• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

…आणि खिचडी साधली!

सागर कोपर्डेकर (पाकप्रयोग)

marmik by marmik
January 27, 2026
in खानपान
0
…आणि खिचडी साधली!

बॅक टु द बेसिक्स… हा नियम कुठल्याही क्षेत्रात सगळ्यांनाच सगळीकडे उपयोगी पडणारा आहे. २० – २५ वर्षे काम करूनही काही वेळा आम्हालाही हे करावंच लागतं. असं म्हणतात की एका बॅड पॅचमधून जात असताना सुनील गावसकर क्रिकेटशिक्षक कमल भांडारकरांकडे गेला. त्यांनी फक्त त्याची बॅटचा दांडा पकडण्याची ग्रिप नीट केली आणि तो परत
फॉर्मात आला.

२००६-०७ साली पहिल्यांदा अमेरिकेला गेल्यावर दररोज बर्गर पिझ्झा खाऊन कंटाळा आलेला. मग घरीच काहीतरी करू म्हणून सुरुवात झाली ती वरणभातापासून. मग थालीपीठ. मग खिचडी. मग धाडस करून एकदा पोहे, कांदा बटाटा रस्सा… जमलं! ह्या आणि इतर सगळ्या बेसिक रेसिपींसाठी उपयोगी आलं ते आईचं (संपदा कोपर्डेकर) पुस्तक ‘नववधूसाठी पाकक्रिया’.

मुळात आमच्या चवी डेव्हलप झाल्या ते तिच्या हातचे उत्कृष्ट पदार्थ खाऊन. त्यामुळे त्या उत्तम चवी आधीच मेंदूत रजिस्टर झालेल्या. आता एखादा पदार्थ केला की ही चव त्या चवीसारखी आहे की नाही ह्याचं मूल्यमापन आपोआपच होतं. सगळे पदार्थ, त्यांच्या पाककृती सोप्या करून लिहिलेल्या. त्यामुळे माझ्यासाठी आईचं पुस्तक म्हणजे कुठल्याही पाककृतीचा पाया. कधीही काही अडलं, आठवलं नाही की पुस्तक उघडा. अगदीच शंका आली तर तिला फोन करा. बॅक टु द बेसिक्स…

बरेच पदार्थ केले पण साबुदाणा खिचडी करायची राहून गेली होती. ‘ते एक वेगळं स्किल आहे, सगळ्यांना जमत नाही, साबुदाणा भिजत नाही, खिचडी गिच्च होते’ वगैरे कथा ऐकलेल्या. त्यामुळे भीती. पण २०१७-१८ साली मात्र जर्मनीत स्टुटगार्टच्या वास्तव्यात पहिल्यांदा धाडस केलं. पहिल्यांदा खिचडी गंडली कारण साबुदाणा भिजवताना वरती वाटीभर पाणी घातलं होतं. ओव्हर कॉन्फिडन्स. मग कान पकडून पुस्तक बघितलं. तरी शंका नको म्हणून आईला फोन लावला. बॅक टु द बेसिक्स!

तिनं सांगितलं की ‘साबुदाणा व्यवस्थित धुतल्यावर वरती करंगळीचं साधारण अर्धा पेर पाणी राहील अशा बेतानं पाणी घाल. रात्री झोपताना जरा उपसून घेऊन, सारखा करून घट्ट झाकून ठेव. तुझ्याकडे असलेला साबुदाणा ह्यावेळी कसा भिजतोय ते पाहून पुढच्या वेळी कमी-जास्त कर. सकाळी आधी मोठ्या डिशमध्ये पसरून घे म्हणजे गिच्च होणार नाही.’

जमली खिचडी!!!!

त्याच वास्तव्यात पुढे एकदा फोटोतली तिच्या पुस्तकातली ही बेसिक टिप वाचून जरा धाडस केलं. वाटण तयार करताना एक मोठी मूठ कोथिंबीरही घातली आणि ते वाटण, जिर्‍याच्या फोडणीत टाकण्याआधी, साबुदाण्याला व्यवस्थित लावून घेतलं. खिचडीला हिरवा रंग आला आणि कायच्या काय चव! तुफान हिट!

Previous Post

भाताचे प्राचीन मांसाहारी पदार्थ!

Next Post

बँकिंगमधला ट्रोजन हॉर्स!

Next Post
बँकिंगमधला ट्रोजन हॉर्स!

बँकिंगमधला ट्रोजन हॉर्स!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.