ग्रहस्थिती : बुध वृषभ राशीत, मंगळ, शुक्र कर्केत, केतू तुळेत, हर्षल-राहू-गुरु मेष राशीत, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : १ जुलै शनी प्रदोष, ३ जुलै गुरुपौर्णिमा, ६ जुलै संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री १० वाजून १० मिनिटांनी.
मेष : कामाचे चीज होईल. तरुणांना करियरमध्ये चांगल्या संधी मिळतील. वास्तूसंदर्भात प्रलंबित व्यवहार मार्गी लागतील. कुटुंबात मालमत्तेसंदर्भातील चर्चांना गती मिळेल. नोकरीत नवे शिकायला मिळेल. कामाचा ओघ वाढेल. व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. विदेशातून मोठी कामाची संधी मिळेल. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईकांची गाठभेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील, पैसे जपून वापरा.
वृषभ : नोकरी-व्यवसायात रखडलेली कामे मार्गी लागतील. बेरोजगारांना चांगली संधी चालून येईल. बौद्धिक कौशल्याच्या जोरावर व्यावसायिक यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मतांवर ठाम राहिल्याने अडचण निर्माण झाली तरी गुरुकृपेमुळे सहीसलामत बाहेर पडाल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल, व्यवसायात एकमताचा निर्णय फायदेशीर राहील. वैवाहिक जीवनात आनंद अनुभवाल. जुने येणे वसूल होईल. उच्च शिक्षणासाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल.
मिथुन : शुभघटना कानावर पडेल. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नव्या संकल्पनांना व्यवसायाचे रूप मिळेल. त्यात मित्रमंडळी, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. लांबलेले काम नव्या ओळखींतून मार्गी लागेल. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी मिळेल, वरिष्ठ खुश राहतील. प्रवासात महत्वाची वस्तू गहाळ होऊ शकते. काळजी घ्या. व्यावसायिकांना चांगले अनुभव येतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.
कर्क : सामाजिक कामातून पत प्रतिष्ठा आणि त्यामुळे कामाची ऊर्जा वाढेल. नोकरदारांना कटकटीचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढेल. चिडचिड होईल. मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका. कोणताही निर्णय घाई-गडबडीने घेऊ नका. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. नियमात राहूनच काम करा, नियमबाह्य वर्तन महागात पडू शकते.
सिंह : वाणीवर नियंत्रण ठेवा. चेष्टा-मस्करी टाळा. गैरसमजातून वाद होऊ शकतात. घरात खर्च वाढेल. नोकरीत हटवादीपणाचा फटका बसेल. आनंददायक घटनेमुळे उत्साह वाढेल. पावसाळी वातावरणात वर्षा सहल निघेल. तिथे अपघात होणार नाही याची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या आजाराला निमंत्रण मिळेल. व्यवसायात, आर्थिक व्यवहारात सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. कामात चालढकल करू नका.
कन्या : प्रत्येक काम सावधगिरीने करा. एखादी चूक महागात पडू शकते. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम काळ राहील. वृद्ध मंडळींची काळजी घ्या. भागीदारीत किरकोळ कुरबुरीच्या घटना घडतील. तरुण मंडळींना शुभघटनांचा अनुभव येईल. मित्रमंडळींच्या वादात पडू नका. काही मंडळींच्या बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत गोंधळून टाकणारी स्थिती निर्माण होईल. शांतपणे काम करा, त्यातून सहजपणे बाहेर पडाल.
तूळ : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात विदेशात जाण्याचे योग आहेत. महिलांना चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत उत्तम स्थिती राहील. बढती वा अपेक्षेपेक्षा अधिक पगारवाढीची शक्यता आहे. महागडी वस्तू खरेदी कराल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. घरातील ज्येष्ठांशी, मित्रमंडळींशी वाद घडतील. तुटेपर्यंत ताणू नका. संसर्गजन्य आजाराकडे लक्ष द्या. संतती शुभवार्ता देईल.
वृश्चिक : आध्यात्मिक कार्यासाठी वेळ खर्च कराल. प्रॉपर्टीचा व्यवहार मार्गी लागेल. नातेवाईकांबरोबर किरकोळ वाद घडतील. जुनी गुंतवणूक चांगले पैसे देईल. त्याचा योग्य उपयोग करा. वादात मध्यस्थ बनावे लागेल. व्यावसायिक बुद्धीच्या जोरावर यश मिळवतील. नव्या ऑर्डर मिळतील. खाद्यपदार्थांच्या व्यवसायात चांगला काळ. नोकरीत सांगितले तेवढेच काम करा. कामानिमित्ताने धावपळ होईल. आठवड्याअखेरीस शुभवार्ता कानावर पडेल.
धनु : तरुणांना नव्या कामाच्या, शिक्षणाच्या संधी चालून येतील. घरात चुकीचे वागल्यास वाद घडू शकतात. गुरुकृपा राहील. हातातली कामे मार्गी लागतील. कलाकारांना काळ उत्तम आहे, एखादा पुरस्कार मिळू शकतो. नोकरीत ताण येईल. पण शांत राहा. मित्र, नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा नको. व्यावसायिकांना काळ कटकटीचा जाईल. ध्यान, आध्यात्मात मन रमवा. कुटुंबात छोटेखानी समारंभ होईल. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या.
मकर : प्रेम प्रकरणात वादाची ठिणगी पडू देऊ नका. कोणत्याही ठिकाणी व्यक्त होणे टाळा. नोकरीत कामाशी काम ठेवा, नसत्या उठाठेवी टाळा. घरात, बाहेर निर्णय काळजीपूर्वकच घ्या. व्यवसायात जपून पावले टाका. जुनी कामे झटक्यात पूर्ण होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधार उसनवारी टाळा. कामानिमित्त बाहेरगावी जाल. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्याल. पावसाळ्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण हवेच.
कुंभ : नियमानुसार काम करा. अन्यथा नसत्या अडचणीत फसाल. सरकारी कर्मचार्यांनी विशेष काळजी घ्यावी. उच्च रक्तदाब, कानाचे दुखणे असणार्यांनी काळजी घ्यावी. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरीत नव्या बदलांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. व्यावसायिकांना विदेशातून कामाची ऑर्डर मिळेल, आर्थिक ब्ााजू भक्कम होईल. नवीन गुंतवणूक योग्य ठिकाणी करा, कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. काम विचारपूर्वकच करा.
मीन : मनात अढी ठेवून काम करू नका, मोकळेपणाने बोला, शंका विचारा आणि पुढे जा. मनासारख्या घटना घडतील. तरुणांचा उत्साह वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती कराल. व्यावसायिकांसाठी चांगल्या संधी येतील. गाडी चालवताना काळजी घ्या, अपघाताला निमंत्रण देऊ नका. मित्रमंडळींबरोबर सहलीचे नियोजन कराल. पत्नीबरोबर वाद टाळा. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.