• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

Marmik Team by Marmik Team
September 16, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

१९६४ सालातील गणेशोत्सवात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही रविवारची जत्रा पाहून तो काळ, तेव्हाचा गणेशोत्सव अनुभवलेल्यांच्या मनात ‘गेले ते दिन गेले’ अशी खंत दाटून येईल. गणेशोत्सव सार्वजनिक होता तेव्हाही, पण त्याचा झगमगाटी इव्हेंटोत्सव झालेला नव्हता. गणपती आपल्या हक्काचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा गणपती बाप्पा होता; तो इकडचा राजा, तिकडचा सम्राट, नवसाला पावणारा शेठ बनून बसलेला नव्हता. उंच मूर्ती आणि भव्य श्रीमंती देखाव्यांची स्पर्धा लागलेली नव्हती. सर्वसामान्य माणूस आपली गार्‍हाणी घरातल्या, गावातल्या एखाद्या वयाने मोठ्या, जाणत्या माणसाच्या कानावर घालावीत, तशी गणपतीच्या कानावर घालू शकत होता. गणपतीही भक्तांच्या व्यथा विवंचना निदान ऐकून तरी घेत होता, त्यांचं मन हलकं करत होता. आता मात्र, उद्योगपतींनी हायजॅक केलेल्या उत्सवात, व्हीआयपी दर्शनांच्या गदारोळात बाप्पाचे चरण दिसण्याइतकाही वेळ मिळत नाही भाविकांना. डीजेच्या दणदणाटात बाप्पाला ऐकू काय जाणार? त्याच्याशी भक्त सुखदु:खाच्या गप्पा कुठून मारणार?

Previous Post

टोपी संभालो दिनकरराव!

Next Post

घोषणांचा सुकाळ, पूर्ततेचा दुष्काळ!

Next Post
घोषणांचा सुकाळ, पूर्ततेचा दुष्काळ!

घोषणांचा सुकाळ, पूर्ततेचा दुष्काळ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.