ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतु सिंह राशीत, राहू कुंभ राशीत, शनि, नेपच्युन मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, रवि, बुध कर्क राशीत, प्लुटो मकर राशीत. दिनविशेष : ५ ऑगस्ट पुत्रदा एकादशी, ६ ऑगस्ट प्रदोष, ८ ऑगस्ट नारळी पौर्णिमा.
– – –
मेष : बोलताना काळजी घ्या. नोकरीत मनाविरुद्ध घटनांचा त्रास होईल. महिलांनी आरोग्य सांभाळावे. तरुणांना नवी ऊर्जा मिळेल. मनातल्या गोष्टी पूर्ण होतील. नवीन घर घेण्याच्या दिशेने पावले पडतील. व्यवसायात अतिविश्वास दाखवू नका. विचार करा. मित्रांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा. नव्या व्यवसायाच्या संदर्भात घाई नको. आरोग्याकडे लक्ष द्या. संततीकडून चांगली बातमी कळेल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. घरात लहान चुका टाळा. शुभकार्यामुळे वातावरण आनंददायी राहील. खेळाडूंना यश मिळेल. ध्यान, वाचनातून आनंद मिळेल.
वृषभ : नोकरीत इकडचे तिकडे करू नका. घरात सामोपचाराने प्रश्न सोडवा. लॉटरी, सट्टा, शेअरपासून दूर राहा. घरात लहान समारंभ होईल. तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात संयम ठेवा. मालमत्तेच्या चर्चा पुढे ढकला. महिलांशी बोलताना काळजी घ्या. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. शिक्षक, प्राध्यापकांना यश मिळेल. घरात वातावरण चांगले ठेवा. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या. घरासाठी महागडी वस्तू घेण्याच्या मोहाला आवर घाला. बहीण भावाकडून चांगली साथ मिळेल.
मिथुन : प्रलंबित काम पूर्ण होईल. आर्थिक नियोजन करा. नोकरीत वरिष्ठांच्या कलानुसार घ्या. व्यवसायात मनासारखी कामे होतील. तरुणांच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. प्रवासात खिसापाकीट सांभाळा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कामाशी काम ठेवा. नातेवाईकांशी वाद होतील.मेडिकल क्षेत्रात चांगले दिवस येतील. नवीन ओळखींचा फायदा होईल.घरातल्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत सहलीला जाल. प्रवासात काळजी घ्या. शिक्षणक्षेत्रात चांगला काळ. वाणीवर नियंत्रण ठेवा. सबुरीनेच घ्या.
कर्क : आरोग्याची काळजी घ्या. अपघाताचा धोका आहे. कुटुंबाला वेळ द्याल, आनंद मिळेल. श्रावणात घरगुती कार्यक्रमात आप्तेष्ट भेटतील. प्रेम प्रकरणात वाद होतील. तुटेपर्यंत ताणू नका, मनस्वास्थ्य बिघडेल. तरुणांचा नावलौकिक वाढेल. हुरळून जाऊ नका. जुने आजार डोके वर काढतील. ध्यानातून सकारात्मकता वाढेल. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाऊ शकाल. महिलांना यश मिळेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मुलांकडे लक्ष द्या. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. नव्या नोकरीची संधी चालून येईल.
सिंह : मनस्वास्थ्य बिघडवणार्या घटनांकडे दुर्लक्ष करा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान लाभतील. कामाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने विदेशात यश कमावाल. ब्रोकरना यश मिळेल. व्यवसायात विचार करून पुढे जा. बाहेरचे खाणे टाळा. वडीलधार्यांचे आरोग्य सांभाळा. उधार-उसनवारी टाळा. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. तरुणांना यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरी मिळेल. काहीजणांना अचानक धनलाभ होऊ शकतो.
कन्या : आश्वासने देऊ नका. मुलांकडे लक्ष द्या. उच्चशिक्षणात यश मिळेल. व्यवसायात ताण जाणवेल. अडकलेल्या कामांसाठी थोरांचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. प्रवासात काळजी घ्या. तरुणांच्या मनाविरुद्ध घटना घडतील. श्रावणात देवदर्शन होईल. जुन्या ओळखींतून फायदा होईल. नोकरी व्यवसायातील फायद्याच्या गोष्टी जगजाहीर करू नका. नोकरीत वाहवा होईल. नवी जबाबदारी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना काळजी घ्या. अति आत्मविश्वास टाळा.
तूळ : आमदनी चांगली झाली तरी खर्च वाढेल. नोकरीत चुका होतील. घरात व वरिष्ठांशी वाद टाळा. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. व्यवसायाचा विदेशविस्तार वेगाने होईल. आठवड्याच्या मध्यास सुवार्ता कळेल. समाजकार्यात गौरव होईल. तरुणांना यश मिळेल. आवडीचे काम मिळेल. नवी गुंतवणूक कराल. भागीदारीत तणाव वाढेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नवे घर घेऊ शकाल. विमा, वित्त क्षेत्रात चांगला काळ. सरकारी कामे पूर्ण होतील. मित्रांना मदत करताना विचार करा. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. येणे वसूल होईल, खिशात पैसे राहतील. महिलांना यश मिळेल. प्रयत्न कमी पडून देऊ नका.
वृश्चिक : तरुणांना यश मिळेल. वाहन जपून चालवा. सरकारी कामांत संयम ठेवा. येणे वसूल होईल. उधार-उसनवारी टाळा. नोकरीत ताण वाढेल. कामाशी काम ठेवा. गोड बोलून कामे पूर्ण करा. व्यवसायात जबाबदारी वाढेल. घरात आर्थिक नियोजन बिघडेल. आपलेच म्हणणे रेटू नका. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. मनोकामना पूर्ण होतील. मामा-मावशीची मदत मिळेल. भावांचे सहकार्य मिळेल. लेखकांचा सन्मान होईल. समाजकार्यात मान वाढेल. नोकरीत दूरचे प्रवास कराल. आयटीत विदेशवारी घडेल.
धनु : तरुणांना यश मिळेल. आपलेच म्हणणे खरे करू नका. महिलांना काम मिळेल. विचारपूर्वक पाऊल उचला. व्यावसायिकांनी प्रतिक्रिया देणे टाळावे. नव्या ओळखीतून मोठे काम मार्गी लागेल. नोकरीत संयम कामी येईल. सामाजिक कार्यातून सकारात्मकता वाढेल. नवी नोकरी मिळेल. मित्रांशी चेष्टा-मस्करी नको. कलाकारांचा सन्मान होईल. पत्रकार, संपादक, संगीतकार, जनसंपर्क अधिकार्यांना चांगला काळ. स्पर्धात्मक यश मिळेल. इच्छा पूर्ण होतील. नव्या ओळखींतून कामे मिळतील. मुलांचे आरोग्य जपा.
मकर : मित्रांशी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. पत्नीशी जमवून घ्या. थंडीतापाचा त्रास होईल. व्यवसायात आडमुठेपणा टाळा. आठवड्याच्या दुसर्या टप्प्यात कंटाळा येईल. कामे अडकतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. संततीकडून सुवार्ता कळेल. नवी गुंतवणूक लाभदायक ठरेल. उधार-उसनवारी टाळा. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्टाची कामे लांबतील. खेळाडूंची चमकदार कामगिरी होईल. चित्रकार, शिल्पकारांना नव्या संधी येतील.
कुंभ : विचारसरणी स्वच्छ ठेवा, कामे पुढे जातील. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत विरोधी वातावरणाकडे लक्ष न देता कामावर भर द्या. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवसायात अधिक मेहनत घ्या. दूरचे प्रवास कराल. नियम सोडून काम करू नका. मित्रांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या. कलाकार, संगीतकारांना सन्मान देणारा काळ आहे. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा. सुगंधी द्रव्ये तयार करणार्यांना चांगला काळ. घरात चांगला संवाद ठेवा.
मीन : कायदा सोडून पुढे जाणे त्रासदायक ठरेल. चित्रकारांचा सन्मान होईल. शिक्षक, संशोधकांना नव्या संधी मिळतील. नवे घर घेण्याचा विषय पुढे सरकेल. व्यवसायात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. प्रमोशन, पगारवाढ होईल. पैसे मिळतील, गुंतवणूक काळजीपूर्वक करा. घरगुती कार्यक्रमात नातेवाईक भेटतील. मित्रांशी मतभेद होतील. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. घरातल्यांसह देवदर्शनासाठी बाहेर जाल.सामाजिक कार्यातून लौकिक मिळेल. बँकेची कामे मार्गी लावताना काळजी घ्या.