• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

दृष्टीपलीकडचे दाखवून जाणारा `स्पर्श?’

- गुरुदत्त सोनसुरकर (डीएसपी)

गुरुदत्त सोनसुरकर by गुरुदत्त सोनसुरकर
September 30, 2021
in डिरेक्टर्स स्पेशल
0
दृष्टीपलीकडचे दाखवून जाणारा `स्पर्श?’

स्पर्श १९८०. आज एकेचाळीस वर्षांनंतरही आपल्यासारख्या तथाकथित डोळसांना खरी दृष्टी देणारा सिनेमा. दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे यांची पहिली फुल लेंथ फिल्म. स्पर्श बघताना आपण अलगद दुसर्‍या बाजूला जातो. चित्रपट डोळ्यांनी बघता बघता डोळेच विसरून जायला लागतो. दृष्टीपलीकडे बघायला, उमजायला लावणारा सिनेमा आहे स्पर्श. लेखिका दिग्दर्शिका सई परांजपेंचा एक क्रिएटिव्ह ब्रिलियंस आहे.
—-

`दूरदर्शन’मध्ये काम करत असताना तिथल्या एस. एन. मूर्ती या दिग्दर्शक साहेबांनी मला बोलावून सांगितलं, `सई, जागतिक अपंग दिन येतोय. इथे अंध विद्यार्थ्यांची शाळा आहे. काहीतरी शॉर्ट फिल्म बनवून ये.’ सई परांजपे सांगतात. `दृष्टिहीन लोकांना पाहून मुळातच मला प्रचंड वाईट वाटायचं. मी मूर्ती साहेबांना नकार देण्याचा प्रयत्न केला पण…’ सई परांजपे त्या अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचल्या ते मनात एक दडपण घेऊनच. आणि त्या आवारात पहिलंच दृश्य त्यांनी बघितलं ते म्हणजे दहा बारा अंध मुलं, दोन गटात विभागून रस्सीखेच खेळत होती. आरडाओरडा, गोंधळ, जोरजोरात हसत.
`अगदी नॉर्मल…’ सई म्हणतात `अगदी नॉर्मल मुलांसारखी त्यांची मस्ती चालली होती. आणि मी माझ्या मनातली कणव तिथेच विसरून गेले.’
`एक शब्द आप जितनी जल्दी भुले अच्छा हैं… और वो हैं… बेचारे.’ अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचा अंध मुख्याध्यापक अनिरुद्ध परमार, शाळेत मुलांना नाट्य, गायन वगैरे शिकवायला तयार झालेल्या कविता प्रसाद हिला नम्र आणि ठामपणे सांगतो.
स्पर्श १९८०. आज एकेचाळीस वर्षांनंतरही आपल्यासारख्या तथाकथित डोळसांना खरी दृष्टी देणारा सिनेमा. दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे यांची पहिली फुल लेंथ फिल्म.
दूरदर्शनसाठी तो माहितीपट बनवल्यानंतरही सईंच्या मनात दृष्टिहीन लोकांचा विषय घोळत राहिला आणि त्यांनी `रैना बीती जाय’ नावाची टेलेफिल्म केली. ज्यात कुलभूषण खरबंदा यांनी त्या अंध मुख्याध्यापकाची भूमिका निभावली होती तर सुषमा सेठ यांनी शिक्षिकेची. याच टेलेफिल्मचा बनला स्पर्श.
`स्पर्श’ची कथा आहे कविता प्रसाद या अकाली वैधव्य आलेल्या तरुणीची आणि नवजीवन अंधविद्यालयाचा दृष्टिहीन मुख्याध्यापक अनिरुद्ध परमार याची. योगायोगाने भेटलेले हे दोघे कामाच्या निमित्ताने एकत्र येतात. तीन वर्षापूर्वी झालेल्या पतीच्या निधनाने कविता अजूनही शोकाकुल आहे. घरातला बगीचा आणि गायन यात तिने स्वतःला रमवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे अनिरुद्ध हा अतिशय हुशार आणि अंध शाळेच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेला तरूण. अंध असला तरी सहानुभूतीची चीड असलेला स्वावलंबी माणूस. एकत्र काम करता करता कविता अनिरुद्धच्या प्रेमात पडते आणि दोघं लग्न करायचं ठरवतात. पण कोणावरही अवलंबून नसलेल्या अनिरुद्धला हे कविताने त्याच्याकरता केलेलं बलिदान वाटू लागतं, तडजोड वाटू लागते आणि तो हे लग्न मोडतो. इतकंच नाही तर कविताला आपल्या आयुष्यातून, नवजीवन अंधविद्यालयातूनही हद्दपार करतो. आणि मग…
अतिशय साधी प्रेमकथा. पण एक पात्र दृष्टिहीन आणि एक बघू शकणारं अशी दोन खरंतर वेगळ्या जगातली मोट बांधणारी. आणि त्या जोडीला अंध व्यक्तींचं जगणं, त्यांचं भावविश्व उलगडून सांगणारी. शारीरिकदृष्ट्या अक्षम, अपंग मग तो कुठलाही अवयव असो, व्यक्ती इतर धडधाकट समाजापेक्षा वेगळी पडते. आणि तिला समाजही वेगळा पाडतो. कधी सहानुभूती तर कधी कुचेष्टा, कधी मदत नाकारणं असं करत. त्यात हे व्यंग म्हणजे अंधत्व असेल तर मग समाजाची सहानुभूती ही टोकाची असते आणि साथ न देणंसुद्धा. त्यामुळेच जेव्हा कवितासारखी एखादी मनापासून सोबत उभी राहते, तेव्हा एखादा अनिरुद्ध डगमगतो.
पण दिग्दर्शिका सई परांजपे यांनी कुठेही कुठल्याच बाजूवर दोषारोप केलेला नाहीये. अनिरुद्धच्या कार्यालयात चहा आल्यावर त्याला चहा ओतून द्यायला उठणारी कविता किंवा रेस्टॉरंटमध्ये अनिरुद्धऐवजी कविताला बिल देऊन `इन्हे दिखता नहीं हैं इसके लिये मॅडम को बिल दिया.’ म्हणणारा वेटर असो. दोन्ही आपल्याच सहजप्रवृत्ती आहेत. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या. परंतु त्या ओघात आपण समोरच्याचा आत्मसन्मानावर चुकून आघात करत नाही आहोत ना, असा विचार आपल्या समाजात कधी केलाच गेलेला नाहीये. गरजूंना मदत करून त्याचा गवगवा करणे ही आपली समाजमान्य पद्धत आहे. जेव्हा आपण गरजवंत असतो तेव्हा?…
स्पर्श बघताना आपण अलगद दुसर्‍या बाजूला जातो. चित्रपट डोळ्यांनी बघता बघता डोळेच विसरून जायला लागतो. दृष्टीपलीकडे बघायला, उमजायला लावणारा सिनेमा आहे स्पर्श. लेखिका दिग्दर्शिका सई परांजपेंचा एक क्रिएटिव्ह ब्रिलियंस आहे.
अगदी सुरुवातीचा प्रसंग आहे. चित्रपट सुरू होतो तेव्हा एक लहान मुलगा झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा धडा जोरजोरात वाचतोय. हळूहळू काठीने चाचपत प्रिन्सिपल अनिरुद्ध तिकडे येतो. आणि त्या अंध विद्यार्थ्याला आपल्यासह घेऊन जातो. पार्श्वभूमीवर बासुरीचे सुरेल सुर आहेत. हा प्रसंग पाहिल्यानंतर एक जाणवतं. कितीजणांनी प्रत्यक्षात राणी लक्ष्मीबाईंना पाहिलं असेल? आपण जे काही वाचतो, ऐकतो त्यावरून न पाहिलेल्या गोष्टींची कल्पना करतो. ज्याप्रमाणे एखादी नेत्रहीन व्यक्ती समोर बोलणारे कसे दिसत असतील याची कल्पना करतात. एका अर्थी न पाहिलेल्या गोष्टींबद्दल फक्त कल्पना करून अनुभव करणे या पातळीवर अंध आणि पाहू शकणारे यात कितीसा फरक आहे? उलट अंध व्यक्तींना दुनिया पाहण्याचे दरवाजे बंद झाले की त्यांच्या इतर जाणिवांच्या क्षमता अधिक काम करतात.
अनिरुद्ध आणि कविता यांच्यामधले नाजूक बंध मोहरत असतानाचा प्रसंग. दोघेही सुंदर हिरवळीवर बसले आहेत. अनिरुद्ध कविताला विचारतो, `तू सुंदर आहेस का?’ उत्तरादाखल कविता त्याला आपल्या केसांचं, डोळ्यांचं, ओठांचं, रंगाचं वर्णन सांगते. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, `माझ्यासाठी हे सगळं काही उपयोगाचं नाही. मला तू आवडतेस कारण तुझ्या केसांचा, तुझा गंध अतिशय मोहक आहे. निशिगंधाप्रमाणे…’
अंध मुलांनी बनवलेल्या मेणबत्त्या घेताना कविता एका नजाकतीने बनवलेल्या मेणबत्तीचं कौतुक करते, तेव्हा ती मेणबत्ती बनवणारा लहानगा आंधळा मुलगा कविताच्या साडीला स्पर्श करून म्हणतो, `आपकी साडी बहोत सुंदर हैं.’
चाचपडत चालणार्‍या या जगातल्या लोकांसाठी किती महत्त्वाचा असतो एक साधा स्पर्श.
वयाच्या आठव्या वर्षी `मुलांचा मेवा’ हे लहान मुलांच्या गोष्टींचं पुस्तक लिहिणार्‍या सई परांजपेंच्या `स्पर्श’मध्ये वेगळ्याच पातळीची प्रगल्भता आढळते. एके ठिकाणी आम्हाला समाजाने स्वीकारावं, दया नको मदत हवी म्हणणार्‍या समूहाचा अनिरुद्ध प्रतिनिधी आहे, पण त्याच वेळी `तुझ्या सतत येण्याने आमच्या आयुष्यात व्यत्यय येतो’ असं कविताला म्हणून तो दोन्ही जग वेगळे असल्याचंही सूचित करतो. इथे सईंनी पपलू या लहान मुलाच्या पात्राचीही हुशारीने योजना केलीय. हा पपलू अंध नाहीये. हा तिथल्या कॅन्टीनवाल्याचा पुतण्या. पपलू इथेच अंध मुलांबरोबर खेळतो. त्यांना गोष्टी सांगतो आणि खूप दंगा करतो. त्याला कविता -आंटी खूप आवडते, पण कविताआंटी त्याच्यापेक्षा इतर मुलांकडे जास्त लक्ष देते अशी त्याची मनोमन तक्रार आहे; कारण ते सगळे दृष्टिहीन आहेत आणि हा एकटाच डोळे शाबूत असणारा. त्याच्या प्रिय मित्राशी, रामप्यारेशी मारामारी करताना तो डोळे मिटून घेतो. तरीही कविता आंटीचा मार त्यालाच पडतो. नवजीवन अंध विद्यालयाच्या या जगात तो एकटा पडलाय. माणसाच्या समदुःखी असण्याने किंवा समान दुव्याने जोडल्या जाणार्‍या समूहवृत्तीला कोणीही अपवाद नाही.
इथे कविता हे पात्र फार वरचढ ठरतं ते तिच्या अनिरुद्धवरील आत्यंतिक तरीही समंजस प्रेमाने. अनिरुद्धच्या सुरुवातीला काहीशा चिडखोर वाटणार्‍या वागण्याला ती व्यवस्थित समजून घेते. आपल्या नकळत असंवेदशील वागण्या -बोलण्यातून अनिरुद्ध किंवा अपंग व्यक्ती दुखावल्या जातात हे लक्षात घेऊन स्वतःमध्ये त्या त्या सुधारणा करणारी, अनिरुध्दचा नकार दुखःद अंतकरणाने मान्य करणारी, ब्रेल लिपी शिकून अनिरुद्धला पत्र लिहिणारी कविता हे वेगळंच रसायन आहे.
अनिरुद्ध हा आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणारा माणूस आहे. हुशार, लाघवी, हजरजबाबी पण शीघ्रकोपीसुद्धा. त्याच्या दृष्टीने (आपण दृष्टी हा शब्द किती गृहीत धरलेला असतो बघा) त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचं आयुष्य हे कुणावरही अवलंबून असलेलं नव्हतं, जे कविता आल्याने झालेलं आहे किंवा होत आहे. शिवाय कविताच्या बोलण्यातून येणारा ध्येयवाद हा त्याला आपण कविताच्या त्या ध्येयवादाचं एक उदाहरण म्हणून वापरले जाऊ अशी भीती घालणारा आहे. प्रेमापेक्षा कविता एक बलिदान करतेय अशी त्याला सार्थ भीती आहे. मेरे लिये गांधारी मत बनो असं एका क्षणी तो तिला तळमळीनं सांगतो.
दोन विजोड लोकांच्या या गोष्टीत मानवी जीवनातल्या अनेक गोष्टींचा अगदी सहज सुंदर ऊहापोह आहे, विचार आहे. एकीकडे अनिरुद्ध शारीरिक पातळीवर विकल आहे, तर एकीकडे कविता मानसिक पातळीवर. मनाच्या दुखण्याला आपण फार गंभीरतेने घेत नाही, पण शारीरिक वैगुण्याला नको इतकी सहानुभूती दाखवतो, इतकी की शारीरिक वैगुण्य हा शाप वाटावा.
सई परांजपे यांच्या या अप्रतिम सिनेमाला अत्युच्च शिखरावर नेलेलं आहे अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी. अनिरुद्ध परमार ही भूमिका ज्या खर्‍याखुर्‍या अंध मुख्याध्यापक मित्तल यांच्यावर बेतली होती, त्यांच्याबरोबर राहून जणू नसीरुद्दीन यांनी परकाया प्रवेश केला, इतकी अस्सल भूमिका वठवली आहे त्यांनी. अंध माणसं ऐकताना अतिशय काळजीपूर्वक ऐकतात, कारण एखाद्या गोष्टीचं आकलन होण्याकरता व्यवस्थित स्पष्ट ऐकणं ही त्यांची प्राथमिकता असते. त्यामुळे त्यांची उभं राहण्याची, ऐकण्याची, हसण्याची, बोलण्याची ढब वेगळी असते. आपण कसे दिसत आहोत ही भावना नसल्याने थोडीशी विचित्र वाटेल अशी शरीरभाषा, थोडं जोरात बोलणं असे बारकावे त्यांनी उत्तम पकडले आहेत. ही भूमिका इतकी प्रभावी आहे की आपणही काही क्षण एखाद्या दृष्टिहीन माणसाप्रमाणे हालचाल करून बघतो. इतकंच
नव्हे तर चक्क अल पचिनो या हॉलिवुड अभिनेत्याने त्याच्या ऑस्कर विजेत्या `सेंट ऑफ अ वूमन’मधल्या अंध लष्करी अधिकार्‍याची भूमिका करण्याआधी नसीरुद्दीन शाह यांची स्पर्शमधली भूमिका पाहिली म्हणतात. हे सर्व असलं तरी अधिक कौतुक करावं लागेल शबाना आझमी यांचं. लेखनात अनिरुद्धसमोर थोडी कमकुवत वाटणारी, सुरुवातीला आपल्याच कोषात असणारी कविता उत्तरोत्तर सूर मिळाल्यासारखी खुलते, अनिरुद्धने साखरपुडा रद्द केला हे दुःख पचवून अंध विद्यार्थ्यांच्या कामात झोकून देते, हा बदल शबाना यांनी सुरेख दाखवला आहे. अनिरुद्धवर असलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात चमकत रहातं. इतर कलाकारांमध्ये अनिरुद्धचा सहायक जगदीश झालेले मोहन गोखले गोड वावरतात. त्यांची आणि नसीरुद्दीन यांची केमिस्ट्री छान जमली आहे. सई परांजपे यांच्या लाडक्या सुधा चोपडा यांचं कामही उत्तम. ओम पुरी एक दोन प्रसंगात छाप पाडून जातात; तेव्हा वाटतं, अनिरूद्धची भूमिका ओम पुरी यांनी केली असती तर? बाकी चमू हा खर्‍याखुर्‍या अंध मुलांचा आहे आणि निसर्गदत्त निरागसतेने त्यांनी चित्रपट टवटवीत ठेवला आहे.
चित्रपट फार मोठ्या बजेटचा नसला तरी वीरेंद्र सैनी यांनी जास्त करून नैसर्गिक प्रकाशात अतिशय सुंदर चित्रीकरण केलेलं आहे. कनु रॉय यांनी दिलेली गाणीसुद्धा सहज सुरीली आहेत. नायक नायिकेचं युगुलगीत नसलेली आगळी प्रेमकहाणी आहे ही.
नेहमी प्रेमकहाण्या ह्या देखण्या असतात. डोळ्यांना सुखावणार्‍या असतात. मात्र सई परांजपेंच्या कविता आणि अनिरुद्धच्या ह्या प्रेम कहाणीत प्रेक्षणीय असं काही नाही…
…आहेत मनाला चाचपून पाहणारे …. अनेक…
स्पर्श.
कट इट!

– गुरुदत्त सोनसुरकर

(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)

Previous Post

एका खड्ड्याचे गडकरींना पत्र

Next Post

३३ वर्षांनंतरही चिरतरूण!

Related Posts

जमूरा कोण, ‘मदारी’ कोण?
डिरेक्टर्स स्पेशल

जमूरा कोण, ‘मदारी’ कोण?

October 14, 2021
सत्यप्रिय मरा है… सत्यप्रिय मरते ही हैं…
डिरेक्टर्स स्पेशल

सत्यप्रिय मरा है… सत्यप्रिय मरते ही हैं…

September 16, 2021
‘देशकर्तव्य’ शिकवणारा सणसणीत सरफरोश!
डिरेक्टर्स स्पेशल

‘देशकर्तव्य’ शिकवणारा सणसणीत सरफरोश!

September 2, 2021
अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…
डिरेक्टर्स स्पेशल

अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

August 18, 2021
Next Post
३३ वर्षांनंतरही चिरतरूण!

३३ वर्षांनंतरही चिरतरूण!

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.