ग्रहस्थिती : गुरू वृषभ राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ, बुध, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, प्लूटो मकर राशीमध्ये, रवि, शुक्र, हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत. विशेष दिवस : २ जून अपरा स्मार्त एकादशी, ३ जून भागवत एकादशी, ४ जून शिवरात्री, ५ जून अमावस्या आरंभ रात्री ७. ५५ वा., ६ जून अमावस्या समाप्ती सायंकाळी ६.०७ वा. आणि शनेश्वर जयंती.
– – –
मेष : नव्या योजनांना आकार मिळेल. नोकरीत शांत राहा. घरात उत्साहवर्धक वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. मात्र, व्यवहारात घोळ होईल. तरुणांच्या मनासारख्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद लाभेल. नवी वास्तू घेण्याच्या नियोजनाला गती मिळेल. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांची अडकलेली कामे मार्गी लागतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. मित्रांशी आर्थिक व्यवहार करणे टाळा.
वृषभ : नव्या ओळखीतून यश मिळेल. व्यवसायात स्पर्धेतून यश मिळेल. घरात शुभघटना घडेल, कामातला उत्साह वाढेल. नोकरीत ताण वाढेल. घरासाठी महागड्या वस्तूची खरेदी होईल. येणे वसूल झाल्याने खिशात पैसे राहतील. मुलांमुळे डोकेदुखी वाढेल. कागदपत्रे न पाहता सही करू नका. वादात पडू नका. सार्वजनिक जीवनात अरेला कारे नको. नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी योग्य विचार करा. कौटुंबिक तीर्थयात्रा घडेल.
मिथुन : नावलौकिकात भर पडेल. नोकरीत गोंधळ उडेल. शांततेने घ्या, उद्योजकांनी कोणताही निर्णय घेताना घाई करणे टाळावे. अचानक आलेल्या संधींमधून व्यवसाय सुरू करताना विचारपूर्वक काम करा. कुटुंबात मालमत्तेसंदर्भातील वाद मार्गी लागतील. शुभघटना घडतील. बुद्धीचातुर्याच्या जोरावर नव्या संकल्पना यशस्वी कराल. कामात घाई नको. व्यसनाधीनांपासून दूरच राहा. काम पूर्ण करण्यासाठी पत्नीचा हातभार लागेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. मुलांकडे लक्ष ठेवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
कर्क : व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. आर्थिक बाजू काळजीपूर्वक सांभाळा. नातेवाईकांच्या मदतीने काम सुकर होईल. नोकरीत हिशेबात काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. विदेशात नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रेम प्रकरणात जपून वागा. बोलताना वादाची ठिणगी पडू देऊ नका. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाशी काम ठेवा. वादात मध्यस्थी टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांची स्वप्नपूर्ती होईल. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मन प्रसन्न ठेवणार्या घटना घडताना दिसतील.
सिंह : नोकरीत तुम्ही म्हणाल तसे होईल. वरिष्ठ कामावर खूष होतील. कदाचित काही नवीन जबाबदारी मिळेल. मालमत्तेच्या वाटणीबाबत घाईने निर्णय टाळा. शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापकांसाठी चांगला काळ. कोणताही निर्णय घेताना भावनिकपणा बाजूला ठेवा. व्यवसायात अति उत्साह दाखवणे टाळा. काहीजणांच्या मनाविरुद्ध घटना घडतील. मन शांत ठेवा. आध्यात्मात मन रमवा. कलाकारांचा उत्कर्ष होईल. खाण्या-पिण्याच्या मोहाला आवर घाला. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबासाठी, समाजकार्यात वेळ खर्च होईल. तरुणांचा चैनीकडे कल राहील. उधार-उसनवारी नको.
कन्या : खर्चात वाढ होईल. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात जाल. व्यवसायात भरभराट होईल. पार्टनरशिपमध्ये वाद होतील. नोकरीत आतापर्यंत केलेल्या कामाला चांगले फळ मिळेल, नवीन जबाबदारी येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूष राहतील. कामात काही चूक होऊ देऊ नका. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. थोडी काळजी घ्या. नातेवाईक, मित्रमंडळी यांना आर्थिक मदत करावी लागू शकते. घरात एखादे शुभकार्य होईल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मनाविरुद्ध झालेली घटना मानसिक त्रास वाढवू शकते. आध्यात्मिक प्रगती होताना दिसेल.
तूळ : आरोग्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात काळजी घ्या, एक चूक महागात पडू शकते. नवीन नोकरीची संधी घेताना योग्य काळजी घ्या. चुकून ती जाऊ शकते. बुद्धिवादी, विचारवंत, लेखकांचा सहवास लाभेल. घरात वागताना काळजी घ्या. वडीलधार्यांचा आदर ठेवा. व्यवसायात चांगले यश मिळेल. सरकारी कर्मचार्यांनी नियम पाळावेत. नोकरीत काम परफेक्ट करा, मन:स्ताप टाळा. शेअर, प्रॉपर्टीच्या व्यवहारातून चांगला लाभ होईल. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक बाजू सांभाळा.
वृश्चिक : मनासारख्या गोष्टी घडतील, कौतुकाचा वर्षाव होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. आध्यात्मिक कार्यात मन रमवाल, मन:शांती लाभेल. व्यवसायात लक्ष विचलित होऊ देऊ नका. शेअर, लॉटरी, सट्ट्यातून उत्तम लाभ होईल. त्याच्या आहारी जाऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. थकीत येणे आल्याने आर्थिक बाजू चांगली राहील. व्यवसायात नोकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. वाद टाळा, संवेदनशीलता दाखवा, रागावर नियंत्रण ठेवा.
धनु : जुन्या मित्रांच्या गाठीभेटींमुळे आनंद होईल. नोकरीत काळजी घ्या. व्यवसायात यश मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधारी करू नका. आर्थिक नियोजनात चूक करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा, घरासाठी भरपूर वेळ द्या. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी, विदेशात जावे लागेल. कामाचा झपाटा वाढेल. त्यातून उत्साह वाढेल. नव्या योजना आकार घेतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात यशदायी काळ. मनासारखी नोकरी चालून येईल. दांपत्यजीवनात आनंद मिळेल. घरात बोलताना काळजी घ्या.
मकर : संयम ठेवा. नोकरीत वाढीव मेहनत केल्याने आरोग्यावर परिणाम होईल. नवी नोकरी मिळेल. जुगार, सट्टा, शेअरपासून लांबच राहा. नवीन गुंतवणुकीचा प्लॅन बिनसेल. आरोग्याची छोट्या तक्रारी हलक्यात घेऊ नका. विवाहेच्छूंसाठी चांगला काळ. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील. विदेशात उच्चशिक्षणाच्या संधी मिळतील. व्यवसायात व्यवहार पारदर्शी ठेवा. आवश्यक तिथे कायदेशीर सल्ला घ्या. नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल.
कुंभ : गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. नवीन घराचा प्रश्न मार्गी लागेल. मन:शांतीसाठी ध्यानधारणेला वेळ द्या. कामात अडचणी येतील. नोकरीत काम वाढेल. धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. मनासारख्या घटनांमुळे कामाचा उत्साह वाढेल. संशोधन, मेडिकल क्षेत्रात उत्तम काळ. पर्यटन कराल. कलाकार, पत्रकारांसाठी उत्तम काळ. पैशाचे नियोजन फायद्याचे ठरेल. उधार उसनवारी टाळा. अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या ओळखीमुळे काम मार्गी लागेल. संततीकडून शुभवार्ता मिळेल. गुंतवणुकीमधून लाभ होईल.
मीन : नोकरदार-व्यावसायिकांच्या कामाचे कौतुक होईल. बंधूंबरोबर वाद होतील. कौटुंबिक प्रश्न मार्गी लावताना कसरत करावी लागेल. चिंता वाढवणारी घटना घडेल. सतर्क राहा. तरुणांचा वेळ मौजमजेवर खर्च होईल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. शेतीत चांगला काळ राहील. प्रेमात यश मिळेल. कलाकारांचा मानसन्मान होईल. सामाजिक क्षेत्रात चांगला अनुभव येईल. व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. खेळाडूंना यश मिळवून देणारा काळ राहणार आहे. लेखक, प्रकाशकांचा सन्मान घडेल. प्रवासात काळजी घ्या.