• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत – विजय वडेट्टीवार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 8, 2021
in घडामोडी
0
बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत – विजय वडेट्टीवार

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत 2 हजार 297 कोटी 6 लाख रूपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरीत करण्यात आले होते . तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी 10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. या बाबतचा शासननिर्णय नुकताच काढण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

सौजन्य : सामना 

 

Previous Post

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अकरावा वर्धापन दिन साजरा

Next Post

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

Next Post
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान नाशिकला मिळाल्याचा आंनद – छगन भुजबळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.