बॉक्सर विनीतकुमार सिंह याची भूमिका असलेल्या ‘आधार’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर नुकताच दाखल झाला. भारतात आधारकार्ड सुरू झाले तेव्हा झारखंडमधल्या जमुआ गावातल्या फरसुआ या माणसाला पहिले कार्ड वितरीत करण्यात आले होते. हे कार्ड मिळवण्यासाठी सर्वात आधी त्याने धडपड केली होती. त्या फरसुआ या माणसाची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा 5 फेब्रुवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ‘पडोकखेप’ या बंगाली सिनेमाचे निर्माते सुमन घोष यांनी हा हिंदी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. गावात अफवा उठते की सलमान खान गावात येणार आहे. पण वास्तवात सरकारी अधिकारी आधारकार्ड योजनेच्या पाहणीसाठी गावात येतात. लोकांना वाटते की सरकारचे नाव सांगून कुणीतरी आपली माहिती गोळा करू पाहात आहेत.
या गोंधळात ट्रेलर सुरू होतो. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता जागी होऊ शकते. फरसुआ मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्ड मिळवायचंच ठरवतो. या सिनेमात रघुवीर यादव, सौरभ शुक्ला आणि संजय मिश्रा हेही धमाल आणतात. 2019 साली मुंबईच्या मामि फेस्टीवलमध्ये हा सिनेमा प्रथम दाखवण्यात आला होता.