□ गुजरातच्या जनतेची भाजपच्या तावडीतून सुटका होणार : केजरीवाल यांनी कोर्या कागदावर लिहून दिले.
■ नंतर ती ‘आप’ल्या तावडीतच सापडणार असेल तर उपयोग काय? तुम्हीही मोदींचे जत्रेत हरवलेले जुळे भाऊच आहात की!
□ निर्मला सीतारामन यांच्या बैठकीवर व्यापारी संघटनांचा बहिष्कार.
■ अरे देवा, म्हणजे हे उद्योजक-व्यावसायिकांचेच सरकार आहे, असे म्हटले जात होते, तेही खोटेच तर. हे ‘ते दोघे’ सोडल्यास आहेत तरी कोणाचे?
□ मुंबईत पाणी मुरणार्या पोरस काँक्रीटचे रस्ते बांधले जाणार.
■ म्हणजे आता दर वर्षी रस्ते खराब होणं, दर वर्षी दुरुस्तीची कंत्राटं निघणं थांबणार काय? त्या अर्थाने पाणी मुरणं थांबलं तर खरा अर्थ.
□ ‘मन की बात’मध्ये चक्क महात्मा गांधींना प्रिय भजन.
■ गुजरातच्या निवडणुका आहेत ना, त्यासाठी ही सगळी नौटंकी. मते मिळवण्यासाठी एखाद्या निवडणुकीसाठी ‘मन की बात’मध्ये अजानसुद्धा देतील.
□ कोरोनाच्या कठोर निर्बंधांमुळे चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात उठाव.
■ पुन्हा सरकारचे रणगाडे बाहेर येतील, पुन्हा काही नागरिक कायमचे गायब होतील, पुन्हा जिनपिंग कोर्या चेहर्याने राज्य करताना दिसतील…
□ रेल्वे प्रवासाला ज्येष्ठ नागरिक कंटाळले.
■ कनिष्ठ नागरिकसुद्धा हौसेने कुठे रेल्वेप्रवास करतात, तेही नाईलाजानेच लोकलची पायरी चढतात.
□ महाराष्ट्रात आसाम भवन बांधायला जागा देणार : मिंधे सरकारचा निर्णय.
■ एक प्रति कामाख्या मंदिरही बांधून घ्या… किती फेर्या मारणार ना राज्य कारभार सोडून तिकडे.
□ राज्य वार्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दारांसोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला.
■ इथून नमस्कार केला तर पोहोचत नाही का देवीला? तिथेच जावे लागते असा कसला तांत्रिक विधी करून आला आहात तिथे?
□ एखाद्या न्यायाधीशाने लोकांच्या भावनांशी संबंधित प्रश्नावर मतप्रदर्शन केले तर न्यायालयाने लक्ष्मण रेषा ओलांडली का, याचा विचार करावा लागेल : किरण रिजिजू.
■ तुमच्या पक्षाकडे लोकांच्या भावनांचा ठेका आहे का? तुम्ही न्यायालयांसंदर्भात लक्ष्मणरेषा ओलांडता तेव्हा? कळीच्या पदांवर आपले होयबा बिनबोभाट बसवता येत नाहीत, याची केवढी खदखद.
□ राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली, मग भाजपने नेहरूंवर टीका केली, हे आता थांबवा : राज ठाकरे.
■ राजसाहेब, क्रम चुकतोय. २०१४पासून भाजपने नेहरू-गांधी आणि काँग्रेसबद्दल धादांत खोटा प्रचार चालवला, त्याची प्रतिक्रिया आता कुठे उमटायला लागली आहे. हे थांबवायची जबाबदारीही भाजपचीच आहे.
□ देशावर दहशतवादी हल्ला झालेला असताना मतांसाठी काँग्रेस गप्प बसली : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ काहीही हं श्री. मोदी! तेव्हा बातम्या वाचत नव्हता का? आणि मतांसाठी गप्प बसायला इथे मतदान करायला पाकिस्तानातून मतदार येणार होते की इथले सगळे मुसलमान पाकिस्तानधार्जिणेच आहेत, अशी तुमची समजूत आहे? तुमच्याइतके फूटपाडू उद्योग तर ब्रिटिशांनीही केले नसतील.
□ खोक्यांचे सत्य लवकरच समोर येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ ते लोकांसमोर आलेलं आहेच. आणि कामाख्या देवीकडे काय मुहूर्त काढायला गेला होतात का? कशाला तारखा देता, आणा की समोर काय सत्य आहे तुमचे ते.
□ २० लाख नोकर्या देऊ : गुजरातमध्ये भाजपचे जाहीरनाम्यात आश्वासन.
■ अरेच्चा, २७ वर्षांत मोदींनी इकडून तिकडून फाळके मारून गुजरात घडवल्यानंतर पण २० लाख नोकर्यांची गरज आहेच.
□ महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले, आता पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ कर्नाटकला नेणार काय : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मिंध्यांना सवाल.
■ त्यांचे दिल्लीतले मालक पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्यानंतर नवा विठोबा आणि नवे समर्थ देणार असतील, त्याशिवाय का त्यांची तोंडं बंद आहेत बोम्मईच्या बोंबलाबोंबलीवर!