अतिवृष्टीच्या तडाख्यात सावरत असलेल्या राज्यातील शेतकऱ्य़ांना अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. कांदा, हरभरा, मका, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका कोकणात आंबा व काजूच्या बागांना बसण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे आंब्यावर तुडतुडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राज्याच्या कृषी विभागातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता असल्याने राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्य़ांसाठी अलर्ट जारी केला आहे.
अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मुंबईसह पुणे, कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्याने कृषी विभागाने शेतकऱ्य़ांसाठी सूचना जारी केल्या आहेत.