• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य ३ ते १० एप्रिल २०२६

भास्कर आचार्य

marmik by marmik
April 3, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, गुरु मिथुनेत, मंगळ, बुध, राहू कुंभ राशीत, केतू-सिंह राशीत, रवि, शुक्र, शनि, नेपच्युन -मीनेत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : ५ एप्रिल संकष्टी चतुर्थी, १० एप्रिल कालाष्टमी.

 

मेष : घरात शुभकार्याची लगबग राहील. व्यवसायात निर्णय लाभदायक ठरतील. नोकरीत सबुरीने घ्या. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. आमदनी व खर्चाचा ताळमेळ घाला. नवीन नोकरीची संधी चालून येईल. अर्धवट निर्णय घेऊ नका. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. मौज-मजा टाळा. अति आत्मविश्वास दाखवू नका. महिलांशी सौजन्याने वागा. जुनी कामे झटपट पूर्ण होतील. समाजकार्यात वेळ खर्च होईल. मालमत्तेचे व्यवहार घाई न करता सावकाशीने करा. सट्टा, लॉटरीच्या आहारी जाऊ नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वासून निर्णय घेऊ नका.

वृषभ : तरुणांना नोकरीची संधी येईल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. रखडलेली कामे पुढे सरकतील. नवीन घर घेण्याचा योग जमून येईल. काही बाबतीत मौन बाळगा. घरात, बाहेर बोलताना-वागताना काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती बिघडून देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. कामात किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल. सामाजिक कार्यात सन्मान होईल.

मिथुन : धार्मिक कामात रमाल. महिलांचा वेळ समाजकार्यात खर्च होईल. मनस्वास्थ उत्तम ठेवा. कुटुंबासोबत पर्यटनाचे नियोजन कराल. व्यवसायात नव्या योजना पुढे येतील. आठवड्याअखेर स्पर्धेचा सामना कराल. अहंकार त्रासदायक ठरेल. घरात गोड बोलून कामे करा. मोठा निर्णय घेताना घाई नको. नोकरीत कामाचे गणित गडबडेल. सरकारी कामे कायद्याच्या चौकटीत राहूनच करा. तरुणांचे आर्थिक गणित बिघडेल. देवधर्मासाठी वेळ खर्च होईल. हातून दानधर्म घडेल. कर्जप्रकरणे मार्गी लागतील.

कर्क : घरात वाद होऊ शकतात. चांगला संवाद ठेवा. कामे अलगद पुढे सरकतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना विचार करा. नोकरीत मनासारखी कामे होणार नाहीत. मनस्वास्थ बिघडू शकते. मोठी कामे पुढे ढकला. आश्वासने देऊ नका. मित्रांशी जेवढ्यास तेवढे ठेवा. युवकांना, महिलांना यश मिळेल. मुलाकडून चांगली बातमी कळेल. घरातील आनंद द्विगुणित होईल. नवीन मालमत्ता घेण्याचा प्रश्न मार्गी लावण्याआधी वकील, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. बँकेची, कर्ज प्रकरणाची कामे करताना घाई नको.

सिंह : व्यवसायात चांगले पैसे मिळतील. मामा-मावशींकडून मदत मिळेल. नोकरीत आत्मचिंतन करा. भागीदारीत सबुरीने घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकला. मुलांमुळे डोकेदुखी वाढेल. घरात संयम ठेवा. आर्थिक आवक बेताची राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस कामात मन लागणार नाही. तरुणांच्या बाबतीत शुभघटना कानावर पडतील. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. औषध व्यवसाय, ब्रोकर धंद्यात आर्थिक लाभ मिळेल. इंजिनीअर मंडळींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. ध्यानधारणेत मन रमवा.

कन्या : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत दूरचे प्रवास कराल. वरिष्ठ कामावर खूष होतील. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. ज्येष्ठांचा सल्ला माना. मुलांशी वाद होतील. कुटुंबात किरकोळ कुरबुरी होतील. आर्थिक नियोजनात चूक टाळा. मित्रांशी वाद टाळा. सुटीत प्रवासाचे बेत आखाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीचा मोह होईल. अनावश्यक खर्च टाळा. कामे न झाल्यास कुणाला दोष देऊ नका.

तूळ : व्यवसायात सुवार्ता कळेल. मित्र-मैत्रिणी भेटतील. नोकरीत मनासारखी गोष्ट घडेल. मतभेद दूर होतील. कामात शॉर्टकट वापरू नका. तरुणांच्या मनासारखी कामे होतील. घरात आर्थिक नियोजनात काळजी घ्या. संस्मरणीय घटनांमुळे आठवडा चांगला जाईल. कोर्टातील दावे मार्गी लागतील. सामाजिक मान-सन्मान देणारे प्रसंग घडतील. कलाकारांसाठी, सरकारी नोकरदारांसाठी उत्तम काळ. नवीन गुंतवणूक पुढे ढकला. प्रेमात वाद होतील. जुने आजार डोके वर काढतील. महिलांनी आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. घरात शुभकार्य होईल. शिक्षक, संशोधकांना नव्या कामाच्या संधी मिळतील.

वृश्चिक : भावाकडून मदत मिळेल. वाद टाळा. नोकरीत कष्ट पडतील. मुलांना खूप अभ्यास करावा लागेल. व्यवसायात चिंतेची स्थिती निर्माण होईल. नव्या व्यक्तीची ओळख काम पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. घरात रागावर नियंत्रण ठेवा. आठवड्याअखेर कामाचा ताण येईल. गुंतवणूक लाभ मिळवून देईल. व्यवसायवृद्धीत यश मिळेल. आर्थिक बाजू सांभाळताना जपून. विचार न करता निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या नव्या संधी चालून येतील. घरात ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु : कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. मित्रांशी वाद होतील. तरुणांना नोकरीची संधी मिळेल. गोडीने वागा. शेजार्‍यांशी वाद टाळा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. प्रेमात डोकेदुखी वाढेल. व्यवसायात खिसा भरलेला राहील. लांबच्या सहलीत नव्या ओळखी होतील. व्यवसायाला चालना मिळेल. नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळेल. बदली होईल. सामाजिक कामातून प्रसन्नता वाढेल. कलाकारांना मान-सन्मान मिळेल. संशोधकांचे सगळीकडे कौतुक होईल. मनासारख्या घटना घडतील.

मकर : आत्मविश्वास वाढेल. कामात कौतुक होईल. व्यवसायात नुकसान होईल. दोन पावले मागे घेणे इष्ट ठरेल. नोकरीत शब्दाला मान राहील. वरिष्ठ खूष राहतील. तरुणांना दिशा मिळेल. नव्या व्यवसायाच्या कल्पना आकाराला येतील. आर्थिक नियोजनात चूक करू नका. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. पर्यटनासाठी बाहेरगावी जाल. घरातले वातावरण आनंदी राहील. मुलाकडून आनंद वाढवणारी बातमी मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. मित्रांशी जेव्हढ्यास तेवढे ठेवा. थकीत येणे वसूल होईल.

कुंभ : अचानक अनावश्यक खर्च वाढेल. नोकरीत वाद होतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. भागीदारीत वाद होतील. तरुण शिक्षणात चांगली प्रगती करतील. कुटुंबीयांसह दूरचे प्रवास घडतील. मनासारख्या चार गोष्टी घडतील. मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात वेळ खर्च होईल. सरकारी कामे मागे पडतील. मित्र मंडळी, नातेवाईक यांना उधार-उसनवारी देणे टाळा. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढलेले दिसेल, पण दुसर्‍या बाजूला खर्च वाढेल. चैनीची वस्तू खरेदी कराल. नियमात राहून काम करा.

मीन : मनावरचे दडपण वाढेल. तडजोड करणे फायदा देईल. व्यवसायात धाडस अंगाशी येईल. उष्णतेचे आजार त्रासदायक ठरतील. कुटुंबाशी जमवून घ्या. तरुणांनी संयम दाखवणे उपयुक्त राहील. नोकरीत मीच बरोबर आहे, असे धोरण नको. घरात शुभकार्ये घडतील. नवे घर, जमीन घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. कोणालाही आंधळा विश्वास ठेवून माहिती देऊ नका. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. खेळाडूंना यश मिळणार नाही. छंदातून आनंद वाढवणारी घटना घडेल.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

प्रश्नपत्रिकेत खरातबाबा!

Next Post
प्रश्नपत्रिकेत खरातबाबा!

प्रश्नपत्रिकेत खरातबाबा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.