एकनाथ शिंदे
कोट्यवधींच्या जाहिराती पाहून
जनता झालीय अगदी परेशान
थापा ऐकून ऐकून तिचे
बधीर झाले आहेत कान
आमचा त्याला इलाज नाही
फेकंफेकी आहेच वेगवान
त्याच्याशिवाय नाही पर्याय
म्हणूनच थापा होती गतिमान
खजिना झाला रिता तरीही
झुकणार नाही आमची मान
इलेक्शनपर्यंत उपसत राहू
म्हटले तरीही बेईमान
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
कसली नस्ती लफडी मागे
मला अडकवण्याचा प्लान
हिचे नसते उद्योग करती
नेहमीच मला परेशान
त्यात हे सीएम मोकाट सुटलेत
नाही त्यांना कसलेच भान
माझ्यावरती मात कराया
करती ते जीवाचे रान
आमचा प्लान तयार आहे
लवकर त्यांना बसेल धक्का
अलिबाबा नि चाळीस चोरांच्या
पाठीवरती बसेल बुक्का
—– —– —–
रामदास कदम
त्यांनाही पडतात, मलाही पडतात
सीएम पदाची स्वप्ने गोडगोड
मी तर करीन सीएम झाल्यावर
शिंद्यांपेक्षा आणखी मोडतोड
आपला स्वभाव मुळात रागीट
पडलो तरीही टांग उपर
चालतील मला गुंड आमदार
जरी कॅबिनेट असले डफ्फर
शाळा शिकून उपयोग नाही
आमचा झाला नाही वांदा
भाईगिरीचे देऊ शिक्षण
शिकवू त्यांना ‘वेगळा’ धंदा
—– —– —–
गुलाबराव पाटील
कधी दुष्काळी, कधी अवकाळी
आत्महत्या सुरूच असतात
शासन कसे त्याला जबाबदार
खोट्या आशेने लोक फसतात
त्यांना कसे दावणार आम्ही
काय ते डोंगार, काय ती झाडी
ते तर नेहमीच पाहतात दु:खे
संपवतात जीवनाची गाडी
नुकसानीचा हिशोब कराया
आम्ही नक्की येऊ रात्री
काळजी घ्या तुम्ही बांधावरती
भुंकणार नाहीत काळी कुत्री
—– —– —–
नरेंद्र मोदी
न्यायाधीश तर झाले वरचढ
सुप्रीमपासून राज्यांपर्यंत
नाही कधीही जिंकू शकत
त्यांच्या बरोबरची शर्यत
निवडणूक आयोग होता हातात
त्याची त्यांनी काढली हवा
माझे निर्णय ठरले फुसके
गार केला गरम तवा
मी म्हणेन तेच खरे
तीच खरी लोकशाही
त्यांना कसे कळत नाही
म्हणतात ही तर बेबंदशाही