• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

भास्कर आचार्य (१७ ते २३ जानेवारी)

marmik by marmik
January 19, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य

ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, गुरु मिथुनेत, केतू सिंहेत, बुध वृश्चिकेत, रवि-मंगळ-शुक्र-बुध-प्लुटो मकरेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत. दिनविशेष : १७ जाने. रोजी अमावस्या आरंभ, रा. १२ वा. ०३ मि., १८ जाने. रोजी मौनी अमावस्या समाप्ती. रात्री १ वा. २१ मि., २२ जाने. रोजी श्री विनायक चतुर्थी, श्री गणेश जयंती २३ जाने. रोजी वसंत पंचमी.

 

मेष : नोकरी-व्यवसायात कर्तृत्व दाखवाल. कामात घाई टाळा. भावनांना आवर घाला. मैत्री आणि व्यवहार यांची गल्लत करू नका. तरुणांना यश मिळेल. घरात काही बाबतीत दोन पावले मागे जा. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. सरकारी कामात शॉर्टकट टाळा.मित्रांशी मतभेद होतील. काम सकारात्मक पद्धतीने पुढे न्या. मुलाकडून शुभवार्ता कळेल. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. कामाचा गौरव होईल, उत्साह वाढेल. गुंतवणुकीचा प्लॅन पुढे ढकला. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. मोठे निर्णय घेताना जपून. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील.

 

वृषभ : कामात अडचणी येतील. संयम ठेवा. नोकरीत आळस महागात पडेल. व्यवसायात घाई टाळा. कामाचा ताण येईल. वेळेचे गणित बिघडेल. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी बुद्धीचातुर्यच कामी येईल. कुटुंबासोबत प्रवासाला जाल. देवदर्शनातून समाधान मिळेल. तरुणांनी गोड बोलून कामे पुढे न्यावीत. घरात वाद टाळा. पत्नी-मुलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अडकलेली कामे पुढे सरकतील. मौज-मजेपासून दूर राहा.  सासू-सुनांमध्ये भांड्याला भांडे लागू लागू शकते.

 

मिथुन : मनातल्या गोष्टी कोणाला सांगू नका. बंडखोर वृत्ती टाळा. कोणाला चुका सांगू नका. नातेवाईकांशी जमवून घ्या. मुलाकडून आनंद वाढवणारी बातमी कळेल. तरुणांनी आपले म्हणणे लावून धरू नये. सबुरीने घ्या. अचानक आनंद वाढेल. अनपेक्षित फळे देणार्‍या घटनांची प्रचिती येईल. व्यवसायात वेळ व कामाचे गणित सांभाळा. ताण वाढू देऊ नका. नवीन गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. त्याचे नियोजन करा. एखादी महागडी वस्तू घरासाठी खरेदी कराल. सार्वजनिक जीवनात काळजीपूर्वक वागा.

 

कर्क : मनाला पटेल असेच वागा, कुणाच्या सल्ल्याने चालू नका. नोकरीत वरिष्ठ खूष राहणार असले तरी कामात चुका करू नका. मनशांती टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. घरात ज्येष्ठांचा सल्ला माना. तरुणांनी वाढीव कष्ट घ्यावे. व्यवसायात वेळेचे गणित सांभाळा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. अवघड कामे सोपी होतील. वाहन चालवताना काळजी घ्या, वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाजू भक्कम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळा. व्यवसायाचा विदेशात विस्तार होईल.

 

सिंह : व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. तरुणांना घाई महागात पडेल. विचारपूर्वक कामे पुढे न्या. वाणीत गोडवा ठेवा, त्याचा फायदा होईल. शिक्षणक्षेत्रात नवीन कामाच्या संधी येतील. उपकाराच्या ओझ्याखाली अडकू नका. स्पष्टपणा उपयुक्त ठरेल. नोकरीत चांगले दिवस अनुभवाल. हातात पैसे आहेत म्हणून कसाही विनियोग करू नको. प्रेमप्रकरणात वाद होतील. नातेवाईकांना वेळ द्यावा लागेल. कामात चित्त थार्‍यावर ठेवा, चुका टाळा. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील.

 

कन्या : काही ठिकाणी अधिक विश्वास टाकू नका. कोणाला गृहीत धरू नका. स्वतंत्रपणे प्रयत्न करा. नोकरीत परखड मत व्यक्त करणे टाळा. सावध राहून काम करा. व्यवसायात यश मिळेल. तरुणांनी एकाग्रता वाढवावी. घरातील किचकट प्रश्न सोडवा. थोडे थांबून निर्णय घ्या, गरज वाटल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. महिलांचा उत्साह वाढेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. नव्या संधी उपलब्ध करून देणारा काळ. कलाकारांना वाव मिळेल.

 

 तूळ : कसोटीच्या प्रसंगात मित्र-मंडळी मदतीला धावून येतील. नोकरीत शांत राहा. कामे सहज पुढे जातील. संयम आणि हुशारी कामाला येईल. अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार टाळा. नवे मित्र होतील. नोकरीत जपून वागा, बोला. मत व्यक्त करणे टाळा. गुुंंतवणुकीतून लाभ मिळतील. संततीच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. नोकरीच्या निमिताने भ्रमंती कराल. व्यवसायात संयम ठेवा. भागीदारीत काळजी घ्या. आश्वासने देऊ नका. तरुणांना नशिबाची साथ मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल.

 

 वृश्चिक : कामातील विलंबाचा राग कुणावर काढू नका. नोकरी-व्यवसायात आत्मविश्वास वाढेल. मित्रांना मदत करताना विचार करा. आर्थिक गणित सांभाळा. कुणाला उधार-उसनवार देऊ नका. व्यवसायात अडून बसू नका, चर्चेने विषय मार्गी लावा. छोट्या वादाकडे लक्ष देऊ नका. मन प्रâेश ठेवा. मनोरंजनावर वेळ आणि पैसे खर्च होतील. नियोजन करा. आर्थिक बाजू भक्कम राहील. सार्वजनिक जीवनात अहंकार दाखवू नका. सरकारी कामात शिस्त पाळा. अति आत्मविश्वास दाखवणे टाळा.

 

  धनु : आरोग्याचे प्रश्न डोकेदुखी वाढवतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचूक नियोजन करा. अधिक अपेक्षांमधून भ्रमनिरास होईल. काळजी घ्या. घरात ज्येष्ठांची मने दुखावू नका. नोकरीत कामाशी काम ठेवा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. व्यवसायात त्रास होतील. अचानक खर्च वाढेल. सॉफ्टवेअर क्षेत्रात यश मिळेल. घरासाठी वेळ द्या. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. तरुणांसाठी कामात आपण कसे योग्य आहोत, हे पटवून देणे महागात पडेल.

 

मकर : रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कामे बिघडतील. नोकरी व्यवसायात कामापुरतेच बोला. तरुणांना, कलाकारांना यश मिळेल. ध्येय ठेवून काम करा. कामात आत्मविश्वास ठेवा. आपले विचार लादू नव्या व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. घरात वाद टाळा. सरकारी कामांसाठी घाई करू नका. एखादी चूक त्रासदायक ठरू शकते. सोशल मीडियावर काळजी घ्या. सौंदर्य प्रसाधने, सजावटकारांची चलती होईल. उधार-उसनवारी टाळा.लेखक, संगीतकारांना मान सन्मान मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.

 

  कुंभ : कामाच्या आधी व्यक्त होऊ नका. नोकरी-व्यवसायात आत्मपरीक्षण करा. कुटुंबाला वेळ द्या. मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू नका. नवीन व्यवसायाच्या कल्पना पुढे नेताना घाई टाळा. तरुणांना नव्या नोकरीची संधी येईल, ती स्वीकारताना योग्य काळजी घ्या. जुने मित्र भेटतील, छोटी सहल होईल. मौज-मजेवर वेळ खर्च होईल. कायद्याची चौकट मोडू नका. भागीदारीत किरकोळ वाद होतील. समंजसपणाची भूमिका ठेवा. घरगुती कार्यक्रमात आप्तमित्र भेटतील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो.

 

मीन : जपून बोला, ज्येष्ठांशी वाद टाळा. सामंजस्य दाखवा. नोकरीत चौकसपणा कामी येईल. योग्य सल्ल्यानेच मोठे निर्णय घ्या. बँकेचे व्यवहार करताना काळजी घ्या. कर्जप्रकरणे मार्गी लागतील. मोठे व्यापार करण्याचे नियोजन थोडे पुढे ढकला. चोख आर्थिक नियोजन करा. मुलांकडून वायफळ खर्च होईल. व्यवसायात दगदगीचा काळ. मन:शांती टिकवा. मुलांसोबत अधिका वेळ व्यतीत कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. नव्या ओळखीतून चांगले लाभ होतील.

Previous Post

विदेशी नेत्यांच्या चष्म्यातून…

Next Post

हॉटेल नागपूर

Next Post
हॉटेल नागपूर

हॉटेल नागपूर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.