ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, गुरु मिथुनेत, मंगळ, बुध, राहु कुंभेत, केतू सिंहेत, रवि, शुक्र, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत.
दिनविशेष : २१ मार्च रमजान ईद २२ मार्च श्री विनायक चतुर्थी, २३ मार्च श्री पंचमी, २६, मार्च श्रीराम नवमी आणि दुर्गाष्टमी.

मेष : वाणी गोड ठेवा. मित्रांशी जेव्हढ्यास तेवढे ठेवा. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रशंसेला भुलून भावनेत अडकू नका. घरात आनंद वाढेल. व्यवसायवृद्धी होण्याचे संकेत आहेत. भाऊ, बहिणीशी जमवून घ्या. घरात कुरबुरीचे प्रसंग टाळा. पत्नीच्या मदतीने काम मार्गी लागेल. व्यवसायात नव्या कल्पना आकाराला येतील. तरुणांना मोठे यश मिळेल. नोकरीत ताण वाढेल, ज्येष्ठांशी वाद होतील. जुने आजार डोकेदुखी वाढवतील. आर्थिक बाजू चांगली राहील. भागीदारीत सबुरीने घ्या. संयम कामी येईल. कामे मार्गी लागतील. स्पष्ट राहणे फायद्याचे ठरेल. सकारात्मक विचार करा.

वृषभ : कामात चुका टाळा. कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. सामाजिक कार्यात गौरव होईल. व्यवसायात स्पर्धेचा सामना कराल. नातेवाईकांशी वाद होतील. शिक्षक, संशोधकांना यश मिळेल. नोकरीत यश मिळेल. घरात आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना घवघवीत यश मिळेल. व्यवसायात अहंकार टाळा. पत्रकार, लेखक, संपादक, प्रकाशकांसाठी चांगला काळ. घाईत आर्थिक व्यवहार करू नका. छंदामुळे लौकिकात भर पडेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन घराचे नियोजन मार्गी लागेल.

मिथुन : नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. मनातल्या गोष्टी ओठावर आणू नका. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना कराल. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होईल. कुटुंबात जमवून घ्या. तरुणांना नोकरीच्या संधी मिळतील. इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल. अतिआत्मविश्वास महागात पडेल. व्यवसायात उधार-उसनवारीचे व्यवहार टाळा. आठवड्याच्या मध्यास घरात खर्च वाढेल. सट्टा, लॉटरीमध्ये नुकसान होईल. मुलांना यश मिळेल. चांगली बातमी कानावर पडेल.

कर्क : धाडसी वृत्ती अंगाशी येईल. दोन पावले मागे ठेवून काम करा. नोकरीत प्रवास कराल. व्यवसायात नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील. घरात शुभकार्य होईल. मामा-मावशीची मदत मिळेल. जाहीर वाद टाळा. नवीन वाहन खरेदी कराल. तरुणांना सुयश मिळेल. मौज-मजेवर खर्च होतील. घरात ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. मित्रांशी वाद होतील. उच्चशिक्षणाच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. नवीन गुंतवणूक व आर्थिक व्यवहार जपून करा.

सिंह : नोकरीत ताण वाढेल. प्रेमप्रकरणात वाद होतील. व्यवसायात यश मिळेल. जबाबदारी ओळखून काम करा. तरुणांना गोंधळात टाकणारी घटना घडेल. महिलांच्या आरोग्याच्या समस्या डोके वर काढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. वायफळ खर्च टाळा. मौज-मजा नकोच. आठवड्याअखेरीस कौटुंबिक खर्च वाढेल. महिला व्यावसायिकांना यश मिळेल. मुलांना स्पर्धेत यश मिळेल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात कार्यक्षेत्र वाढेल. आध्यात्मिक कार्यात वेळ खर्च होईल.

कन्या : नोकरी-व्यवसायात नव्या आव्हानांचा सामना कराल. ज्येष्ठांचा सल्ला कामी येईल. प्रवासात वाद घडतील. उच्चशिक्षणात अधिक मेहनत घ्याल. सरकारी कामांत धावपळ होईल. मदतीचा हात पुढे करताना जपून. बोलताना गैरसमज टाळा. आरोग्याचे गणित बिघडेल. आर्थिक बाजू चांगली राहील. तरुण मंडळी जल्लोष साजरा करतील. मित्रमंडळींशी व्यवहारात काळजी घ्या. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. शेअर, लॉटरीमध्ये चांगली कमाई होईल.

तूळ : नोकरीत कर्तृत्व दाखवाल. तरुणांना अधिकचे कष्ट करावे लागतील. व्यवसायात व्यवहार आणि भावना एकत्र करू नका. कलाकार मंडळींचा सन्मान होईल. महिलांशी बोलताना काळजी घ्या. खेळाडूंना यश मिळणार नाही. अडकलेले काम नव्या ओळखीमधून मार्गी लागेल. चुका दाखवत बसू नका. घरात वाद टाळा. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायाच्या विदेशात विस्ताराचे नियोजन पुढे जाईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना काळजी घ्या. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. शिक्षणक्षेत्रात नव्या संधी मिळतील.

वृश्चिक : कुटुंबासाठी खर्च कराल. नातेवाईकांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा अनुभव येईल. तरुणांनी कामात गोंधळ टाळावा. फसवणूक होईल. मदतीची अपेक्षा ठेवू नका, भ्रमनिरास होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. लेखक, साहित्यिकांना हुरूप देणारी बातमी कळेल. चारचौघांत बोलताना काळजी घ्या. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल. वादात मध्यस्थी करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

धनु : कामात योग्य दृष्टिकोन ठेवा. घरात वाद टाळा. अहंकार त्रासदायक ठरेल. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नका. तरुणांचा आनंद आणि उत्साह वाढेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. कोणाला आश्वासने देऊ नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. समाजकार्यात वेळ खर्च होईल. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात लाभ होईल. कलाकारांसाठी उत्तम काळ. घरात कामाचे नियोजन करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

मकर : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मनातल्या गोष्टी कुणाला सांगू नका. नोकरीत वाद होतील. कामात चुका टाळा. व्यवसायात लाखाचे बारा हजार होतील, असे निर्णय घेऊ नका. कृती करण्याअगोदर विचार करा. मुलांच्या चुका माफ करा. घरात आनंद साजरा होईल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांसाठी उत्तम काळ. सरकारी कामे पुढे सरकतील. मामाकडून अपेक्षित मदत होईल. शिक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. घरात जमवून घ्या. ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

कुंभ : वेळेचे नियोजन चुकवू नका. नोकरीत आपलेच बरोबर दाखवू नका. व्यवसायात कामाचे गणित बिघडेल. पत्नीची मदत मिळेल. आठवड्याच्या शेवटी कामाचा कंटाळा येईल. मित्रांशी अधिकची जवळीक करू नका. उधार उसनवारी देणे टाळा. आत्मविश्वास वाढेल. खेळाडूंना यश मिळेल. आनंददायी घटना घडेल. तरुणांचा नवी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नातेवाईकांत कटुता निर्माण होईल. कलाकारांना यश मिळेल. नवीन आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. सामाजिक जीवनात सन्मान मिळेल.

मीन : व्यवसायात नवीन संधी मिळेल. राग व्यक्त करू नका. विदेशात शिक्षण घ्याल. सकारात्मक विचार करा. सामाजिक कार्यातून प्रगती कराल. तरुणांना यशासाठी अधिकचे कष्ट पडतील. बँकेची कामे विलंबाने होतील. संयमी भूमिका घ्या. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. कुणाच्या सल्ल्याने निर्णय घेणे टाळा. मुलांकडून शैक्षणिक बातमी कानावर पडेल, त्यामुळे घरातील वातावरण आनंद देईल. नोकरीत कामाचा ओघ वाढेल.
