• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सगळ्या देशाक एप्रिल फूल केला हा

- महेश केळुसकर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 31, 2022
in विनोदी लेख
0

लिवनार्‍याचा वाचणार्‍यास नमस्कार…
चिरंजीव थोरला बापू धोंडू पेडणेकर
उमर ५० व. र्‍हाणार गाढवनाका चाळ
खोली नं. ७८, भांडुप (पश्चिम) यास
आपला बापूस धोंडू राजाराम पेडणेकरचा अणेकोत्तम आशीर्वाद. तुला पत्र लिवायचा कारन म्हंजे येत्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी फाटफटी आंगुळी-बिंगुळी करून, आसलेल्यातले चांगले कपडे घालून हुतात्मा चौकात जाऊन हातीत मशाल घेतलेल्या क्रांतीवीरांची नाक घासून माफी मागून येणे. कारन की ज्या १०५ जनांनी मोरारजीच्ये गोळ्ये खावून संयुक्त महाराष्ट्राक मुंबय मिळवून दिल्यानी, त्या मोरारजीच्ये अवलादी मुंबैचो, मराठी मानसांचो नि महाराष्ट्राचो रातदिस अपमान करून हुदेव घालतहंत तो बगुन आमच्यासारक्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाता हा. तरी आमी थंड कसे? ह्यो प्रश्न माका पडलो हा.
बाप्या, मी तेवा मुंबैत कमला मिलमदी काम करीत हुतय. मोरारजी सरकारान मुंबय महाराष्ट्राक मिळणार नाय, अशी बडाय मारल्यान नी आमी पेटलंव. म्हतला आता ह्येचा धोतार फेडायचा. अरे ती तारीक पन माका आजुन आठवता. नवंबरच्या २१ तारखेक छप्पन साली सांजच्या टायमाक मुंबयतल्या शंबर सव्वाशे कापड गिरण्यातले आमी कामगार नि बाकीच्ये पांढरपेशे चर्चगेट नि बोरीबंदर सायडीनी घोषणा देत इले. पोलिसानी लाठीमार सुरू केलो. तरीव लोक हटनत म्हतल्यार मायझयानी मोरारजीच्या ऑर्डरपरमान गोळीबार सुरू केल्यानी. रक्ताच्यो चिळकांडये उडान उडान फ्लोरा फौंटनचो सगळो रस्तो तांबडोलाल झालो. माज्या पाठीर नि पायार पोलिसांच्या काठयांच्ये वळ आजुन आसत. तुज्या चुलत्यान हकडे कोर्टात केस सुरू केल्यान म्हनताना माका मुंबय सोडूची लागली नि हय ह्या वशाड्या गावात येवून र्‍हवाचा लागला. पन आज मुंबैत आसतंय तर एकेकाच्ये बोच्ये झेजरून काडलं आसतंय.
तुजो चुलतो म्हंजे माजो भाव नारायन हाल्ली येकदमच आवगल्यासारो करताहा. अरे साखर्‍या आंब्याची केस न्यायपरविष्ट आसताना, ह्यो गावात माज्या नावान बाँब मारीत फिरता. म्हंता, ‘सुप्रिम कोर्टाचो वकील लावचो लागलो तरी बेत्तर पन धोंडग्याक आंब्याची कोय पन खावूक देनार नाय.’ च्यामारी तुज्या- मी तेका च्यालेंज दिल्ला आसा बाप्या- ‘अरे नारग्या, सुप्रिम कोर्टात तुज्या बाजुन आंबो जालो तर मी, ता काय ता विंटरनॅसनल कोर्ट आसा तेंच्यापर्यंत जायन पन भोसडीच्या आंब्या बुडचो पतेरो पन तुका हलवूक देनार नाय.’ अन्याय झालो म्हंता आपल्यार.
अरे कसलो अन्याय नि कसलो न्याय? बाप्या, ह्यो नारगो काय स्वताक हृदयनाथ मंगेशकर समाजता की काय? की खोटा बोलान पन लगेच ह्येच्यार इस्वास ठेवून कोन पार्लमेंटात हेच्या बाजुन आवाज उठवनार? त्या मंगेसकरानी झय थय सांगुक सुर्वात केल्यानी की ते रेडवोत सर्विसला होते नि तेंका आठशे रुपये पगार होतो नि सावरकरांचा गाना केल्यानी म्हनून तेंका नोकरेवयना काडून टाकल्यानी- अरे मानसान बंडला मारायची म्हंजे किती मारायची- उलाटलाच ना अखेरीक सगळा तेंच्यावरच? रेडवोतल्या जुन्या लोकानी किलयर केल्यानी, हे रेडवोत कदीच नोकरेक नाय हुते. नी एकान तर सांगल्यान, त्या टायमाक तेंच्या टेशन डायरेकटराक पन तेवडो पगार नाय हुतो. आनि मग ह्येंच्या म्हंजे मंगेशकरांच्या सगळा आंगट इला. खुलाशे करुच्ये लागले. नारग्याक म्हतला, मेल्या खोट्याचा नाटा करुन चार दिस पेवशीत गावात पन जगाक म्हायती आसा की साखरो आंबो ह्या धोंडू पेडणेकराचोच आसा.
बाप्या, झिला अवंदु म्हागायन काय बाबा अगदी उच्छाद मांडल्यान हा. अरे कनकवलेच्या मंगळवारच्या बाजारात पूर्वी शंबराच्ये दोन नोटे खर्चूक दिस मावळायचो. आता पाचशेची नोट पाच मिन्टात खलास होवूक लागली. कोन म्हनता थकडे युक्रेन नि रशियाचा झेंगाट सुरू झाल्याकारणान हिकडे कनकवलेत म्हागाय वाडली. तो कोन पुतीन काय फुतीन लयच माजलो हा म्हंतत. मायझो कनकवलेत कदी इलो तर बाबलो गावकार काळ्या पायाची कोंबडी देवून असा देवपान करीत ना- तेका गडनदीच्या पुलावयना उडी मारुन जीव देवचो लागात. बाबलो लय पावरफुल मानुस हां. मी बाबा तेच्या वांगडा बरे संमंद ठेवन आसय. म्हंजे काय हा- म्हयन्या दोन म्हयन्यात तेका वैâतानाच्या अड्ड्यार न्हेवन तोंबयोभर फिलटवनी देयाची की काम झाला. आपनाक काय भय नाय तेच्या देवपनाचो.
बाप्या, काश्मिराक जावक किती पैशे लागतत रे? माका मराच्या आदी एकदा तरी काश्मिर बगुची विच्छा आसा. कित्याक म्हंशील तर थय काश्मिरात जमनी लय स्वस्त झालेत म्हंतत. म्हतला दर तरी काढून येवचा. आनि जमला तर फुडे मागे थय दोन-चार गुंठे जमीन घेयाची नि याक घर बांदुची विच्छा आसा. आपल्या गावात काय राम र्‍हवलो नाय रे आता. निसती भांडना नी किलेस. तेच्या परीस काश्मिरात जावून र्‍हवलेला बरा. फुडे मागे कोन तरी आपल्यार पिच्यर तरी काडीत.
बाकी मुंबैत हवापानी कसा काय? लय गर्मी होता काय रे? जळ्ळा कोकनात पन हाल्ली लय उकडाक लागला. कारन काय म्हंशीत तर येवडो लांबलचक हायवे केल्यानी पन गुलामानी रस्त्याच्या दोनव बाजुक जी झाडा-पेडा होती त्यातला याक शिल्लक ठेवूक नाय. मायझ्ये कोकणाचो कॅलीफोर्निया करतले. त्वांड बगा. गाळीफोर्निया मातर केल्यानी बगता-बगता. काय तो मध्यम बापूस नी का ते तेच्ये दोन लघु झील. जनु काय सगळो कोकण म्हंजे ह्येंच्या बापजाद्यांची इस्टेटच आसा अशा पद्धतीन दादागिरी करुक बगतत. पन लोक आता आयकान घेयत नाय रे तेंचा. तोंडार जबाब देतत.
आसो. आपनाक काय करुचा हा म्हना. जो करतलो तो भोगतलो. आपुन बा तेंच्या भानगडीत नाय. बाळ्याच्या सलुनात लॉक काय काय गजाली मारीत आसतत. मी कदी दाडी करुक गेलंय तर पयलोच पानाचो तोबरो भरून जातंय. म्हंजे कोनी काय इच्यारलनंच जर की ‘पैडणेकरानु, येसटीच्या संपार तुमचा मत काय?’ तर आपुन नुस्ता आं-आं करायचा, पन त्वांड उगडायचा नाय. कसा? बेस्ट आयडिया की नाय माजी?
– तर बाप्या, कोनी तुका जर सांगल्यान की आता अच्छे दिन येतले, तर एप्रिल फूल समजान सोडून देयाचा. कोनी म्हतल्यान १५ लाख मिळतले तर नुस्ता ह्यॅ-ह्यॅ करायचा. हिंदुस्तानात हिंदू नि मुंबयत मराठी मानुस हमेशा वरचडच र्‍हवनार, ध्येनात ठेव. मुंह में राम नि बगल में छुरी आसलेले नौटंके आपनाक एप्रिल फूल करुक बगतले पण आपला धनुश्य नि आपले बाण तयार ठेवायच्ये. देव रवळनाथ आपल्या पाठी आसा. काळजेचा कारन नाय. लिवनार्‍याचा वाचनार्‍यास नमस्कार.
खुशालेचा कार्ड धाड.
– तुजो बापूस
धोंडू रा. पेडणेकर

तीर्थरुप वडील धोंडू राजाराम पेडणेकर
यांच्ये शेवेसी बापूचा शिरसासटांग नमस्कार.
आपले पत्र पोचले व मजकूर समजला. तरी परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हंजे युक्रेन नि रशियाची लडाय सुरू झाल्याकारणानं कणकवलेत म्हागाय झालेली आसा, असा जे सांगतंत ते तुमका एप्रिल फूल करताहत, ह्या तुमी पन लक्षात घेने जरुरीचे आहे. कनकवलेत कोलापुरवरना कांदे-बटाटे, मिरची-बिरची, गुळ नी त्याल येता. लडाय खयव जगात सुरू झाली की यापारी लोक साठेबाजी करून मालाचे भाव वाडवतत, ह्या तुमका म्हायती व्हया. लडाय सुरु झाली की शेअर बाजार चडता नि कोसाळता, हया बरोबर. पन कांदे-बटाटे म्हाग होतत, ही बंडला आसत.
आनि तुमका काश्मिर म्हंजे काय काशीमीरा वाटला काय वो? तुमी काशिमिरात जमीन घेवची ठरवलात तरी थयले रेट आयकान तुमच्ये डोळे पांडरे व्हतीत नी चल्ले काश्मिरात जमीन घेवक-हा काश्मीरातला तीनशे सत्तर कलम कॅन्सल झाला, ह्या बरा झाला. पन थय तुमका शेतजमीन घेव्क येवची नाय. निस्ता घर बांदुन काय करतलास? आपा, आपल्या गावात काय राम र्‍हवलो नाय, असा तुमका वाटता. पन भांडना नि किलेस खयच्या गावात नाय आसत? हगल्या-मुतल्याक लोक जर कोर्टात जावक लागले तर गावचो विकास काय डोंबलाचो होतलो? समजदारी मंगता है. हाल्लीच मी बर्‍याच दिवसानी `काश्मिर फाईल्स’ नावाचो पिक्चर बगलंय. वसाड्या डायरेक्टरान सगळ्यांका `एप्रिल फूल’ बनवलेला आसा. थकडे कनकवलेत ह्यो पिच्चर लागलोच तर तुमी बगुक-बिगुक जाशात तर पैशे फुकट जातले, ह्या आताच सांगुन ठेवतंय. बदमाश लोग इस पिच्चर का पालीटिक्स कर रहे है. पन तेचो काय उपेग होयत असा वाटत नाय.
दिल्लीत जे कोन बसलेत, तेनी बाराव म्हयने लोकांका एप्रिल फूल करुचा ठरवलेला आसा. लोक पन अशे येडझये, स्वत:ची अक्कल न वापरता फुडार्‍यांवर इस्वास ठेव्न येकमेकाच्ये गळे कापूक लागलेत. करोनाच्या टायमाक उनात उबे र्‍हवलात तर व्हायरस खलास होनार, म्हणून सांगनारे मंत्री आमी बगले. कोनी म्तल्यान थाळये वाजवा- लोकांनी वाजवले. दिवे लावा- लोकांनी दिवे लावले. पन इतक्या करून गंगेतना हजारो मुडदे व्हावत गेलेच. आनि इतक्या होता लोक परत परत बेवकूफ बनवत घेवक तयार आसतच. आसोत बापडे. आता सगळी देवाक काळजी!
बाकी मुंबयच्या हवापान्याचा काय सांगायचा तुमका! अवो मुंबैत सद्या लय थंडी पडली हा. शेअर बाजार पडता ना तशी थंडी पडली हा. कुडकुडहत लॉक निसते. लोकानी आपापले एशीबिशी माळ्यार टाकल्यानी हत. सध्या स्वेटर-बिटर घातल्याशिवाय भायर पडाक नको मुंबैत. लयच दातार दात आपटाक लागले नी हुडहुडी भरान इली तर आमी मुलुंडवाल्या शेकोटीवाल्याची भाषणा आयकताव. तेच्याकडे मुंबैतल्या थंडीच्ये पुरावे आसत असा तो सांगता. लय आसत? म्हनून इच्यारला तर म्हनता ईडीकडे दिल्ले आसत. सगळो खुळ्यांचो बाजार. उद्या ह्यो सांगतलो. अमक्या-तमक्यान थंडी दडवन ठेवलेली आसा. की लगेच ईडीवाले धावलेच तेच्यार छापो मारुक. पर्वा एकाच्या फ्रीजमधील बर्फाच्ये चार जास्तीचे तुकडे मिळाले नि लगेच मुलुंडवाल्यान च्यानलवाल्यांका बाईट दिल्यान की ह्ये चार बर्फाचे तुकडे त्या इसमान दाऊदकडसून इकत घेतलेले आसत, आनि तेना १२ मार्च १९९३ पासून ते फ्रीजात दडवन ठेवलेले होते. तेवा सांगुचो मुद्दो काय आसा की मुंबयत थंडी आसा- आनि आमका मुलुंडवालो सांगताहा ता एप्रिल फूल वाटत आसला तरी तेच्या समाधानासाठी स्वेटर घालून बातमे बगुचे लागतहत.
आपानु, त्या साखर्‍या आंब्यावयना नार्‍याकाकाबरोबर जास्ती वादविवाद करू नकात. अवो कडू मानूस तो. तुमच्यार मारेकरी घालुक कमी करुचो नाय. शिरा पडो त्या आंब्यार. खय पोटार घेवन जातलो थय जावंदेत. तेचे दोनव झील इदवरे निघाले. ते झीलच तेका शेवटी धडो शिकवतले. आता पेवतहत. त्वांडाक येयत ता बडबडतहत. पन ह्या किती दिवस चलनार? पादर्‍यान ढुंगाण झाकल्यान तरी वास पसारताच.
आसो. आयेची तब्बेत कशी आहे कळविने. तशेच सुमनला सांगेन की पिंकी आनि पिंट्याचा रोज अब्यास घेने. मी यंदा मिरगाच्या टायमाला चार दिवस येन्याचा विच्यार करतो आहे. बाकी सर्व ठीक.
लिवनार्‍याचा वाचनार्‍यास नमस्कार.
आपला मुलगा
बापू धोंडू पेडणेकर

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

उपकरण शास्त्राचे प्रणेते डॉ. शंकरराव गोवारीकर

Related Posts

विनोदी लेख

पाटील

April 11, 2025
विनोदी लेख

वक्फ वक्फ की बात!

April 11, 2025
विनोदी लेख

आरोप सिद्ध झाला तर…

April 4, 2025
विनोदी लेख

शरण अंकल

March 28, 2025
Next Post

उपकरण शास्त्राचे प्रणेते डॉ. शंकरराव गोवारीकर

प्रोटिन रिच डायट : डाळी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.