• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

भास्कर आचार्य (१४ ते २० फेब्रुवारी २०२६)

marmik by marmik
February 20, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य

ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ, प्लूटो मकरेत, गुरु मिथुनेत, केतू सिंहेत, रवि, बुध, शुक्र, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत. दिनविशेष : १४ फेब्रु. शनिप्रदोष, १५ फेब्रु. महाशिवरात्री, १६ फेब्रु. सोमवती अमावस्या, आरंभ- सायं. ५ वा. ३३ मिनिटांनी, १७ फेब्रु. अमावस्या समाप्ती, सायं. ५ वा. ३० मि., १९ फेब्रु. छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

 

 

मेष : नोकरी-व्यवसायात मर्यादेत राहा. संयम ठेवा. अचानक परिस्थिती बदलेल. आत्मविश्वास वाढवून काम करा. शब्दावर नियंत्रण ठेवा. शिक्षणक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. रागाचे प्रसंग टाळा. सामाजिक कामात सहभागी व्हाल, धार्मिक कार्यातून मन:शांती मिळेल. कामातला उत्साह वाढेल. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन आर्थिक पर्याय खुले होतील. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी उत्तम काळ. कामाला विलंब होईल. घरासाठी वेळ खर्च होईल. नोकरी शोधणार्‍यांना मनासारखी संधी मिळेल. नातेवाईकांकडून मदत मिळेल. मोठा भाऊ, बहीण यांच्याशी मतभेद होतील.

वृषभ : कामात कणखरपणा कामी येईल. सामाजिक कार्यात वेगळा अनुभव येईल. त्यातून आत्मविश्वास वाढेल. तरुणांना यशदायी काळ राहील. घरासाठी खर्च वाढेल. आर्थिक नियोजनात चुकू नका. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. कामात ताण घेऊ नका. जुने मित्र भेटल्याने नॉस्टॅल्जिक व्हाल. ज्येष्ठांकडे लक्ष द्या. नोकरीत जबाबदारीने काम करा. व्यवसायात नव्या कल्पना पुढे जातील, मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात प्रवास करताना त्रास होतील. घरात सासू-सुनांमध्ये भांड्याला भांडे लागेल. कुटुंबात मन आनंदी ठेवा.

मिथुन : नवीन कामाची संधी साधा. आपले म्हणणे इतरांना पटवून द्या. व्यवसायात नवे प्रयोग यशस्वी होतील. कामांसाठी कोणावर अवलंबून राहू नका. कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. आपल्यातील कलेमधून व्यावसायिक संधी चालून येईल. थकीत येणे वसूल होईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तरुणांना करियरमध्ये नव्या संधी सापडतील. नोकरदारांना अधिकचे कष्ट पडतील. खर्च जपून करा. विद्यार्थ्यांना स्पर्धेत घवघवीत यश मिळेल. कुणाला सल्ले देण्याचा भानगडीत पडू नका.

कर्क : खटकणारी घटना घडल्याने रागाचा पारा वाढू देऊ नका. सामाजिक कार्यातून कर्तृत्त्व फुलेल. प्रेमाचा संवाद कामे हलकी करेल. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी होतील, त्यातून आनंद वाढेल. व्यवसायात घाईचे धोरण घात करेल. सबुरीने घ्या. ज्येष्ठांचा सल्ला माना. घरात वाढीव काम करावे लागेल. सहलीचे नियोजन होईल. आध्यात्मासाठी वेळ द्याल. दानधर्म कराल. व्यवसायाचा विदेशात विस्तार करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबात किरकोळ वाद होतील. निर्णय घेताना घाई करू नका. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळा.

सिंह : व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. वरिष्ठ खूष होतील. घरात काही वेळेला द्विधा मनस्थिती राहील. निर्णय चुकू शकतात. आवाका पाहून काम करा. तरुणांना घाईचे धोरण त्रासदायक ठरेल. काही गोष्टी मनात ठेवा. कामात वेळेचे गणित बिघडू देऊ नका. नवीन ओळखीतून व्यवसायाची संकल्पना पुढे जाईल. प्रेमात वाद होतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातल्या अडचणी दूर होतील. मानसिक बळ वाढवा. योगा, ध्यान यासाठी वेळ द्या. नातेवाईकांसाठी वेळ खर्च कराल. पत्नीशी जुळवून घ्या.

कन्या : काही प्रश्न सामोपचाराने सोडवा, तडजोड करा. नाराजीकडे दुर्लक्ष करा. उगाचच विषय ताणू नका, मनस्वास्थ बिघडेल. नोकरीत भावनांचा उद्रेक टाळा. घरी ज्येष्ठांशी जमवून घ्या. मोठे निर्णय घेताना सल्ला घ्या. घरात खर्च वाढेल. तरुणांना सकारात्मक विचारातून यशाचा मार्ग मिळेल. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. वेळ आणि पैसा यांचे नियोजन योग्य पद्धतीने करा. व्यवसायात भरभराट होईल. धार्मिक यात्रा होईल. वाहन चालवताना घाई टाळा. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. महिलांचा उत्साह वाढेल.

तूळ : मनावर लगाम ठेवा. कडक बोलू नका. व्यवसायात निर्णयक्षमता वाढवा. तरुणांना अहंकार त्रासदायक ठरेल. नव्या संधींचा लाभ घ्या. मोठे निर्णय घेताना मन शांत ठेवा. कलाकारांना अपेक्षित यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट लाभदायक ठरतील. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होऊ नका. नोकरीत कामाची तारीफ होईल, उत्साह वाढेल. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल. व्यवसायात मोठे यश मिळेल. निर्णयात घाई करू नका. कुटुंबियांचा सल्ला घेऊनच पुढे जा. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक : कोणाच्या भावना दुखावू नका. आत्मविश्वास वाढवा. मित्रांशी जुने वाद उसळू देऊ नका. मदतीचे धोरण ठेवा. नोकरीत मनावरील दडपण वाढवून घेऊ नका. वरिष्ठांच्या साथीने कामे झटपट पुढे जातील. कामानिमित्त प्रवास कराल. व्यवसायात यश मिळेल. अभियांत्रिकी व्यवसायात नव्या संधी येतील. त्यातून अर्थार्जन होईल. परिस्थितीचे भान ठेवा. अहंकारी वृत्ती टाळा. लेखक, प्रकाशक, कलाकारांना यशदायी काळ. सरकारी कामात शिस्त पाळा. अति आत्मविश्वास दाखवणे टाळा. दाम्पत्यजीवनात आनंद देणारे दिवस.

धनु : मनापासून कष्ट करा, यश नक्की मिळते. कमी बोला. अपेक्षा न ठेवता कामे करा. वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. तरुणांना समंजसपणा कामी येईल. कोर्टकचेरीच्या कामांत यश मिळेल. सल्लामसलतीने निर्णय घ्या. व्यवसायात उत्साह वाढेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. कामाच्या ठिकाणी त्रास होईल. अचानक खर्च वाढेल. घरात मालमत्तेच्या संदर्भातील चर्चेत आपलेच म्हणणे पुढे रेटू नका. लेखक, संगीतकारांना मानसन्मान मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्यावा लागेल.

मकर : कामात वेळेचे नियोजन करा. तरुणांना नव्या संधी लाभतील. नम्रता बाळगा. जुन्या अनुभवातून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. व्यवसायात डोळ्यात तेल घालून काम करा. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. आमदनी पाहूनच खर्च करा. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढेल. शिक्षण क्षेत्रात नवीन संधी चालून येतील. लेखक, प्रकाशकांना आनंदवार्ता कळेल. पत्नीशी वाद होतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. मित्रांबरोबर वेळ घालवाल. घरात वाद घालू नका. वास्तू खरेदीचे योग जुळून येतील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : कुटुंबात सबुरीचे धोरण ठेवा. नोकरीत अपेक्षापूर्ती होईल. पालकांशी जमवून घ्या. अचानक बाहेरगावी जाल. आर्थिक नियोजन करा. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. भावंडांशी सामोपचाराने घ्या. गैरसमज टाळा. आरोग्याचे गणित सांभाळा. सार्वजनिक ठिकाणी अरेरावी करू नका. सहलीत साहस टाळा. छंदातून आनंद मिळेल. सरकारी कामात घाई नको. भागीदारीत किरकोळ वाद टाळा. समंजसपणाची भूमिका घ्या. मुलांना यशासाठी वाढीव कष्ट घ्यावे लागतील. कायद्याची चौकट मोडू नका. आप्तेष्टांच्या भेटी होतील.

मीन : व्यक्त होणे, टीका करणे टाळा. आश्वासने देऊ नका. गुंतवणुकीच्या बाबतीत फसव्या योजनांपासून सावध राहा. व्यवसायात वेळेचे गणित चुकू देऊ नका. मुलांच्या वागण्याकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. वायफळ खर्च करू नका. आर्थिक गणित बिघडेल. आरोग्य सांभाळा. खाण्यापिण्यात अतिरेक नको. व्यवसायात दगदगीचा काळ. मनशांती टिकवून ठेवा. मुलांसोबत अधिक वेळ व्यतीत कराल. नोकरीत वाढीव काम करावे लागेल. वरिष्ठांची मने सांभाळा. राग व्यक्त करू नका.

Previous Post

झूम बराबर झूम शराबी ऽऽऽ

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय, नो. नेव्हर…

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.