अशी आहे ग्रहस्थिती
राहू- वृषभेत, रवी-मंगळ-बुध (वक्री) कन्येत, (मंगळ अस्त), शुक्र -केतू वृश्चिकेत, गुरु-शनी-प्लूटो (वक्री) – मकरेत, नेपच्युन (वक्री) – कुंभेत, हर्षल (वक्री) मेषेत, चंद्र सप्ताहाच्या सुरुवातीस कर्वेâत, त्यानंतर सिंह आणि कन्येत. ७ ते ९ ऑक्टोबर शनी स्तंभी. ६ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या, ७ ऑक्टोबर शारदीय नवरात्र आरंभ.
—-
मेष – राशीस्वामी मंगळ षष्ठम भावामध्ये अस्त, रवी-मंगळ युती, वक्री बुध अशी ग्रहस्थिती आहे, त्यामुळे कोणतीही टोकाची भूमिका घेताना विचार करा. भाऊबंदकीमधील कौटुंबिक विषय योग्य रितीने हाताळावे लागतील. हितशत्रूचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. पोटासंदर्भातील आजार उद्भवतील. पाठीमागे बोलणारे लोक नाहक बदनामी करतील, अशी जरी परिस्थिती असली तरी तुमच्या निर्भीड स्वभावामुळे शत्रू तुमच्यापुढे नतमस्तक होतील. विक्री शनी, गुरु-प्लुटोची वक्रदृष्टी सुखस्थानावर आहे, त्यामुळे हितसंबंध जपावे लागतील. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
वृषभ – एखाद्या ठिकाणी प्रेमात पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नसती आफत ओढवू शकते. वैवाहिक जीवनात कोणतीही नवीन समस्या उद्भवणार नाहीत याची प्रकर्षाने काळजी घ्या. योगकारक शनी आणि गुरुचे भाग्यातील भ्रमण, रवी-मंगळ-बुद्ध नवपंचम योग विद्यार्थीवर्गास शिक्षण बरोबरच सर्वच क्षेत्रात पोषक वातावरण राहील. धार्मिक कार्याच्या निमित्ताने एखादा छोटा प्रवास घडण्याचे योग जुळून येत आहेत. सामाजिक कार्यातील सहभागामुळे नावलौकिक वाढू शकेल. अनपेक्षित धनलाभ मिळतील. नवीन वस्तूची खरेदी होईल. बंधू वर्गाकडून सहकार्य प्राप्त होईल. अनावश्यक खर्च टाळा. कुठेही उधार उसनवारी करू नका. ते महागात पडू शकते.
मिथुन – तुमचा वेळ येत्या आठवड्यात कौटुंबिक कार्यक्रमात जाणार आहे. नातेवाईक मंडळींचा सहवास लाभेल. चतुर्थातील मंगळ उत्साह वाढेल. एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेताना कोणतीही गडबड करू नका. ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्या. कोणत्या तरी कारणानिमित्त प्रसिद्धी माध्यमात झळकण्याचे योग जमून येत आहेत. अहतमातील वक्री गुरु- शनी- प्लूटो यांचा रवी बुधाबरोबरचा नवपंचम योग यामुळे संशोधन आणि विकास क्षेत्रात तुम्हाला घवघवीत यश पदरात पडेल. अस्थमा असणार्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
कर्क – तुम्ही कुणाच्या प्रेमात पडला असताल तर या आठवड्यात चांगले दिवस अनुभवायास मिळणार आहेत. मात्र, पंचमातील वृश्चिकेचा शुक्र केतुमुळे ‘गहरे प्यार में मत फसो’ हा सल्ला तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. पराक्रमात असणारा मंगल तुम्हाला नको ते धारिष्ट्य करायला लावेल. त्यामुळे प्रत्येक कृती करताना सावधानता बाळगा. सप्तमातील वक्री शनी-प्लूटो -गुरूमुळे हितसंबंधात बाधा येऊ शकते. आपल्या सहकार्यांबरोबर भागीदारांबरोबर आपले संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.
सिंह – आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस सौख्य आणि आनंददायी जाणार आहेत. अमावस्येच्या काळात एखादी मानसिक चिंता सतावू शकते. एखादा जुना वाद पुन्हा डोके वर काढू शकतो. त्यामुळे थोडे सबुरीने घ्याल तर फायद्यात राहाल. ध्यानधारणा, ईश्वरी चिंतन या मध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा. अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येत आहेत. शेअर, फंड यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे, भविष्याचा विचार करून गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळेल.
कन्या – कोणताही मोठा निर्णय घेताना काळजी घ्या, तुमच्यामध्ये निर्णय क्षमतेचा अभाव जाणवेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य तो विचार करूनच घ्या. पंचमातील शनी-गुरुचे वक्री भ्रमणामुळे संततीबाबतची चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. काहीजणांवर आपला निर्णय पुढे ढकलण्याची वेळ येऊ शकते. घरामध्ये कुरबुरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देवाचे नाव घ्या आणि शांत राहा.
तूळ – तुमच्या खिशात चांगले पैसे राहणार आहेत. आर्थिक आवक मनासारखी राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष द्या, नजरचुकीने झालेली एखादी चूक महागात पडू शकते. तुम्ही कोणता व्यवसाय करत असतात तर तुम्हाला त्यानिमित्त परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. एखाद्या कामात अचानकपणे अनपेक्षित यश मिळेल, त्यामुळे चेहर्यावर आनंद राहील. घरात हेवेदावे, कौटुंबिक कलह वाढू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.
वृश्चिक – अनपेक्षित लाभाचा आठवडा आहे. लाभातील वक्री बुधाचे भ्रमण फायदा मिळवण्यासाठी अनुकूल राहणार आहे. सट्टा, लॉटरी, शेअर बाजारात लाभ होण्याचे संकेत. नोकरीमध्ये बढती मिळेल. पगारवाढ होईल. एखाद्या उद्योग समूह, संचालक मंडळात महत्वाची जबाबदारी मिळेल. अमावस्या विशेष लाभाची राहणार आहे. कौटुंबिक खर्चात भर पडेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल.
धनु – धन स्थानातील वक्री राशीस्वामी गुरुचे भ्रमण त्यामुळे आर्थिक आवक बेताची राहील. दशमातल्या रवी-मंगळाच्या युतीमुळे व्यवसायात यश मिळेल. गुरु शनीचे रवी मंगळ बुधाबरोबरचा नवपंचम योग तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अनुकूल राहणार आहे. राजकीय क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचा दबदबा वाढणार आहे. एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. नोकरीमध्ये असाल तर कामाच्या साठी बाहेगावी जावे लागू शकते. आवेशाने बोलणे टाळा.
मकर – या आठवड्यात तुमचे कार्य सिद्धीस जाणार आहे. योगकारक शुक्राचे लाभतील भ्रमण अनपेक्षित लाभ मिळवून देतील. मुलानांकडून सकारात्मक प्रगती दिसेल. भाग्यातील रवी-बुधदित्या योगामुळे ५ आणि ६ तारखेची अमावास्या संस्मरणीय राहणार आहे. शनी महाराजांची वक्री गती आता थोड्या दिवसात मार्गी होणार आहे, त्यामुळे संयम ठेवा आणि पुढे चालत राहा, योग्य मार्ग सापडेल.
कुंभ – कामाच्या नियमितणे परदेशात जाण्याचा योग जमून येत आहे. त्यामुळे आतापासून तयारी सुरु करा. व्यवसाय करणार्या मंडळींना एखादे मोठे कंत्राट मिळू शकते. मात्र त्यामध्ये आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन पाऊल टाका. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सट्टा बाजारापासून लांब राहा. पित्ताचा त्रास असेल तर अमावस्येचा दिवस सांभाळा. आहारात कोणतीही जोखीम घेऊ नका. तिखट, मसालेदार पदार्थ टाळा.
मीन – राशीस्वामी गुरुचे लाभतील वक्री भ्रमण अपेक्षापूर्तीचे राहणार असले तरी घरामध्ये गैरसमजातून कलह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. चंद्र, नेपच्युन प्रतियुतीमुळे मनातील संभ्रमावस्था वाढेल. भाग्यातील शुक्र- केतू योगामुळे गर्विष्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे थोडी काळजी घ्या. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार डोक्यात सुरु असेल तर थोडे थांबा आणि निर्णय घ्या.