ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, गुरू मिथुनेत, केतू सिंहेत, बुध वृश्चिक राशीत, रवि, मंगळ, शुक्र धनु राशीत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : २० डिसें. अमावस्या समाप्ती स. ७ वा. १२ मि., २३ डिसें. श्री विनायक चतुर्थी, अंगारक योग, २५ डिसें. ख्रिसमस नाताळ.

मेष : अतिरिक्त धनलाभ होईल. पैसे सुरक्षित ठेवा. मौजमजेवरील खर्चातून मनस्ताप होईल. स्पष्टपणा कामी येईल. संयमी आणि शांत राहा. नोकरीत कामाचा कंटाळा करू नका. वित्तीय कर्मचार्यांनी काळजी घ्यावी. घरात वागताना-बोलताना काळजी घ्या. ज्येष्ठांचा आदर करा. कामाचा हुरूप वाढेल. तरुणांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. व्यवसायात सकारात्मक विचारातून विषय मार्गी लागेल. धार्मिक ठिकाणांना भेटी द्याल. आप्तेष्टमित्रांशी गाठीभेटी घडतील. कलाकारांचे मान-सन्मान होतील. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. जुनी कामे पूर्ण होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल.
वृषभ : नोकरी-व्यवसायात जमवून घ्या. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. सबुरी आणि संयम ठेवा. कामाला विलंब झाला म्हणून आक्रमक भूमिका घेऊ नका. मित्रांबरोबर भटकंती कराल. लॉटरी, सट्ट्यापासून दूर राहा. घरात-बाहेर जपून बोला, वागा. नोकरी शोधणार्यांना यश येईल. दाम्पत्यजीवनात आनंदी वातावरण राहील. नव्या संकल्पना पुढे नेताना घाई टाळा. ज्येष्ठांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षकांना यश मिळेल. नोकरी-व्यवसायात यश मिळवाल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तरुण मनोरंजनात रमतील.
मिथुन : विलंब झाला तरी चालेल, पण काही कामे धीराने करा. नोकरी-व्यवसायात अतिरिक्त काम मिळेल, त्याची वाच्यता करू नका. तरुणांना आव्हानांचा सामना करावा लागेल. जुने मित्र भेटतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. घरात आनंद वाढेल. पैशाचे गणित सांभाळा. ध्यानधारणेतून ऊर्जा मिळेल. वेळेचे नियोजन करा, धावपळ टाळा. उधार-उसनवारी करू नका. व्यवसायात पैशाचा मागे धावू नका. घरात किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. खेळाडूंना चांगला काळ. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : इच्छापूर्तीसाठी घाई नको, सगळे गणित बिघडेल. चांगला विचार करा, चांगले फळ मिळेल. शिक्षणक्षेत्रात प्रगती होईल. तरुणांनी साहसी वृत्ती टाळावी. समाजकार्यात यश मिळेल. लेखक, पत्रकार, प्रकाशकांना चांगली बातमी कळेल. घरात कडक बोलणे टाळा. मनासारखी कामे झाल्याने ऊर्जा वाढेल. नोकरीत शब्दाला मान राहील. नवीन नोकरीच्या संधी मिळेल. कलाकारांसाठी उत्कर्षाचा काळ. सर्वत्र संयम ठेवा. घरासाठी खर्चाचे नियोजन करा. व्यवसायात पारदर्शक व्यवहार ठेवा. नवीन गुंतवणूक फायद्यात राहील. मित्रांबरोबर मौजमजा कराल.
सिंह : वाद टाळा. समोरच्याऐवजी स्वत:मध्ये बदल करा. नोकरी, व्यवसायात प्रवासातून आनंद मिळेल. अडचणींवर मात कराल. तरुणांना कामाच्या संधी मिळतील. सार्वजनिक ठिकाणी प्रतिक्रिया देणे टाळा. काही ठिकाणी वेळ आणि स्थळ पाहून स्पष्ट बोला. मनस्वास्थ्य जपा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. तरुणांना सुवार्ता कळतील. जुनी कामे मार्गी लागतील. विनाकारण वाद टाळा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. भावंडांची मदत मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. व्यवसायात धावपळ टाळा. नोकरीत भाग्योदय होईल.
कन्या : कामातील पेचप्रसंगांवर संयम व कौशल्याने मात करा. अडकलेली कामे नव्या ओळखींतून मार्गी लागतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. अन्यथा काम बिघडेल. तरुणांना यश मिळेल. व्यवसायात मुंगी होऊन साखर खा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. इस्टेट एजंट, बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कुठेही मध्यस्थी करताना जपून. कागदपत्रांवर डोळे झाकून सही करू नका. व्यवसायात बुद्धिकौशल्याच्या जोरावर यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होईल, कामाचा हुरूप वाढेल. आर्थिक बाजू सांभाळून घ्या.
तूळ : द्विधा मनस्थितीतून शांतपणे विचार करून पुढे जा. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंद वाढेल. काम आणि वेळेचे गणित साधा. उतावळेपणा टाळा. भागीदारीत सबुरीने घ्या. ज्येष्ठांचा सल्ला ऐका. आपले मत जपून मांडा. नातेवाईक, जुने मित्र यांच्याशी गाठीभेटी होतील. नोकरीत काळजीपूर्वक काम करा. वरिष्ठ अधिकार्यांना अरेला कारे करू नका. संततीकडून आनंददायी बातमी कळेल. तरुणांना नव्या संधी मिळतील. कौटुंबिक सहलीतून आनंद मिळेल. नवा व्यवसाय सुरू कराल. खेळाडू, कलावंतांना उत्तम काळ.
वृश्चिक : अंगापेक्षा बोंगा जड असे करू नका. नोकरी, व्यवसायात झेपतील तेवढीच कामे स्वीकारा. कामात थांबू नका, चालत राहा. काही गोष्टी पटल्या नाहीत तर दुर्लक्ष करा. एकाग्रता आणि संयम ठेवा. मित्रांशी मनात राग ठेवून बोलू नका. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. समाजकार्यात प्रतिष्ठा वाढेल. कामाचा जोश वाढेल. बँकेची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. भावंडांचं सहकार्य मिळेल. नोकरीत मोजकेच बोला. ब्रोकर, मार्केटिंग, जनसंपर्क अधिकारी, पत्रकार, लेखक, यांच्यासाठी यशदायी काळ राहील.
धनु : समंजसपणा कामी येईल. नोकरीतील राजकारणात पडू नका. नव्या गोष्टींची माहिती करून घ्या, अन्यथा चक्रव्यूहात फसाल. घरात भांड्याला भांडे लागू देऊ नका. मित्रांच्या मदतीला धावून जा. शेजार्यांशी वाद टाळा. आनंदवार्ता कळतील, उत्साह वाढेल. तरुणांना मनासारखी संधी मिळेल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. कामात सबुरीने घ्या. मनशांती वाढेल. जुनी कामे पुढे सरकतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक जीवनात नियमाने चाला. घरात समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या. सामाजिक कार्याचा सन्मान होईल.
मकर : अचानक एखाद्याला मदत करावी लागेल. नकार देऊ नका. मित्रांशी जुने वाद उकरून काढू नका. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन घर घेण्याचा विषय मार्गी लागेल. मतभेदांत फार अडकून राहू नका. तुमच्या कलेतून एखादा व्यवसाय आकाराला येईल. आर्थिक नियोजनात घाईचे धोरण अवलंबू नका. व्यवसायात चांगले यश मिळेल. घरात वाद टाळा. कोणत्याही व्यवहारात अति घाई करू नका. व्यापारी व शिक्षक, संशोधकांसाठी उत्तम काळ. जुना आजार डोके वर काढेल. मध्यस्थी करू नका. सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळा.
कुंभ : जमवून घ्याल तर यशस्वी व्हाल. खोटा बुरखा पांघरून कामे पुढे नेऊ नका. घरासाठी महागडी वस्तू घेण्याचा मोह टाळा. मित्रांना सल्ले देणे, वादात मध्यस्थी टाळा. खेळाडूंसाठी यशदायी काळ. बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. आर्थिक नियोजन करा. व्यवसायात नव्या संधी लाभतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात वाद टाळा. सरकारी कर्मचार्यांना चांगला काळ. शेअर,लॉटरीतून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल.
मीन : नोकरीत अचानक होणारे बदल स्वीकारा. व्यवसायातील ताणाचा आरोग्यावर परिणाम होईल. स्वभावाला मुरड घाला. कामानिमित्त प्रवास करताना दगदग होईल. महिलांशी जपून बोला. अडकलेले प्रश्न नव्या ओळखींमधून मार्गी लागतील. तरुणांनी संयमाने निर्णय घ्यावा. अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. खिशात चांगले पैसे राहतील, पण उधळपट्टी टाळा. नव्या गुंतवणुकीच्या मोहजालात पडू नका. नोकरीत तुमची बाजू भक्कम राहील. नव्या संधी चालून येतील. ध्यानधारणेतून अध्यात्मिक प्रगती साधाल.