(शोभेदार एकमाल सिद्दीक, फुलचंद पंत डबीर, हेजीब फॅरो हे तिघे बरखा(स्त) महालाच्या दिवान-ए-खाकमध्ये बसलेले. समोर सांडणीस्वार खाली मान घालून उभा. मधोमध मेजावर ठेवलेलं रेशमी तलम वस्त्रातलं `बजेट’ नावाचं बाड तिघे न्याहाळताय.)
एकमाल : (समोर उभ्या असलेल्या सांडणीस्वाराकडे बघत) तो ये कब का है?
सांडणीस्वार : हुजूर, ये ताजा ताजा लिखा हय।
हेजीब : इस्का करना क्या हय?
पंत : (डोक्याला हात मारत) हेजीबजी, चहापन्हा नौरंगजेब जी ने पूरे मुल्क तथा सारी अवाम के लिए जो थैला याने बजेट मंजूर किया है, उसमें से हमारे लिए कितना कुछ है? ये देखने के लिए हमे एक एक कॉपी भेजी है दरबार से।
एकमाल : देखायचं काय आहे त्यात? ‘खापेंड’जीने दिलंय म्हणजे काही मोठंच दिलं असेल की?
पंत : दिलंय, ते भलंमोठंच! पण काय आणि किती दिलंय, ते आपल्याला शोधून लोकांना सांगायचंय.
एकमाल : पण का म्हणोन?
हेजीब : हुजूर, कान ठीक करा राव! तुम्हांस लोकांची बोंबाबोंब ऐकू येत नाही का?
एकमाल : लाडके म्हणोन काहीएक जणं खांद्यांवर घ्यायचे ठरवलेत की आम्ही! तरीही??
पंत : (सांडणीस्वाराकडे बघत) तुम्ही यावं! फक्त हुजुरांना आमचा दंडवत सांगावा!
एकमाल : आणि आमचं फ्लायइंग चरणचुंबन आहे असं कळवावं!
हेजीब : आणि याठिकाणी दोंहोपैकी योग्य ते आमचंही कळवून टाकावं! (सांडणीस्वार मुजरा करत बाहेर जातो.)
पंत : (सांडणीस्वार गेल्याची खात्री करत) माफी असावी. पण लोग नाराज है। आउर वो बोम्बाबोम्ब करेले हय। ये बात ब्यादश्या के कान पर नहीं जानी चाहिए।
हेजीब : मैं तो बोलता, याठिकाणी उनके कानपर गुलशनाबाद के कांदेकी बोंबाबोंब बी जाने देनी चाहिए। नही तो अगली लढाई हम आजही हार जायेंगे। ऐसा समज लिजीए। काय?
पंत : (तोंडावर बोट ठेवत) श्शूऽऽऽ! ऐसा कूच नही करना। त्या स्वाराने चुकून ऐकलं आणि शामेनींच्या कानी तशी खबर गेली तर हुजुरांची गद्दी, आणि आपली मनसब खालसा व्हायची.
एकमाल : (भीतीने) हा पिछळी बार उन्होने दम भर्या था। उधरका लफडा उधरीच मिटाना बोलके। उसीच वास्ते मयने रिझर्वेशन की भालगड डोक्यावर ले ली थी। पण अब ४८ मैसे ३० हारे, तो उन्होने पुछा था, `जमेगा? या दुसरा बिठाऊ?’ भोत दम देते वो!
पंत : तर…! त्यांनी दख्खन सांभाळायलाच आपल्याला सांगितलंय आणि आपणच लोकं नाराज असल्याचं कसं सांगायचं?
एकमाल : आणि म्हणोन आम्ही म्हणत असतो सर्वसामान्यांच्या मनातले शोभेदार आम्हीच!!
हेजीब : (डोकं खाजवत) मग याठिकाणी आपण काय करणं अपेक्षित आहे ते सांगा!
पंत : तेच सांगतोय मी! चहापन्हा नौरंगजेब जी ने जो थैला याने बजेट कबूल किया है, उसमे यकीनन हमें कुछ बड़ा दिया है।
एकमाल : हां, हमने तो पैलेच बोला है, ये सर्वसामान्य पब्लिक के लिएच किया है, अऊर सबको भरगोस दिया है। और कुछ नही दिया होगा, तो यापेक्षा मोठ्ठा कुछ लाएंगे।
हेजीब : मी बी सांगतो की, याठिकाणी सगळ्या घटकांचा बारकाईने विचार करून माजोरे आलानीं आपल्याला हे… ते… सर्व दिलंय…!
पंत : ते तर घसा फोडून आम्ही सांगतोयच, पण लोकं हुशार झालीत हो. मागल्या वेळी असं काहीबाही सांगून सुद्धा आपल्याला ४८ पैकी ३० जगह पे हरना पडा था। लोग अब प्रूफ मांगते है।
(तितक्यात शिपाई आत येतो, मुजरा करतो, आणि तो काही बोलणार तोच त्याच्या फोनची रिंगटोन वाजू लागते, `किया, किया, क्या किया है रे सनम?’ शिपाई तावातावाने फोन उचलत `हां, मैं अंदर आया, ठयुव फोन’ म्हणत खेकसतो.)
एकमाल : (शिपायाकडे बघत) बोला, काय खबर?
शिपाई : हुजूर कोई फिआईडी से एसीपी डुमणे, भया, सोबजीत वगैरे आये है!
हेजीब : आता हे आणि कश्यासाठी आलेत?
पंत : हे बाड बघितलंत?
एकमाल : हां, ओ तो हम भी देख रहे है। काफी बडा हय ये!
पंत : तेच! आपल्या कोवळेंनी उचकून बघितलं, पण त्यांना आपल्या सुभ्याबद्दल काहीही सापडलं नाही. बिचार्यांना पहिल्याच खेपेला दिल्ली दरबारात मानाचं स्थान मिळालं आणि बजेटवर बोलायला सांगितलं तर रात्री फोन करून ढसाढसा रडले ते!
एकमाल : म्हणजे दख्खनसाठी काहीही नाही का यात?
पंत : नाही, दिल्ली दरबारातून सांगितलं म्हणजे यात दख्खनेसाठी काही मोठं असलंच पाहिजे. पण काय एक्झाट दिलंय, ते मात्र आपल्यालाच शोधावं लागेल.
हेजीब : आपल्याला? हे केव्हा ठरलं? आता सुभ्याची धनाची चिंता आम्ही वहायची आणि त्यात ह्या देखील चिंता वहायच्या का?
पंत : आपण उगा त्रागा करताय, हेजीबजी! (शिपायाकडे वळत) आपण डुमणेला बोलवा. (शिपाई मान हलवत बाहेर जातो. आणि त्याच्या जाण्यानंतर डुमणे आणि टीम आत प्रवेशते.)
भया : (डुमणेच्या कानात पुटपुटतो.) इथे कुठल्या गुन्ह्याचा तपास करायचा आहे?
डुमणे : (हळू आवाजात) भया, मुझे तो कुछ अलग मामला लग रहा है।
पंत : आपण आलात? येताना काही त्रास?
डुमणे : नाही, आम्हाला अॅडव्हेंचर्सची सवय असल्याने रस्ते आम्हाला फारसे आव्हानात्मक वाटले नाहीत. आणि बोटिंग साठी सर्व सामुग्री आम्ही घेऊनच फिरतो. फक्त सर्व प्रमुख शहरांना जोडणारे कालवे जरा खोल आणि रुंद केलेत तर त्यावर आम्ही मोठ्या क्रूझ वगैरे घेऊन मजेत फिरू शकू.
एकमाल : हो आता प्रायोगिक तत्त्वावर म्हम्है-गोयां दरम्यान सह्यकड्यांत कालवा खोदतोय आपण.
डुमणे : हुजूर, तो आज क्या हुकूम है?
पंत : हुकूम असा काही नाही. हुजुरांच्या समोर असलेलं हे बजेटचं बाड घेऊन त्यात आपल्या सुभ्यासाठी जे दिलंय ते हुडकून काढायचं आहे.
मेंडीस : (उगाच हसत) हॅऽऽऽ हॅऽऽऽ हॅ! पण नक्की दिलंय का काही?
हेजीब : (किंचित आवाज चढवत) तू नवखा आहेस का रे? शोधायला तुम्हाला बोलावलं आहे ना? मग हे काम कुणाचं?
डुमणे : काम तो हमारा ही है। और हम खोज भी लेंगे। लेकिन पोंछना भी तो हमारा ही काम है? काय पंत?
पंत : हा, आवरा जरा लवकर करा.
डुमणे : डॉ. काळुंखे, काय वाटतं? क्या लगता है तुम्हें? क्या इसमें सचमुच हमारे सुभे का नाम, या उसके बारे में कुछ लिखा है क्या? देखो।
(काळुंखे भिंगाच्या काचेतून बघत अधलंमधलं पान फाडतो. चावून बघतो. तोंड वेंगडत त्यातला एक तुकडा भिजवून स्लाईडवर घेऊन मायक्रोस्कोप खाली ठेवत पाहू लागतो.)
काळुंखे : ओह माय नौरंग! डुमणेजी जो कुछ है, वो बहुत ही शॉकिंग है।
डुमणे : शॉकिंग है, लेकीन शॉकिंग क्या है? बतावो जलदी!
काळुंखे : बॉस शॉकिंग ये है की इसे मायक्रोस्कोप की नीचे मैंने रखा। लेकीन कुछ मुझे अलग दिखा।
भया : सर, आप को जो कुछ दिखा है, वो खुलकर तो बताईये।
काळुंखे : हां, भै! बतातो रहा हूँ मैं। जरा सब्र से सुना करो।
(एकमाल, हेजीब आणि पंत कान देऊन ऐकू लागतात.)
डुमणे : हा जल्द बतावो, काळुंखे!
काळुंखे : बॉस, इसे मायक्रोस्कोप के नीचे देखणे की जरूरत ही नहीं है…
एकमाल : (न राहवून मध्येच) मतलब?
काळुंखे : हुजूर, इसमें जो लिखा है, वो हम सिधे खुली आँख से पढ़ सकते है।
हेजीब : (अधीरतेने) वाचा मग पटकन!
काळुंखे : इसपर कुछ बेमारु तथा अर्धा-मुर्धा के बारे में हर एक पन्ने पर लिखा है।
पंत : अरे पण त्यात आपल्या सुभ्यासाठी जे लिहिलंय ते बघण्यासाठी तुम्हाला बोलावलंय की रे!
डुमणे : काळुंखे, क्या कर रहा है तू? जो हमे करने बोला है कर दे तू!
काळुंखे : बॉस तो फिर इस केमिकल मे डुबो के देखते है हम! (बोलता बोलता तो कुठल्याशा द्रावणात बाड बुडवतो. त्यासरशी कागदं विरघळून द्रावणात नाहीशी होतात.)
भया : ये क्या हुवा, काळुंखेजी?
काळुंखे : शायद ये कागज, नेरजी के वक्त का होगा, इसलिए गल गया.
हेजीब : आता लोकांना काय दिलंय सांगायचं?
पंत : जुन्या बाटलीत नवी दारू!
एकमाल : म्हणजे?
पंत : जे आधी देणार म्हणालेले, ते आता देताय सांगू!
एकमाल : और इसमें से कुछ अगर मिल गया तो?
पंत : पुढल्या सालात सांगू! तशीही लोकांची मेमरी शॉर्टच असते.
डुमणे : भया, कुछ समज में आया?
भया : (गोंधळून) नाही!
डुमणे : इसका मतलब है, पंतजी लोकांत `बसतच’ नाही. वो आदमी है ही नहीं।