रत्येक चित्रपट धो धो चालतो असं नाही, पण ठरवलेल्या बजेटमध्ये सिनेमा बनल्यामुळे आणि प्रेक्षक सिनेमाच्या पाठीशी ठाम उभा असल्यामुळे निर्माता फार नुकसानीत जात नाही. हिंदीत मात्र अव्वाच्या सव्वा खर्च भरून निघेल एवढी कमाई पंचवीस टक्के सिनेमांची देखील नसते.

भय इथले संपत नाही

हिंदी सिनेमातील स्टार्सची कमाई सिनेमापुरती मर्यादित नाही, विविध कंपन्यांचे ब्रँड अँबेसडर बनण्यापासून जाहिराती, दुकानांची उद्घाटने, श्रीमंतांच्या लग्नात नाचणे, यातून करोडो रुपयांची कमाई हे स्टार करतात. म्हणूनच शाहरुखसारख्या मोठ्या सुपरस्टारला सिनेमातून चार वर्षाचा गॅप घेता येतो. दाक्षिणात्य हीरोंना पॅन इंडिया स्टारडम लाभलं तर मात्र मराठीप्रमाणे हिंदी सिनेमातील सुपरस्टार देखील दैनंदिन टेलिव्हिजन मालिकेत काम करताना दिसतील. या परिस्थितीत हिंदी सिनेमाला जर साऊथ समोर झुकेगा नहीं साला असं म्हणायचं असेल तर ‘बाहुबली ने हिंदी सिनेमा को क्यूँ मारा’ याचा नीट विचार करूनच पुढील चित्रपटनिर्मिती करायला हवी.

Previous Post

काम करत राहणं महत्त्वाचं!

Next Post

मार्मिकचे मर्म, महाराष्ट्र धर्म!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

मार्मिकचे मर्म, महाराष्ट्र धर्म!

शंभुराजांच्या बदनामीचे कट उधळण्यासाठी...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.