• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

- भास्कर आचार्य (१ ते ७ फेब्रुवारी २०२५)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 31, 2025
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीमध्ये, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ मिथुन राशीत, शुक्र, राहू नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शनि कुंभ राशीत, रवी, बुध, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : १ फेब्रुवारी गणेश जयंती, २ फेब्रुवारी वसंत पंचमी, ४ फेब्रुवारी रथसप्तमी, ५ फेब्रुवारी दुर्गा-बुधाष्टमी.

मेष : नवे संकल्प, कल्पना पुढे जातील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. आग्रही भूमिका थोडी मागे ठेवा. कोणावरही अति विश्वास नको. वाचन, ध्यानधारणा, योगा यांना वेळ द्या. कामाचा उत्साह वाढेल. व्यवसायात नवीन आर्थिक पर्याय खुले होतील. तरुणांना यश मिळेल. नोकरीच्या संधी येतील. घरात मोठ्या भावंडांशी मतभेद होतील. कुटुंबाच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. घरात शुभ वार्ता कळेल. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी यशदायी काळ. खाण्याची पथ्ये पाळा.

वृषभ : कामात चुका नकोत. नोकरीत कौतुक होईल, पण हुरळून जाऊ नका. प्रत्येक काम सकारात्मक विचाराने करा. भविष्यात त्याचा फायदा होईल. दानधर्मातूून समाधान मिळेल. वादाचे प्रसंग टाळा, कोणाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका. अडकलेली कामे पुढे सरकतील. व्यवसायात नव्या कल्पनांना आकार देताना आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. नोकरीत आपले म्हणणे मान्य होणार नाही. घरात छोटेखानी कार्यक्रम होईल. मौजमजेपासून दूर राहा. सासू-सुनामध्ये प्रेमाचा संवाद ठेवा. मनातले सगळे उघड करू नका.

मिथुन : कामात आपल्या मतावर ठाम राहा. नोकरीत नवीन जबाबदारी घ्या. मते प्रदर्शित करणे टाळा. कुटुंबाला वेळ द्या, मन आनंदी राहील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. तरुणांना करियरमध्ये नव्या संधी सापडतील. थकीत येणी वसूल होतील. कुटुंबासोबत पर्यटनाला जाल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. सार्वजनिक जीवनात काळजीपूर्वक वागा, बोला. तरुणांनी अधिक मेहनत घ्यावी. मित्रमंडळी, नातेवाईकांना सल्ले देऊ नका. त्यामधून मनस्वास्थ्य बिघडेल. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात आमदनी वाढेल.

कर्क : आर्थिक नियोजन करा, अचानक खर्च वाढेल. सार्वजनिक ठिकाणी मते व्यक्त करणे टाळा. पैशाच्या व्यवहारात गल्लत नको. गुंतवणूक करताना प्रलोभनाला बळी पडू नका, आश्वासने देऊ नका. प्रवासात सावधगिरी बाळगा. मित्रमंडळींशी चर्चा करताना आपलेच म्हणणे रेटू नका. व्यवसायात यशदायक काळ. विदेशात विस्ताराला यश मिळेल. जुना आजार डोकेदुखी वाढवेल.तरुणांना यशदायक काळ. नवीन गुंतवणूक चांगला फायदा देईल. निर्णयात घाई नको. नोकरीत वाद टाळा. कामात तत्परता कामी येईल.

सिंह : कामाचा ताण घेऊ नका. अडकलेले काम पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका. फायदेशीर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नव्या ओळखींमधून कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी अवांतर बोलणे टाळा. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. संरक्षण क्षेत्रात हातून उल्लेखनीय कामगिरी होईल. नोकरीत अच्छे दिन अनुभवाल. प्रमोशन, पगारवाढ होईल. बदलीचे काम मार्गी लागेल. व्यावसायिकांना नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक बाजू चांगली राहील. प्रेमात वाद टाळा. विद्यार्थ्यांनी मनोबल वाढवावे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : आपण भले आणि आपले काम, या तत्वाचा अवलंब करा. कमी बोला. व्यवहारात काळजी घ्या, मन आनंदी ठेवा. कुटुंबियांना समजून घ्या. राग व्यक्त करू नका. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. योगा, ध्यान यासाठी वेळ द्या. नातेवाईकांसाठी वेळ खर्च करावा लागेल. पत्नीशी जुळवून घ्या. तरुण कलाकारांच्या गुणांना वाव मिळेल. अभिनेते, गायक, संगीतकार, वादक, शिल्पकार यांचा सन्मान होईल. बांधकाम व्यावसायिक, ब्रोकर, वित्तीय सल्लागार यांच्यासाठी चांगले दिवस. नातेवाईक, मित्रांशी बोलताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात जपून. यश मिळवण्यासाठी अधिकचे कष्ट घ्या.

तूळ : कामात विनयशीलता ठेवा. ताण हलका होईल. नोकरी, व्यवसायात महत्वाची कागदपत्रे वाचून मगच स्वाक्षरी करा. बोलताना नियंत्रण ठेवा, सल्ला देणे टाळा. एखादी गोष्ट पटली नाही तर दुर्लक्ष करा. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. महिलांचा उत्साह वाढेल. तरुणांना नशिबाची साथ मिळेल. पत्नीसाठी महागडी वस्तू खरेदी कराल. घरात किरकोळ वाद होतील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल.

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात विश्वास व सकारात्मकता वाढेल. मित्रांशी जुने वाद काढू नका. आर्थिक नियोजनावर भर द्या. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. मुलांच्या कलाने घ्या. लेखक, प्रकाशक, कलाकारांना उत्तम यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक जीवनात अहंकार नको. देवदर्शनाला जाल. दानधर्म होईल. अभियांत्रिकी व्यवसायात नव्या संधी येतील. चांगले अर्थार्जन होईल. नोकरीत प्रमोशन होईल. सरकारी कामात शिस्त पाळा. अति आत्मविश्वास नको. मनोरंजनावर वेळ आणि पैसे खर्च होतील.

धनु : अति उत्साहाच्या भरात निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी जमवून घ्या. घरासाठी वेळ द्यावा लागेल, मुलांकडून चांगली बातमी कळेल. मालमत्तेचे विषय काळजीपूर्वक मार्गी लावा. कमी बोला आणि अधिक काम करा. तरुणांची महत्त्वाची कामे झटपट पूर्ण होतील. व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी त्रास होईल. काहीजणांच्या खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवा. लेखक, संगीतकारांना मानसन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्यावा लागेल. उधार उसनवारीचे व्यवहार नकोच.

मकर : कामाच्या नव्या संधी चालून येतील. ज्येष्ठांशी वाद टाळा. सरकारी नियम तोडू नका. नोकरीत वाढीव कामामुळे वेळेचे गणित बिघडेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. वास्तू खरेदीचे योग जुळून येतील. व्यावसायिकांची आर्थिक येणी वसूल होतील. कामे झटपट पूर्ण होतील. सौंदर्य प्रसाधने, सजावटकार, यांची आर्थिक चलती होईल. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढेल. खिशात पैसे आहेत म्हणून उधळपट्टी करू नका. व्यवसायात अचानक बाहेरगावी जावे लागेल. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ : यशदायी काळ. अहंकारी वृत्ती दूर ठेवा. व्यवसायात थंड डोक्याने निर्णय घ्या. नोकरीत नवीन संधींचा फायदा घ्या. भागीदारीत समंजसपणा दाखवून किरकोळ वाद टाळा. घरात छोटेखानी समारंभ होईल. छंदासाठी वेळ खर्च कराल. सरकारी कामात घाई नको. जुन्या मित्रांबरोबर मौज कराल. नोकरीत कामाचा ताण वाढून आरोग्याचे गणित बिघडेल. रस्त्यावर अरेरावी करू नका. सहलीला जाल, पण, तिथे भलते साहस करू नका.

मीन : नोकरदारांना कामानिमित्ताने विदेशगमनाची संधी मिळेल. व्यवसायात नवे बदल स्वीकारावे लागतील. अडकून राहिलेले जुन्या ओळखींमधून काम पुढे सरकेल. वायफळ खर्च टाळा. व्यवसायात दगदगीचा काळ. मन:शांती टिकवण्यासाठी योग, ध्यानधारणा करा. लेखकांना चांगली बातमी कळेल. व्यवसायात कल्पनाशक्तीच्या जोरावर यश मिळेल. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल, सकारात्मक ऊर्जा वाढेल. नव्या ओळखीतून लाभ होतील. महिलांना आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. खाताना विशेष काळजी घ्या. तरुणांना पुढे जाण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील.

Previous Post

शुद्धनिर्मला… रसगुल्ला!!

Next Post

बहिणी जाणार सुप्रीम कोर्टात?

Next Post

बहिणी जाणार सुप्रीम कोर्टात?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.