नव्या पॉलिसीवरून युजरमध्ये पसलेली नाराजी आणि प्रायव्हसीवरून संशयाचे वातावरण यामुळे व्हॉट्सअॅपने अखेर माघार घेतली आहे. तूर्ताल प्रायव्हसी पॉलिसी पुढे ढकलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे8 फेब्रुवारीपासून कोणत्याही युजरचे अकाऊंट बंद होणार नाही, अशी माहिती आज कंपनीच्यावतीने सोशल मिडियावरून देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील कोटय़वधी युजर्सना दिलासा मिळाला आहे.
पॉलिसीवरून माघार घेण्याच्या निर्णयाची घोषणा करताना व्हॉट्सअॅपने म्हटलंय, नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य करण्यासाठी दिलेली मुदत मागे घेत आहोत. 8 फेब्रुवारी 2021 रोजी कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद, डिलीट करण्यात येणार नाही. व्हॉट्सअॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करते, याविषयी स्पष्टता आणणार आहोत. चुकीची माहिती आणि युजरमध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 15 मे 2021 रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नवीन प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू युजरपर्यंत पोहोचणार आहोत, असे व्हॉट्सअॅपने आज स्पष्ट केले आहे.