• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आनंदाचे डोही!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 31, 2021
in टोचन
0

नववर्षाचे स्वागत आम्ही कधीच नववर्षाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री करत नाही, तर आधी चार दिवसापासून तर कधी आठवडाभर आधीपासून त्याची सुरुवात होते… कारण एक तर जुन्या वर्षाला प्रेमभराने निरोप द्यायचा असतो. त्यासाठी चार दिवस तर द्यावेच लागतात. कारण ते वर्ष पुन्हा कधीच दिसणार नसते. पुन्हा नव्या वर्षाचे स्वागतही चार दिवस आधीपासून धुमधडाक्यात वाजत गाजत, नाचत, गात, खात पीत म्हणजे पीत-खात करायचे असते. अगदी लग्नाच्या वरातीत असल्यासारखे. मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या आम्ही दोघांनी कधीच यात कुचराई किंवा हलगर्जीपणा केला नाही. अशावेळी जे काही करायचे ते कुणाचीही, कसलीही लाजबीज न बाळगता हे आमचे तत्वज्ञान आहे.
एकदा का आनंदाचा उपभोग घ्यायचे ठरवले की त्यात मागेपुढे पाहायचे नाही की कशाचीही आणि कुणाचीही पर्वा करायची नाही. शेवटी आनंद आनंद म्हणजे तरी काय असते? आपल्या मनासारखे बिनधास्त करणे. मोठमोठे फिलॉसॉफर की कोण असतात ते सुद्धा म्हणतात, तुमच्या मनात इच्छा असूनसुद्धा ज्या गोष्टी तुम्हाला लाजेमुळे करता येत नसतील त्या बिनधास्त करा. तुम्हाला नाचण्याची, गाण्याची इच्छा असेल तर एखाद्या लग्नसमारंभात, पार्टीत, नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमात ती हौस भागवून घ्या. मन आणि शरीर मोकळे झाल्यासारखे वाटेल. काहीजण म्हणतील की काय वेड्यासारखा नाचत होता. पण तिकडे लक्ष देऊ नका. एक ना एक दिवस आपलीही भगवानदादासारखी नाचाची स्टाइल बनत जाते. वेळ मिळेल तेव्हा घरात कोणी नसताना दारे-खिडक्या बंद करून टेपरेकॉर्डरवर गाणे किंवा म्युझिक लावून हवे तसे नाचा. वाटल्यास गा. हल्ली कराओकेचे मशीन आलेच आहे. गाण्याने आणि नाचण्याने श्रम हलके होतातच शिवाय आत्मविश्वास वाढतो. मग चारचौघात नाचायला आणि गायला तुम्ही कमी पडत नाही. त्यात एखादा पेग मारलात तर मग विचारूच नका. आनंदी नव्हे, तर ब्रह्मानंदी टाळी लागते. पावले कशी थिरकतात हे कळणारही नाही. हे माझे आणि पोक्याचे अनुभवाचे बोल आहेत.
आता आम्ही दोघे जरी बारमध्ये बसलो असलो तरी पूर्ण शुद्धीत आहोत. बाजूला मस्त संगीत लागले आहे. आम्ही दोघे मनातल्या मनात नाचत गात आहोत. आनंद यापेक्षा काहीही वेगळा नसतो. आनंदाचे डोही आनंद तरंग हा आध्यात्मिक आनंदाचा प्रकार, तर आनंद पोटात माझ्या माईना हा भक्तिरसाने उफाळलेल्या आनंदाच्या सागराला बाहेर मुक्तपणे उधळून टाकावे हा सुद्धा तशाच आनंदाचा प्रकार. आता मी जे प्रवचन देतोय ते माझ्या बाजूला बसलेला टोक्या टेप करतोय. भक्तीची जशी नशा चढली पाहिजे तशी आनंदाचीही चढली पाहिजे. त्यासाठी आपण आपले प्रयत्न आपल्या परीने सुरू ठेवले पाहिजेत. आनंद घ्यावा, आनंद द्यावा हे सरकारला समजते. पण अज्ञ जनांना नाही. म्हणूनच वाईन यापुढे किराणा मालाच्या दुकानापासून पानाच्या गादीवरसुद्धा मिळेल. नशाही माफक आणि आरोग्यालाही लाभदायक. शेवटी विकासाचा मार्ग हा वाईनमधूनच जातो हे वरच्या सरकारला कळेल तेव्हा त्यांची ट्यूब उशिरा का होईना, पेटेल.
नव्या वर्षात वाईनचा पूर आला तर ती प्राशन करून जनता धडधाकट होईल हा माझा आणि पोक्याचा आत्मविश्वास आहे. द्राक्षासारख्या अनेक फळांचा केवळ खाण्यासाठीच नाही तर ज्यूस पिण्यासाठी आणि वाईनसारखे सेमीमद्य पेय बनवण्यासाठीही उपयोग होतो हे विदेशाइतकेच महाराष्ट्रात ज्या वाईनच्या उद्योजकांना कळले, तेव्हाच या उद्योगाचा श्रीगणेशा झाला आणि या उद्योगामुळे सरकारी उत्पन्नात भर पडत असेल तर त्यात वाईट काहीच नाही.
आमच्या पोक्याचा या बाबतीतला अभ्यास अगदी दांडगा आहे. त्याला मोहाच्या दारूचा अनुभव आहे. जांभळाच्या दारूचा अनुभव आहे. पण हे प्रकार अजून अतिदुर्गम ग्रामीण भागात दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांना चालना दिली तर ते विदेशी मद्यानाही मागे टाकतील, असे पोक्याचे म्हणणे आहे. नव्या वर्षात तो या दोन दारूंच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करणार आहे. तसा संकल्पच त्याने केला आहे. त्याच्या आनंदाचाच तो एक भाग आहे. डिस्टिलरीच्या व्यवसायात तो पाय रोवून उभा राहणार आहे. त्याचे पाय लटपटणार नाहीत, याची काळजी मी मनापासून घेणार आहे. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष एन्जॉय करताना तू तुझ्या मनातला संकल्प नशा उतरल्यावर विसरून जाऊ नकोस, एवढीच माझी त्याला विनंती आहे. कारण त्याच्या डोक्यात अनेक भन्नाट आयडिया असतात. आम्ही एकत्र बसलो की तो त्या बोलूनही दाखवतो. पण दुसर्‍या दिवशी अनेकदा तो विसरून जातो आणि दुसर्‍याच कसल्यातरी उद्योगाच्या वार्ता सुरू करतो. ईडीची धाड पडेल एवढा पैसा आपल्याकडे असताना हा का असा भरकटल्यासारखा वागतो, हे मला कळत नाही.
नवे वर्ष जर खर्‍या अर्थाने आनंदमय करायचे असेल तर लक्ष त्या फडणवीसांसारखे एकाच लक्ष्यावर केंद्रित करा. मग आनंदच आनंद!

Previous Post

१ जानेवारी भविष्यवाणी

Next Post

नया है वह!

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

नया है वह!

सुभाष घईंकडून स्पर्धकाला कोरा चेक

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.