• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पाणी इला रे…

- शिवप्रणव आळवणी (गावची गजाल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
September 30, 2021
in गावची गजाल
0

तेका उचलान खाली ठेवण्याच्या नादात निरंजनपंतांच्या डाव्या हातात असलेली गोमुत्राची बाटली सुटली आणि ती पुराच्या पाण्यात विलीन झाली. निरंजनपंत म्हणजे वेड्यासारखे ओरडूक लागले. ‘अरे माझा गोमुत्र पाण्यात पडला रे काढा रे कोणीतरी तेका’ असा म्हणत शोक करूक लागले. थयसर निरंजनपतांच्या शेजारीच रवत असलेल्या जनू नाडकर्ण्यान लगेच तेच्यावर एक शेरो मारून टाकलो, ‘पुराचा पाणी पवित्र झालां!’ निरंजनपंत काहीही न ऐकता मोठमोठ्यान ओरडंतंच होते, काय वेळान ते म्हणजे लहान पोरासारखे रडूकच लागले, ‘एवढा सांभाळून ठेवल्यानी होता ह्या गोमुत्र म्या! आता खयसून मिळात म्हाका ह्या पावन गोमुत्र?’
—-

निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नेते लोकांका बोलूक विषयांचा बंधन नसता. कुठल्याही म्हणजे अगदी कुठल्याही गोष्टींचो किंवा कुठल्याही गोष्टी घेऊन ते प्रचार करूक शकतंत. त्याचप्रमाणे विधानसभेत उपस्थित झालेल्या राज्यस्तरीय किंवा लोकसभेत उपस्थित झालेल्या देशस्तरीय प्रश्नांचो आणि नेतेमंडळी त्या प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी जा काय बोलतंत तेचो वास्तविक त्या प्रश्नांशी काहीही संबंध नसता, तसाच जनू नाडकर्णी आणि निरंजनपंतांच्या गोमूत्राच्या विषयाचो गावात येणार्‍या पुराशी काहीही संबंध नव्हतो. तरीही ते त्याविषयी अगदी पुराच्या परिस्थितीत सुध्दा बिनदिक्कत गावच्या चव्हाट्यावर उभे राहून कावळ्याच्या बापाशीसारखे काव काव करीत मनसोक्त वाद घालीत होते. पंढरी कामतान मधेच दम भरल्यासारखो केल्यानंतर त्या दोघांच्या चोचीतलो गोमुत्राचो विषय केळुरीत शिरत असलेल्या धरणाच्या पाण्यासारखो सळ सळ सळ सळ करत हवेत गेलो आणि तेचा बाष्पीकरण झाला थयसर आणि दोघे आपले लेंगे सांभाळीत सोडलेल्या वळूसारखे सैरावैरा धावूक लागले. पंढरी कामत स्वत: तेंका उपदेश देऊन सुद्धा दगडासारखो थयच खिळून रवलो आणि त्या दोघांका पळत असलेले पाहूक लागलो. तेवढ्यात धावत धावत बरोच पुढे पोहोचलेलो सदा गावडे मागे रवलेल्या केळुरीतल्या स्वयंघोषित लोकनेता पंढरी कामताका मोठमोठ्याने हाका देऊक लागला, ‘ओ कामतांनू आहो बघत काय रवलात? पाणी शिरता हा गावात हळू हळू, धावा लवकर.’ सदा गवड्यान पंढरी कामताका दुरून टाचणी मारली आणि या दगडाका थयसर पझर फुटलो आणि अ ओ ओ ओ असा आवाज करीत तो जो सुटलो, तो थेट आपल्या घराच्या पडवीत जाऊन थांबलो.
केळुरीत काही वेळापूर्वी हळू हळू येणार्‍या पाण्याची आता गती वाढत चाललेली होती. सगळे आमचे केळुरीकर ग्रामस्थ आपापल्या गच्च्यांवर आणि कौलांवर चढान आपलो जीव वाचवण्यासाठी बसलेले होते. तेवढ्यात हळू हळू पडत असलेल्या पावसान सुद्धा जोर धरलो. तेवढ्यात ‘एव्हरीडे विथ कृष्णा नाईक’चो संपादक, कार्यकर्तो, वरिष्ठ पत्रकार आणि सगळा काही असलेलो कृष्णा नाईक ‘म्या लगेच जाऊन येतंय, भिऊ नकोस तू निष्ठेन पत्रकारिता कर. म्या अस्सो जातंय, अस्सो परत येतंय’ असा कमल्या जवळकराच्या कानात सांगून पाणी गावात शिरण्याच्या आधी हो रणछोड कृष्णा नाईक रण सोडून जो सटकलेलो होता, तो अजूनपर्यंत काय थयसर इलेलो नव्हतो. हेका सगळेजण आमच्या केळुरीत त्रिशंकू म्हणायचे. कारण या कृष्णाचा घर धड केळुरीतही पडत नव्हता की धड आंबेरीतही पडत नव्हता. अगदी वेशीवर असा तेचा ता घर वजा तेच्या ‘एव्हरीडे विथ कृष्णा नाईक’चा ऑफिस होता.
तर हयसर आमचे सगळे केळुरी ग्रामस्थ आपल्या घरातील महत्वाचा सामान जसा की दागिने, रोख रक्कम काही महत्वाची कागदपत्रा आणि अजून बर्‍योच आपल्या हृदयाशी जोडलेल्यो किंवा आपल्या हृदयाक तोडलेल्यो पण हव्योहव्योशो वाटणार्‍यो अशो बर्‍योच वस्तू घेऊन बसलेले होते. दाजीकाका फडणीस एका हातात ‘माझी रजतपुष्पं’ हो तेंच्या एकूण पाच काव्यसंग्रहामधून एकत्र केलेल्या कवितांचो महाकव्यसंग्रह घेऊन बसलेले होते, तर दुसर्या हातात अजूनपर्यंत प्रकाशित न झालेला ‘काट्यांचा रस्ता, दाजीच्या खस्ता’ ह्या दाजीकाकांचा आत्मचरित्र होता. ह्या आत्मचरित्र दाजीकाकांनी ‘सर्फ इन युवर टर्फ’ या झिलू गावकाराच्या मुलाच्या म्हणजेच हितेश गावकराच्या सायबर कॅफेमधल्या रद्दीची पाना गोळा करून लिहिलेला होता. ‘निसर्गाच्या संसाधनांचो अपव्यय होता कामा नये’ ह्या दाजीकाकांचा स्पष्ट मत होता. ह्या दोन्ही ग्रंथांसाठी दाजीकाकान रेनकोट बॅग्स शिवून घेतलेल्यो होत्यो आणि त्याच रेनकोट बॅगांमधे दाजीकाकाने हे दोन्ही ग्रंथ सुरक्षित ठेवलेले होते. थयसर जनू नाडकर्ण्याने आपली कधीही बंद न होणारी छत्री कौलांवर उघडी करून ठेवेल्यानी होती आणि ती भिजू नये म्हणान तिच्यावर पिवळ्या रंगाची ताडपत्री घालून ठेवलेली होती. तेच्या घराजवळ दूरून पाहिला तर छत्री खयची आणि स्वत: जनू नाडकर्णी खयचो ह्या ओळखणा फारच कठीण होता. कारण त्याच रंगाची ताडपत्री जनून आपल्याही अंगाक गुंडाळलेली होती.
थयसर बाबूराव गोखले आणि विसुभाऊ जोशी या दोघांची घरा एकमेकाक जवळ असल्यामुळे ‘बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम’च्या तालावर तेना थयंच अंताक्षरी सुरू करून टाकल्यानी होती. दोघेही आपापल्या गच्चीवरती बसान मोठमोठ्यान गाणी म्हणत होते. तेवढ्यात कमल्या जवळकराने लगेच ‘म्या पाहिल्यान म्या ऐकल्यान आणि म्हाका आवडल्यान’ ह्या थयसरंच फेसबुकावर एक नवीन सदर सुरू करून टाकला आणि तेची पहिली ठळक बातमी होती, ‘वेळेचो सद्उपयोग करत विसुभाऊ आणि बाबूरावांनी घातलो अंताक्षरीचो घाट’. या हेडिंगाखाली त्या दोघांचो फोटो अंताक्षरी खेळतानाचो, खरा म्हणजे धो धो पडत असलेल्या पावसामुळे त्या फोटोत नुसत्यो विसुभाऊ आणि बाबूरावांच्या गच्च्यो तेवढ्यो दिसत होत्यो, त्याव्यतिरिक्त दुसरं काही दिसत नव्हता आणि विसुभाऊ आणि बाबुरावांची सुद्धा खेळताना थयसर बोंबंच होती. बाबूराव खयचासा पद म्हणायचे आणि ‘हा तुमका ध इलो’ असं म्हणत विसुभाऊंका सांगायचे आणि विसुभाऊ मगे धो धो पडणाऱ्या पावसामुळे काहीच न आयकू इल्यामुळे ध चो मा केल्यासारखे अगदी कुठल्याही अक्षरावरून पद म्हणूक सुरूवात करीत होते.
त्या बाजूक निरंजनपंत वालवलकर आपल्या एका हातात ‘गोमुत्र आणि विद्न्यान’ ह्या आचार्य पवित्रानंद स्वामी हेना लिहिलेला पुस्तक घेऊन कुटुंबियांका गोमुत्रावरची प्रवचनं देत होते, ‘एकदा का ह्या सगळा ओसरल्यान की मग आपला घर गोमुत्रान शिंपडून घेऊया आणि सगळ्यांनी या पवित्र अशा गोमुत्राचो अस्वाद घेऊया’. ‘बाल प्लज्योत गोमुत्ल पिवूक व्हया ना?’ खांद्यावर उचलान घेतलेल्या दोन वर्षांच्या नातवाक तेना हे सांगितला, मात्र त्या प्लजोतान निरंजनपंतांच्या झब्ब्यावर आपला मूत्र थयसरल्या थयसरंच विसर्जीत करून टाकला. तेका उचलान खाली ठेवण्याच्या नादात निरंजनपंतांच्या डाव्या हातात असलेली गोमुत्राची बाटली सुटली आणि ती पुराच्या पाण्यात विलीन झाली. निरंजनपंत म्हणजे वेड्यासारखे ओरडूक लागले. ‘अरे माझा गोमुत्र पाण्यात पडला रे काढा रे कोणीतरी तेका’ असा म्हणत शोक करूक लागले. थयसर निरंजनपतांच्या शेजारीच रवत असलेल्या जनू नाडकर्ण्यान लगेच तेच्यावर एक शेरो मारून टाकलो, ‘पुराचा पाणी पवित्र झालां!’ निरंजनपंत काहीही न ऐकता मोठमोठ्यान ओरडंतंच होते, काय वेळान ते म्हणजे लहान पोरासारखे रडूकच लागले, ‘एवढा सांभाळून ठेवल्यानी होता ह्या गोमुत्र म्या! आता खयसून मिळात म्हाका ह्या पावन गोमुत्र?’ ‘अहो काय तरी काय हो वालावलकर अहो सद्याच्या गोठ्यात चला उद्या आणि घ्या की हो पाहिजे तेवढा’, जनू नाडकर्णी. ‘अहो नाडकर्णी ह्या हरिद्वारातल्या एका दुर्मिळ गायीचा गोमुत्र होता. त्या दुर्मिळ गायीची सर सद्याच्या गायीक येणार हा काय?’ तेवढ्यात समोरच्याच घरातून धर्मा धाकणकर, ‘आता शोकसभा ठेवूक लागतली बहुतेक हेंच्या गोमुत्राच्या बाटलीची!’ असा आपल्या बायकोच्या कानात कुजबुजलो.
तेवढ्यात कमल्या जवळकराक आणखीन एक हेडलाईन मिळाल्यान. ‘म्या पाहिला पण वाईट वाटला’ या सदराखाली तेना ‘निरंजनपंतांचा गोमुत्र पाण्यात विलीन’ ही हेडलाईन लिहून टाकली आणि एका सराईत मिडियावाल्याप्रमाणे स्वत:च्या अगदी पायाक घासून गेलेल्या त्या गोमुत्राच्या डबीचा फोटो काढून तोसुद्धा पोस्ट करून टाकलो. ह्या सगळा होत असताना हळू हळू पावसानसुद्धा वेग कमी केलो आणि हळू हळू पाऊस पडूचोय बंद झालो. पाऊस बंद होऊन सुमारे चार एक तास झाले असतील. केळुरीवासीयांच्या घरात शिरलेलं पुराचा पाणीही आता हळू हळू ओसरूक लागल्यानी होता आणि केळुरीकर ग्रामस्थ आपल्या गच्चीवरून हळू हळू खाली उतरत होते.

– शिवप्रणव आळवणी

(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)

Previous Post

नारळाची पुरणपोळी, गेणसेले, निनावं

Next Post

नथ्याची मटक्याची शिकवणी

Related Posts

गावची गजाल

विसरणार नाही ना आपला संकल्प?

January 9, 2025
गावची गजाल

काय तरी घडूक व्हया

October 14, 2021
पाणी येता हा रे…
गावची गजाल

पाणी येता हा रे…

September 16, 2021
आता चर्चा होऊकंच व्हंयी
गावची गजाल

आता चर्चा होऊकंच व्हंयी

September 2, 2021
Next Post

नथ्याची मटक्याची शिकवणी

असुरमर्दिनी, विघ्ननाशिनी

असुरमर्दिनी, विघ्ननाशिनी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.