• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (२८ मार्च ते ३ एप्रिल)

भास्कर आचार्य

marmik by marmik
March 27, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभ राशीत, गुरु मिथुनेत, मंगळ, बुध, राहू कुंभेत, केतू सिंहेत, रवि, शुक्र, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : २९ मार्च कामदा एकादशी, ३० मार्च सोमप्रदोष, ३१ मार्च महावीर जयंती, २ एप्रिल श्री हनुमान जयंती, ३ एप्रिल गुड फ्रायडे.

मेष : उधार-उसनवारीचे व्यवहार त्रासदायक ठरतील. नोकरी-व्यवसायात शाब्दिक चकमकी होतील. वाणी नियंत्रणात ठेवा. सल्ला देणे अंगाशी येईल. व्यवसायात स्पर्धा दिसेल. प्रवासात मनस्ताप होतील. तरुणांना यशासाठी झटावे लागेल. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ. नव्या कल्पना दमाने पुढे न्या. आर्थिक बाजू सांभाळा. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. आठवड्याच्या मध्याला घरी एखादा कार्यक्रम होईल. जुनी कामे झटपट पूर्ण होतील. समाजकार्यात वेळ खर्च होईल. मालमत्तेच्या व्यवहारात काळजी घ्या. सट्टा, लॉटरीपासून दूर राहा. मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चा टाळा.

वृषभ : नोकरीत चिंता वाढेल. व्यवसायात जपून पावले टाका. आर्थिक नियोजनात चुका करू नका. तरुणांना वेळ आणि कामाचे गणित याचा ताळमेळ साधा. भागीदारीत त्रास होतील. मुलांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. कलाकारांना अपेक्षित यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. वाहन चालवताना अपघात होईल. मुलांकडे लक्ष ठेवा. डोकेदुखी वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. घरात धीराने घ्या, घाईने निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील.

मिथुन : व्यवसायात आर्थिक व्यवहार गडबडतील. तरुणांना बुद्धीच्या जोरावर यश मिळेल. भावंडांकडून मदत मिळेल. आठवड्याच्या मध्याला व्यावसायिकांना यश मिळेल. घरात वाद टाळा. ज्येष्ठांशी जमवून घ्या. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. प्रेमप्रकरण त्रासदायक ठरेल. चेष्टामस्करी टाळा. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. सरकारी कामे पूर्ण होतील. गुंतवणूक करताना मोहाच्या जाळ्यात अडकू नका. कौटुंबिक धार्मिक सहलीवर जाल. ध्यान, योगाला वेळ द्या. घरासाठी महागडी वस्तू घ्याल.

कर्क : नोकरीत पगारवाढ होईल. ज्येष्ठ नागरिकांना जुनाट आजार त्रास देतील. तरुणांच्या खर्चाचे प्रमाण वाढेल. संभाषणात पथ्ये पाळा. घरात ऐकून घेण्याचे धोरण ठेवा. कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. शिक्षक, संशोधकांचा गौरव होईल. मित्र मदतीला धावतील. व्यावसायिक विस्ताराच्या योजना पुढे सरकतील. मार्केटिंग क्षेत्रात यश मिळेल. तरुणांना नोकरीच्या संधी येतील. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. महिलांना समाजकार्यातून आनंद मिळेल.

सिंह : मनाविरुद्ध घटना घडतील. कामे लांबणीवर पडतील. व्यवसाय-नोकरीत काम आणि वेळ यांचा ताळमेळ सांभाळा. वरिष्ठ नाराज होतील. संयम आणि आत्मविश्वासामुळे कामे पुढे जातील. तरुणांना संधी मिळतील. शब्दावर नियंत्रण ठेवा. महिलांशी बोलताना काळजी घ्या. महिलांना आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. घाईने कामे बिघडतील. आरोग्याचे किरकोळ प्रश्न निर्माण होतील. इंजिनीअरांना नवी संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी मौजमजा कराल. मोठे आर्थिक व्यवहार लांबणीवर टाका.

कन्या : नोकरीत शब्दाला मान मिळेल. व्यवसायात जपून पुढे जा. येणे वसूल होईल. गुंतवणूक लाभ मिळवून देईल. प्रेमप्रकरणात वाद होतील. घरात संवाद ठेवा. तरुणांनी कष्ट करावे. ब्रोकर मंडळींनी काम काळजीपूर्वक पुढे न्यावे. मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू नका. विदेशात नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. भागीदारीत वाद होतील. कुटुंबात किरकोळ कुरबुरी घडतील. तुटेपर्यंत ताणू नका. सुटीच्या निमित्ताने प्रवासाला जाल.

तूळ : काहीही झाले तरी प्रतिक्रिया देऊ नका. काम बिघडू शकते. कलाकारांना यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. लेखक, प्रकाशकांसाठी चांगला काळ. व्यवसायात धिम्यागतीने पुढे जा. सरकारी कामे पुढे सरकतील. शिक्षणक्षेत्रात मनासारख्या घटना घडतील. भावा-बहिणीशी जमवून घ्या. नवीन नोकरी मिळेल. घरात आर्थिक नियोजनात काळजी घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरात शुभकार्य घडेल. मुलांच्या बाबतीत संस्मरणीय घटना घडतील. सामाजिक जीवनात मान-सन्मान मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ. प्रेम प्रकरणात सांभाळून घ्या.

वृश्चिक : मानसिक संतुलन चांगले ठेवा. कलाकारांना आणि संशोधकांना यशदायी काळ. व्यवसायात अडकलेली कामे पुढे सरकतील. आमदनी आणि खर्च यांचे गणित बिघडेल. बँकेच्या कामाला उशीर होईल. ज्येष्ठांचा सल्ला कामाला येईल. वाहनखर्च वाढेल. नवीन घर घेण्याची बोलणी पुढे सरकतील. मित्रांशी जमवून घ्या. नवीन वास्तू घेण्याचा विचार पुढे ढकला. नोकरीत नियोजन करून पुढे जा. कुटुंबासोबत भरपूर वेळ खर्च कराल. सार्वजनिक जीवनात घाई टाळा. अति विश्वास आणि अहंकार बाजूला ठेवा.

धनु : बुद्धिजीवींना यश मिळेल. तरुणांच्या मनोकामना पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. गुरुकृपेची साथ मिळेल. व्यवसायात अपेक्षित घडामोडी होतील. मामा-मावशींची मदत मिळेल. नव्या संकल्पना पुढे सरकतील. कुणाला आर्थिक मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. कुटुंबात आनंद वाढेल. दूरच्या सहलीला जाल. नव्या ओळखी होतील. चांगला फायदा होईल. सामाजिक कामातून आनंद मिळेल. कलाकार, शिक्षक, संशोधकांना मान-सन्मान मिळेल.

मकर : कलाकारांच्या उत्कर्षाचा काळ. घरात वाद टाळा. विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी होतील. व्यवसायात यश मिळेल. आमदनी चांगली राहील. आज रोख उद्या उधार हे धोरण ठेवा. नोकरीत आपले म्हणणे रेटू नका. समाजकार्यात काम बोलेल. युवकांना दिशादर्शक मार्ग सापडेल. प्रसिद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन कामी येईल. मित्रांशी जेवढ्यास तेवढे ठेवा. थकीत येणे वसूल होईल. पर्यटनासाठी बाहेरगावी जाल. घरात समारंभ होईल. खेळाडूंना यश मिळेल. आर्थिक आश्वासनांना बळी पडू नका.

कुंभ : संतुलित कृतीचा फायदा होईल. नवीन नोकरीची संधी येईल. व्यवसायात यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. लेखकांचा सन्मान होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. गाठीभेटीमधून कामे पुढे सरकतील. ब्रोकरांना आर्थिक लाभ मिळेल. मनस्ताप टाळा. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. शिक्षणक्षेत्रात चांगला अनुभव येईल. मित्र, नातेवाईकांना उधार-उसनवारी देणे टाळा. आर्थिक लाभ वाढेल. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. नियम तोडू नका. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल.

मीन : नोकरी-व्यवसायात सुस्थिती राहील. वरिष्ठ तारीफ करतील. अहंकार त्रासदायक ठरेल. प्रवासात वस्तूची काळजी घ्या. तरुणांनी नवे पर्याय शोधावे. चित्त स्थिर ठेवा. आंधळा विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नका. वाहन चालवताना अति वेग टाळा. घरात भूमिकेवर ठाम राहणे त्रासदायक ठरेल. संयमाने कामे हलकी होतील. घरात शुभकार्ये घडतील. नवीन घर, जमीन घेण्याचे प्रयत्न पुढे जातील. कलाकारांसाठी उत्तम काळ. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. आर्थिक नियोजन बारकाईने करा.

Previous Post

पंचतारांकित प्रेमकथा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.