ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र वृश्चिक राशीत, रवि, मंगळ, बुध धनु राशीमध्ये. विशेष दिवस : ६ फेब्रुवारी षटतिला एकादशी, ७ फेब्रुवारी प्रदोष, ८ फेब्रुवारी शिवरात्री, ९ फेब्रुवारी अमावस्या प्रारंभ सकाळी ८.०२ वा., समाप्ती उत्तररात्री ४. २८ वा.
मेष : महत्वाचे निर्णय घेणे टाळा. आर्थिक नुकसान होईल. कामाशी एकनिष्ठ राहा. मित्र, नातेवाईकांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग व मानसिक त्रास होईल. नोकरीत कामाचा ओघ वाढेल. व्यावसायिकांना यश मिळेल. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीतसर्जकांना चांगला काळ राहील. शुभघटना कानावर पडेल. कुटुंबामध्ये सबुरीने घ्या, पती-पत्नीत वाद होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. बँकेतील कर्ज प्रकरणे पुढे सरकतील. उच्चशिक्षणात मनासारख्या घटना घडतील. आगामी काळ विद्यार्थी वर्गासाठी चांगला आहे.
वृषभ : शुभघटना कानावर पडतील. घरातील वातावरण आनंद देईल. पर्यटनाच्या निमित्ताने भ्रमंती होईल. व्यावसायिकांना अधिक कष्टांतून यश मिळेल. नव्या ओळखी कमी येतील. नोकरीत नव्या जबाबदारीमुळे वेळापत्रक विस्कळीत होईल. सामाजिक कार्यासाठी वेळ देताना भान ठेवा. नोकरी, व्यवसायात वेळेचे व्यवस्थापन करा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. न्यायालयातील दावे मार्गी लागतील. काहीजणांना आर्थिक लाभ होतील. खर्च वाढेल. सार्वजनिक ठिकाणी आततायीपणा टाळा.
मिथुन : नवीन गुंतवणुकीचा मोह थोडा टाळा. व्यवसाय सुरू करताना नियोजनपूर्वक पुढे जा. ज्येष्ठांबरोबर सल्लामसलत करा आणि निर्णय घ्या. तरूणांना मनासारखे यश मिळेल. कलाकार, गायकांना मानसन्मान मिळेल. घरात बंधूवर्गाबरोबर जमवून घ्या. महिलांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थीवर्गासाठी काळ चांगला राहील. खेळाडूंना यश मिळेल. व्यावसायिकांचे जुने येणे वसूल होईल. कामाचा उत्साह वाढेल. नव्या ऑर्डर मिळतील, आर्थिक बाजू भक्कम होईल.
कर्क : नोकरीत छोट्या कारणांमुळे वाद घडतील. सबुरीने घ्या. व्यावसायिकांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. या आठवड्यात ध्यान-धारणा, मनशांती यात मन रमवा. सरकारी कामे मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थीवर्गाला यश मिळेल, त्यासाठी बुद्धिकौशल्याचा वापर करा. काहीजणांना मामा-मावशीकडून लाभ होईल. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल.
सिंह : फसव्या प्रलोभनाला बळी पडू नका. व्यवसायात बौद्धिक कौशल्याच्या जोरावर काम मिळवा. नव्या संकल्पना राबवण्याआधी थोडे थांबून पुढे जा, आर्थिक नुकसान टळेल. मित्रमंडळी, नातेवाईकांना सल्ला दिल्यास गैरसमजाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. महिलांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी पैशाचे व्यवहार पाहात असाल तर काळजी घ्या. घाई-गडबडीत चूक होऊ शकते. कोणत्याही कामात अति उत्साह नको. काहींना जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल.
कन्या : अनपेक्षित घटना घडतील. नव्या संकल्पनेला चांगला आकार मिळेल. काम धीराने पूर्ण करा. भाऊ-बहिणीच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायातून आर्थिक बाजू भक्कम होईल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. काहींना नव्या नोकरीच्या संधी येतील. प्रमोशन, पगारवाढीबरोबरच कामासाठी बाहेरगावी अथवा विदेशात जाण्याच्या संधी मिळेल. समाजकार्य करणार्यांचे सत्कार होतील. मेडिकल, कृषी क्षेत्रात उत्तम काळ. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळा.
तूळ : नोकरीत कामाचे कौतुक होईल, त्याचे बक्षीस मिळेल. युवा वर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम राहील. काहींचा मानसिक त्रास वाढेल. दाम्पत्यजीवनातील वातावरण आनंदी राहील. मित्रमंडळींच्या माध्यमातून चांगले. लाभ मिळतील. शुभघटनांचा अनुभव येईल. सरकारी कामांत नियमाचे पालन करा.अन्यथा कायदेशीर कटकटी मागे लागतील. प्रवासात विशेष काळजी घ्या. नातेवाईकांशी कामापुरतेच बोला. महिलांना धनलाभ होईल.
वृश्चिक : जुन्या चुका पुन्हा करू नका. आपले काम जबाबदारीने पूर्ण करा, त्याचा भार इतरांवर टाकू नका. आईवडीलांबरोबर बोलताना काळजी घ्या. व्यवसायात तत्वांशी तडजोड करू नका. भागीदारीत कटकटी घडू शकतात. वास्तू, वाहन खरेदीत काळजी घ्या. थकीत येणे वसूल होईल. पैशाचा वापर करताना काळजी घ्या. संशोधन क्षेत्रात आणि खेळाडूंना स्पर्धेत चांगले यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. जमीन व्यवहारात अचानक लॉटरी लागेल. पण, खर्च नियंत्रित ठेवा.
धनु : कामात आत्मविश्वास आणि सहनशीलता याकडे विशेष लक्ष द्या. मनाविरुद्ध गोष्ट झाली तरी पुढे जा. नोकरीत वरिष्ठांच्या मताने चाला, आपले म्हणणे दामटू नका. तरुणांना चांगले अनुभव येतील. विदेशात शिक्षणाच्या संधी चालून येतील. अतिउत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. ध्यानधारणा, अध्यात्मामुळे मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांवर धनवर्षा होईल. नवीन ओळखींमधून मोठे काम मार्गी लागेल. घरात छोट्या समारंभात नातेवाईक, मित्रमंडळी यांची गाठभेट होईल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागू शकते.
मकर : घरातले वातावरण चांगले राहील. मुलाकडून चांगली बातमी कानावर पडेल. प्रेमप्रकरणात वाद टाळा. लॉटरी, सट्टा, शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. सरकारी कामे विलंबाने पूर्ण होतील. मानसिक स्वास्थ्य खराब होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आध्यत्मिक ठिकाणांना भेटी द्याल. प्रवासात चीजवस्तू सांभाळा. नोकरीत आपलेच म्हणणे बरोबर असा हट्ट करू नका. व्यवसायात जपूनच पावले टाका. उधार-उसनवारी टाळा. मालमत्तेच्या विषयांत आपले म्हणणे रेटू नका.
कुंभ : काहीजणांना संमिश्र घटनांचा अनुभव येईल. कामाच्या धावपळीत वेळेचे गणित बिघडून आरोग्यावर परिणाम होईल. युवा वर्गाला मनासारखे यश मिळेल. नोकरीत झटून काम करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. विदेशात व्यवसायविस्तार घडेल. व्यावसायिकांची आर्थिक बाजू भक्कम होईल. काहीजणांना कापेल, भाजेल. पैशाचे नियोजन करताना चूक होऊ शकत. अति आत्मविश्वासाने कोणतेही काम करू नका, आर्थिक नुकसान होईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
मीन : बुद्धिमतेच्या जोरावर यश मिळवाल. आर्थिक बाजू भक्कम होईल. मनासारखी कामे होतील. धार्मिक ठिकाणी भेट दिल्याने मानसिक शांती वाढेल. सकारात्मकता वाढेल. घरातले वातावरण उत्तम ठेवा. निसर्ग, पर्यावरण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. लेखक, पत्रकार, संगीत क्षेत्रात उत्तम काळ राहील. शुभ घटनांचा घडतील. दाम्पत्यजीवनात आनंद मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. मुलांच्या प्रगतीसाठी चांगला काळ. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.