नरेंद्र मोदी
नवीन वर्षात देशाला मी
इतका पुढे पुढे नेईन
कशात मागे राहणार नाही
भाववाढीतही रेकॉर्ड तोडीन
पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव
बघा कमाल पातळी गाठतील
पंधरा लाख घेता घेता
खिसे तुमचे नक्की फाटतील
मालमत्ता विकणे काही
साधेसुधे काम नाही
उरले सुरले लावीन मार्गी
त्यासाठीही करीन घाई
—–
अमित शहा
या वर्षात खरेच बोलेन
अर्धसत्य नाही बोलणार
अडीचकीचा डाव पटावर
तागडीत मात्र दुसराच तोलणार
खरे काय खोटे काय
अनेकांनी फोडला फुगा
सत्य त्यातले तुम्हीच ओळखा
आणि हसत गंमत बघा
खेळात जसे पत्ते वाटतात
तसे वाटून झाले होते
काळाकांडी केली रात्री
राज्य हातून गेले होते
—–
निर्मला सीतारामन
नव्या वर्षात बजेट मांडेन
करीन सगळा कायाकल्प
कळूच नये त्याचा अर्थ
असाच माझा गूढ संकल्प
गेल्या वर्षी आठवते ना
वाचता वाचता फुटला घाम
घसा सुद्धा सुकला होता
पाणी पिऊन चोळला बाम
कोणी लिहून दिले भाषण
मी आधी वाचलेच नव्हते
स्वामींनीच घेतली फिरकी
नाहीतर बजेट फुटले असते
—–
देवेंद्र फडणवीस
नव्या वर्षात नको संकल्प
सगळेच मुसळ केरात गेले
दोन वर्षे कशी दवडली
तेल गेले, तूपही गेले
पक्षात सुद्धा धुसफुस धुसफूस
मला सारे पाण्यात पाहतात
वरवर गोड बोलले जरीही
मात्र मनातून खारच खातात
माझ्यासारखा सीएम नाही
वरच्यांना तर पूर्ण खात्री
म्हणून बेफाम बडबड करतो
चॅनल लावत नाहीत कात्री
—–
राज्यपाल कोश्यारी
हॅप्पी आहे नव्या वर्षात
पूर्वी होतो तसाच वागणार
त्यांनी आदेश दिल्यावर मी
पपेट शो करून भागणार
जनता म्हणते हट्टी आहे
कोर्टालाही मानत नाही
दिल्लीत बसलेत दोर्या धरून
तेच माझे बाबा-आई
पक्षासाठी काहीही करीन
जरी नियमात बसत नसले
मला नाही त्याची पर्वा
कोणी कितीही जरी हसले