ग्रहस्थिती : हर्षल : वृषभ राशीत, गुरु -मिथुन राशीत, केतू -सिंह राशीत, बुध -वृश्चिक राशीत, रवि – मंगळ -शुक्र – धनु राशीत, राहू -कुंभ राशीत, शनि, नेपच्युन – मीन राशीत, प्लूटो -मकर राशीमध्ये. दिनविशेष : ३, जानेवारी, रोजी शाकंभरी पौर्णिमा, ६, जानेवारी रोजी अंगारक चतुर्थी, चंद्रोदय, रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी.
मेष : नोकरी, व्यवसायात शांत राहा. कटकट टाळा. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. व्यवसायात भ्रमनिरास होईल. तरुणांचा कल चैनीकडे राहील. आर्थिक नियोजन करा. मालमत्तेच्या संदर्भातील प्रश्न लांबणीवर पडल्याने अस्वस्थता वाढेल. सरकारी कामांत त्रास होईल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मोठ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नोकरीत त्रासदायक वाटले तरी बदल स्वीकारा. कामे पुढे नेण्यासाठी वाढीव कष्ट करावे लागतील. ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. मित्रांचे, पत्नीचे सहकार्य लाभेल. व्यक्त होताना काळजी घ्या.
वृषभ : नोकरीत ताण वाढेल. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. तब्येत बिघडेल. कामानिमित्ताने विदेशात जावे लागेल. अचूक आर्थिक नियोजन करा. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. व्यवसायात सबुरी ठेवा. ध्यान, योगासाठी वेळ द्या. मौज-मजेवर वेळ खर्च होईल. आर्थिक बाजू चांगली ठेवा. आपण बरोबर आहोत, हे दाखवत जाऊ नका. तरुणांना अपेक्षित कामाच्या संधी मिळेल. कामानिमित्ताने दूरचे प्रवास घडतील. वाहनाचा वेग आवरा. प्रलोभनाला बळी न पडता निर्णय घ्या. पैसे दामदुप्पट करण्याच्या मोहात अडकू नका. संततीकडून आनंददायी बातमी कळेल.
मिथुन : व्यवसायात चांगले यश मिळेल. भागीदारीची ऑफर तूर्तास पुढे ढकला. नोकरीत वाढीव धावपळ करावी लागेल. तरुणांना वाढीव कष्ट करावे लागतील. खिशात किती पैसे आहेत, त्याचा विचार करा. घरात जबाबदारी झटकू नका. सामाजिक कार्यात यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांना यशदायी काळ. अहंकार दूर ठेवा. कामाच्या नव्या संधी लाभतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. सकारात्मकता वाढवा. भावंडांचे सहकार्य मिळेल. क्रीडापटूंना स्पर्धेत यश मिळेल. कलाकार, संगीतकार, गायकांना नवे काम मिळेल.
कर्क : नोकरीत वरिष्ठ खूष होतील. व्यवसायात नफा होईल. कामात संयम आणि आत्मविश्वासाचा फायदा मिळेल. घरात वाद टाळा. नातेवाईकांना अचानक मदत करावी लागेल. उधार-उसनवारी टाळा. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. विचारांची पद्धत बदला. यशासाठी दोन पावले पुढे जाऊन प्रयत्न करा. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. सहलीत सावधगिरी बाळगा. व्यवसायात जागरण घडेल. पत्नीशी जमवून घ्या.
सिंह : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. तरुणांनी यश डोक्यात जाऊ देऊ नये. मित्रांच्या नादात अडचणीत याल. सरकारी कामात नियम तोडून पुढे जाऊ नका. अतिविचार टाळा. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. कसोटीच्या प्रसंगाचा सामना करावा लागेल. कलाकार, क्रीडापटू, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांचा गौरव होईल. भागीदारीत सबुरीने घ्या. घरासाठी खर्च करावा लागेल. मन शांत ठेवा. मित्रांशी वागताना बोलताना भावनेत अडकू नका. नातेवाईकांशी जपून बोला. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट क्षेत्रात लाभदायक काळ.
कन्या : घरात वैचारिक मतभेद होतील. कुटुंबाशी दुरावा निर्माण होऊ देऊ नका. व्यवसायात आर्थिक गणित बिघडेल. नियोजन करा. शेजार्यांशी जमवून घ्या. नोकरीत आपले म्हणणे रेटू नका. नोकरीत वाढीव काम पडेल. तरुणांच्या मनावर दडपण येईल. व्यवसायात नवी योजना लाभदायी ठरेल. मनाची चंचलता कमी करा, निर्णय चुकू शकतो. कामानिमित्ताने प्रवास कराल. पती-पत्नीत वाद होतील. गुंतवणूक करताना प्रलोभनाला बळी पडू नका. नवीन ओळखीतून भविष्यात लाभ मिळेल. जपून खर्च करा. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
तूळ : व्यवसायात यश मिळेल. फक्त ते टिकवायचा विचार करा. नोकरीत किरकोळ वादांतून बदली होईल, बेताने राहा. जुने येणे वसूल होईल. तरुणांनी कल्पना पुढे नेताना घाई करू नये. नोकरीची संधी मिळेल. मनावर दडपण घेऊ नका. विदेशातील प्रोजेक्ट यशस्वी होईल. व्यवसायात यश मिळवाल. मन स्थिर ठेवा. मित्रमंडळींशी जपून बोला. गैरसमज टाळा. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश येईल. उतावळेपणा टाळा. आपले मत मांडताना फटकळपणा टाळा. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात कौतुक होईल. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा.
वृश्चिक : व्यवसायात तीव्र स्पर्धेतून मानसिक ताण वाढेल. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घेताना त्रास होईल. सतत प्रवासातूनही त्रास होईल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. महिलांना यश मिळेल. तरुणांची कामे लांबणीवर पडल्याने चिडचिड होईल. कामचुकारपणा करू नका. हातातली संधी निसटून जाईल. घरात डोक्यावर बर्फ ठेवा. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रांशी मस्करी नको. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. वागताना बोलताना काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. उधार उसनवारी टाळा. बँकेची कामे मार्गी लागतील.
धनु : कामे पुढे नेताना बारकाईने लक्ष द्या. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. नोकरीनिमित्ताने दूरचे प्रवास कराल. ज्येष्ठ नागरिकांचे जुने आजार डोकेदुखी वाढवतील. मित्रांशी मानापमानाचे प्रसंग उद्भवतील. उच्चशिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. तडजोड स्वीकारा. व्यवसायात कामांना विलंब होईल. युवा वर्गाला समाधान मिळेल. अडलेले प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. जुगार, सट्टा यांच्यापासून दोन हात दूरच राहा. प्रेम प्रकरणात वाद होतील. मानसिक संतुलन बिघडेल. कामाच्या ठिकाणी संयमाने वागा. कुटुंबाशी जमवून घ्या.
मकर : आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत विचारपूर्वक पुढे जा. प्रेमप्रकरणात काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढेल. व्यवसायात मनासारखी स्थिती राहणार नाही. आर्थिक नियोजनात चुकू नका. तरुण वाणीच्या जोरावर कामे सहजपणे पुढे नेतील. सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करा. व्यवसायात टोकाची भूमिका घेणे टाळा. आर्थिक बाजू भक्कम ठेवा. ज्येष्ठांच्या हो ला हो करा. कलाकारांसाठी चांगला काळ. मित्रांशी जपून आर्थिक व्यवहार करा. व्यवसायात उत्कर्ष होईल. विदेशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मुलांकडे विशेष लक्ष ठेवा.
कुंभ : नोकरीत कौतुक होईल. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. तरुणांना अचानक धनलाभ होईल. बँकेची कामे मार्गी लागतील. उधार उसनवारी टाळा. सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करू नका. घरात तुमचे म्हणणे मान्य होईल. पण निर्णय घेताना काळजी घ्या. शेतकरी, वैद्यकीय व्यावसायिक, रियल इस्टेट व्यावसायिकांना लाभदायक काळ. घरात चांगली बातमी समारंभपूर्वक साजरी होईल, त्यानिमित्ताने इष्टमित्रांच्या भेटी होतील. कामात अचूकता ठेवा.
मीन : मने दुखावू नका. सामाजिक कार्यात वाहवा होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कामानिमित्ताने विदेशात जाल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे पुढे सरकतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. प्रेमप्रकरणात जपून. घरात निर्णय घेताना घाई नको. खानपानाचे नियम पाळा. परिस्थिती कौशल्याने हाताळा. दाम्पत्यजीवनात आनंदाचे दिवस अनुभवाल. नातेवाईकांशी जपून आर्थिक व्यवहार करा.
