ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी, शनि कुंभ राशीत, केतू कन्या राशीत, बुध, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : ३ मार्च विनायक चतुर्थी, ७ मार्च दुर्गाष्टमी.
– – –
मेष : मनाची चंचलता सांभाळा. नोकरी-व्यवसायात घाई करू नका. निर्णय विचारपूर्वक घ्या. गोड बोलून कामे पुढे सरकवा. व्यवसायात नवे काही करताना काळजी घ्या. खर्च वाढेल, पैशाचे नियोजन करा. घरात ज्येष्ठांचे म्हणणे मान्य करा. कलाकार, खेळाडू, लेखक, संगीतसर्जकांसाठी चांगला काळ. शुभघटना कानी पडेल. नातेवाईकांशी गैरसमजातून वाद निर्माण होतील. जुने मित्र भेटतील. सहल, मौजमजेवर खर्च होईल. नोकरीत अडकून राहिलेली कामे पुढे सरकतील. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे प्रकृतीवर ताण येऊ शकतो.
वृषभ : महत्त्वाकांक्षी बनाल, आत्मविश्वास वाढेल. दूरचा विचार करून निर्णय घ्या, फायदा होईल. समाजकार्यात गौरव होईल. मित्रमंडळींना मदत कराल. अहंकार टाळा. सार्वजनिक जीवनात जपून मत व्यक्त करा. आपणच बरोबर असल्याचा हेका टाळा. तरुणांना यशप्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतील. पत्नीसाठी महागड्या वस्तूची खरेदी होईल. व्यवसायात कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. बँकेतील प्रलंबित कर्ज प्रकरणे पुढे सरकतील. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ. उच्चशिक्षणात मनासारख्या घटना घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. आर्थिक प्रश्न सुटतील. सामाजिक कार्यासाठी वेळ खर्च होईल.
मिथुन : आश्वासन देणे टाळा. ध्येयपूर्तीसाठी अधिक कष्ट घ्या. बोलण्यातून कामे पुढे न्या. संयम ठेवा. नवीन ओळखीवर विश्वासून आर्थिक व्यवहार टाळा. गुंतवणूक, बचतीकडे लक्ष द्या. घरात शुभवार्ता कानी पडेल. नवी वास्तू घेण्याचा विचार पुढे सरकेल. सार्वजनिक ठिकाणी वागताना काळजी घ्या. तरुणांना मोठे यश मिळेल. नोकरी चालून येईल. भावांशी जमवून घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. जुना आजार डोके वर काढेल. व्यवसायात खर्च वाढेल. नव्या कामातून आर्थिक बाजू भक्कम होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागेल.
कर्क : कठीण प्रसंगात धीर खचू न देता पुढे जा. मित्रमंडळींची मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात गोष्टी फार ताणू नका. मनातलं सगळं बोलू नका. नोकरदारांचा खूप वेळ खर्च होईल. व्यवसायात काम पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. त्यात खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. सरकारी कामे पूर्ण होतील. घरात ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या संकल्पना विचार करून राबवा. बँकेच्या व्यवहारांत काळजी घ्या. तरुणांची प्रगती होईल. खेळाडूंना यश मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. ध्यानधारणा करा.
सिंह : मानसन्मान मिळेल. उद्दिष्ट साध्य होईल. वेळेचे नियोजन करा. समाजकार्यात वेळ खर्च होईल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. सरकारी कामे मार्गी लावण्यात वेळ जाईल. नोकरदारांच्या मनासारख्या घटना घडतील. प्रमोशन, व्यवसायवृद्धी अनुभवाल. संगीतकार, कलाकार, चित्रकारांसाठी उत्तम काळ. मित्रमंडळींशी बोलताना अति उत्साह नको. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. शिक्षण, नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांच्या भाग्योदयाचे प्रसंग घडतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : कुणालाही सल्ला देऊ नका. कामात कौतुकाची नको. नोकरीत कामाशी काम ठेवा. घरात बोलणे सौम्य ठेवा. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम करणारे मार्ग खुले होतील. तरुणांच्या मनासारखी संधी मिळेल. विदेशात जाण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. मित्रांमध्ये कौतुक होईल. फक्त वाणी गोड ठेवा. लग्नाची बोलणी मार्गी लागतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. संशोधकांच्या हातून मोठे काम होईल. शिक्षणक्षेत्रात नव्या संधी मिळतील. कोर्टकचेरीची कामे रखडतील.
तूळ : नातेवाईकांना आर्थिक मदत करताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. बहीण-भावाशी जमवून घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत किरकोळ कुरबुरीतून बदली होऊ शकते. पती-पत्नीत वाद टाळा. मन शांत ठेवा. व्यवसायात लाभ मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होईल, मानसिक समाधान मिळेल. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. प्रवासात काळजी घ्या, नव्या ओळखीवर विश्वासून निर्णय घेऊ नका. तरुणांना यश मिळेल.
वृश्चिक : बोलताना नियंत्रण ठेवा. मित्रांची मदत मिळेल. मतावर ठाम राहा. पण, जुने वाद उकरून काढू नका. मनाची शांतता कायम ठेवा. व्यवसायात अधिक श्रम घ्या. तरुणांना बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. घरासाठी वेळ खर्च होईल. आर्थिक नियोजन करा. नव्या वास्तूचा विषय पुढे सरकेल. अनपेक्षित लाभ होतील. व्यवसायात चार पैसे शिल्लक पडतील. नोकरीत बदली होऊ शकते. कामानिमित्ताने बाहेरगावी जाल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन उत्तम राहील. सरकारी कामे नियमात राहूनच करा. जुळवून घ्या. संयम ठेवा.
धनु : कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. व्यवसायात मोठी उडी घेण्याआधी विचार करा. व्यवसायात आर्थिक घडी विस्कटू देऊ नका. राग बाजूला ठेवा. सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळा. प्रेमप्रकरणात वाद विकोपाला जाईल. मनासारख्या घटना घडतील. उच्चशिक्षणाच्या संधी मिळतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नोकरीत उत्तम स्थिती राहील. नवी ऑफर मिळेल. विचार करून निर्णय घ्या. शेअर, सट्टा लॉटरीतून लाभ मिळेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
मकर : कामात हलगर्जी नको. नवीन नोकरीत नियोजन करूनच जा. सार्वजनिक जीवनात व्यक्त होताना काळजी घ्या. जुनी उधारी येईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल, कंटाळा येईल. मित्रमंडळींसोबत खूप वेळ खर्च होईल. व्यवसायात आर्थिक लेखाजोखा तपासावा. नवीन संधी साधताना जपून. पैशांचा वापर करताना काळजीपूर्वक करा. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. तरुणांना संमिश्र अनुभव येतील. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. उन्हाळ्यात काळजी घ्या. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. सरकारी कामे लांबणीवर पडतील. खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होईल. वाहन जपून चालवा.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात चांगला काळ. उल्लेखनीय काम केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. यशासाठी अधिक श्रम करा. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामात धरसोड नको. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. मनातलं सगळं बोलू नका. प्रवासात फसवणूक होईल. मित्रमंडळींशी वाद होतील. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होईल, नियोजन करा. मिष्टान्न भोजनाचा योग आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाल. अरबट-चरबट खाणे टाळा. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे सकारात्मक निर्णय घ्याल. यात्रा घडेल.
मीन : नोकरी-व्यवसायात सबुरीने घ्या. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना कराल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. मताशी ठाम राहा. नवीन गुंतवणूक सल्लामसलतीने करा. मनासारखी कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. आत्मविश्वास कामे मार्गी लावण्यासाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यातून मन:शांती मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. मुलांकडून चांगले काम होईल, स्पर्धेत यश मिळेल. खेळाडू, शिक्षक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ. वास्तू थोड्या कालावधीने घ्या. मित्रमंडळींसोबत सहलीला जाल.