• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

दादांची दादागिरी

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 31, 2023
in टोचन
0

मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातील दादागिरी वाढत चालल्यामुळे रोजचे अपमान सहन करण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांना आपली ताकद दाखवून देऊ असं शिंदे गटातील एक सोडून सर्वांचीच मागणी आहे. पण आणखी एक्याऐंशी दिवस जाऊ दे, या एक्याऐंशी दिवसांत ऐक्य वाढीस लागलं नाही तर हा एकनाथ जिवाची बाजी लावून आपल्या गटाच्या एक्क्याची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन त्या एकने चिल्ल्यापिल्ल्यांना दिलं आहे. माझा मानलेला परममित्र पोक्या याने ही बातमी सांगताच मी त्याला ताबडतोब अजितदादांना भेटून आतली माहिती काढून घेण्याचा पोक्त सल्ला दिला. पोक्याने आपली कामगिरी चोख बजावली. तिचीच ही टेप…
– नमस्कार अजितदादा मंत्रिमंडळात आपली दादागिरी वाढत चालल्याचं काही प्रसंगांतून दिसतंय. त्यातून शिंदेंच्या बगलबच्च्यांना तुम्ही वेळोवेळी खूप डिवचता, तेही चारचौघात. शिंदेंनाही तुम्ही सोडत नाही हे प्रत्यक्ष दिसतंय.
– काय असेल ते सपष्ट बोला. मला सपष्ट बोलणारी माणसं आवडतात. माझ्या मनात जे जे येतं ते ते मी सपष्ट बोलतो. कुणाची भीडभाड ठेवत नाही. काकांनासुद्धा सोडलं नाही मी. मग हे तर सटर फटर. एकाचा तरी कणा ताठ आहे का? ते शिंदे तर सदानकदा चिंतेत असतात. डोक्यावर मणामणाचं ओझं असल्यासारखे. त्यांना टेन्शनमधून जागं करण्यासाठी काही दिवसांपूर्वी चारचौघात त्यांना तुमच्या ठाण्यात काय चाललंय, कळव्याच्या त्या हॉस्पिटलात २४ रुग्ण कसे काय मरतात, एवढाच सवाल केला, तर हडबडलेच आणि मूग गिळून गप्प बसले. आता मला त्यांना प्रश्न विचारायचा हक्क आहे की नाही? सीएम असले म्हणून काय झाले? मी पण दिपोटी सीएम आहे ना. उलट माझ्या पदात दोन अक्षरं जास्त आहेत. आणि मी काय काळजीपोटी विचारतो.
– पण दादा, इतर मंत्री, नेते, पत्रकार यांच्यासमोर वरिष्ठाला असे प्रश्न विचारणं म्हणजे त्यांना झापण्यासारखंच आहे ना…
– मी कुणाला वरिष्ठ वगैरे मानत नाही. अरे, दोन दिवसांत चोवीसजण मरतात म्हणजे काय! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात इतकी अंदाधुंदी! माझी तर हा प्रकार पाहून सटकलीच होती. माझ्या हातात असतं ना तर मी एकेका जबाबदार व्यक्तीला भर चौकात फासावर लटकवलं असतं. ते बेजबाबदार आरोग्यमंत्री. त्यांनी तर ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता किंवा सीएमनी त्यांना हाकलायला हवं होतं. हॉस्पिटलचा एवढा गलथान कारभार! गेली अनेक वर्षे तिथे हे असंच चालू आहे. काही वर्षांपूर्वी एका शिक्षिकेला वर्गातच फीट आल्यामुळे इतर शिक्षकांनी तिला त्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्यांच्याकडे डॉक्टर नाही, ऑक्सिजन सिलिंडर नाही आणि कोणी त्या बाईकडे लक्ष द्यायलाही तयार नाही. ती शुद्धीतच येत नव्हती. सगळे एकमेकांवर ढकलत होते. नर्ससुद्धा पेशंटला हात लावायला घाबरत होत्या. पेशंट कोमात तर गेला नाही ना, अशी भीती सोबतच्या शिक्षकांच्या मनात होती. अखेर त्यातील एका शिक्षकाने तिला रिक्षातून दुसर्‍या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवलं. तिथे ताबडतोब आयसीयूमध्ये नेऊन तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, म्हणून ती वाचली. मात्र, कळव्याच्या या इस्पितळात आजपर्यंत अशा अनागोंदी कारभारामुळे शेकडो रुग्ण दगावले आहेत. एवढ्या मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मरण इतकं स्वस्त झालं असेल तर माझ्यासारख्या तापट माणसाचं डोकं नाही भडकणार? म्हणून मी सीएमना जाब विचारला. यालाच तुम्ही दादागिरी म्हणत असाल तर अशी दादागिरी मी हजारदा करीन. माझ्या रक्तातच ती आहे. मला मेंगळट माणसं आवडत नाहीत. मी मुख्यमंत्री असतो तर एकेकाला चांगला धडा शिकवला असता. पण हे मुख्यमंत्री त्या हॉस्पिटलवाल्यांनाच दिलासा देतात.
– शांत व्हा. तुम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पार्टीलाही गेला नाहीत.
– मला अशा दिखाऊ खाण्यापिण्याच्या नाटकात रस नाही. कशाला पैशांची उधळपट्टी करता? तेवढ्याच पैशाचे टोमॅटो लोकांना फुकट वाटा ना… पुण्य तरी मिळेल.
– दादा, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनासुद्धा तुम्ही सीएमच्या समोरच झापलंत. ते शिंदेंना मुद्दाम ऐकवण्यासाठीच ना?
– मुळीच नाही. त्या भुसभुशीत बोलणार्‍या भुसेंना पाहिल्यावरच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. समजतात काय हे स्वत:ला? मंत्री झाले म्हणजे यांना बैलासारखी शिंग फुटली की आणखी एक अक्कलदाढ आली? आपण काय बरळतो याची थोडीतरी अक्कल नको? लोकांना कांद्याचे दर परवडत नसतील तर त्यांनी तो खाऊ नये, दोन-तीन महिने कांदा खाल्ला नाही तर काहीही बिघडणार नाही, असं हा भुसभुशीत मंत्री बोलला. असे नाकाने कांदे सोलणारे मंत्री आणि आमदार शिंदे गटात असल्यामुळेच अशी नको ती मुक्ताफळे ऐकण्याची पाळी जनतेवर आलीय. उद्या सगळेच अन्नपदार्थ महाग झाले तर हे लोकांना ‘परवडत नसेल तर खाऊ नका, उपाशी राहा’ असे सल्ले देतील. भरल्यापोटी ढेकर देणार्‍या या मंत्र्यांना आणि आमदारांना लोकांनी घरी बसवलं पाहिजे. तुम्ही पंचतारांकित हॉटेलात मेजवान्या झोडणार आणि लोकांना मात्र नको ते फुकटचे सल्ले देणार. उद्या लोकांनी तुम्हाला रस्त्यात जाब विचारला तर नाकाला कांदे लावण्याची पाळी येईल, एवढं लक्षात ठेवा.
– पण तुम्हीही पत्रकारांसमोर बोलताना, दादा भुसे यांना अशी विधानं टाळायला सांगू, असं म्हणालात. हे तर फारच सौम्य बोलणं होतं. आता बोलता आहात त्याच भाषेत तिथे त्यांना झाडायला हवं होतं.
– तुमच्यासमोर मी तसा परखडपणे बोलतो तसं चारचौघात बोलता येत नाही ना उपमुख्यमंत्र्याला. कुणावरही अन्याय होताना दिसला की माझ्या जिवाचा संताप होतो. मग तो माझ्यावर को होईना. त्रास देणार्‍यांना पण आपण घाबरत नाही. तो कीरकीर करणारा किरीट सोमय्या मला बघितलं की पळतो. चोराच्या मनात चांदणं. मी महिलांना रिस्पेक्ट देणारा माणूस आहे. पण तो शिंदे गटातला मंत्री गावित मासे खाणार्‍या महिला चिकन्या असतात असं काहीतरी म्हणाला आणि त्याने ऐश्वर्या रायचं उदाहरण दिलं. अमिताभ आणि अभिषेक तिथे असते तर पिक्चरमधली नव्हे तर खरी फायटिंग झाली असती तिथे. आणि पिक्चरचा दी एण्ड केला असता त्यांनी. देवा, वाचव रे जनतेला अशा मंत्र्यांपासून…

Previous Post

राशी भविष्य

Next Post

नाय, नो, नेव्हर…

Related Posts

टोचन

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023
टोचन

टेन्शन त्रिक टेन्शन

September 15, 2023
टोचन

मोदी चालले चंद्रावरऽऽ

September 9, 2023
टोचन

मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे

August 24, 2023
Next Post

नाय, नो, नेव्हर...

संकेत सरगर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.