देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षण बेस्ट सीएमच्या यादीत पहिल्या पाचमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. पहिल्या पाचमध्ये भाजपशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश झालेला नाही.
एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने सर्वेक्षण करत देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण? याबाबत केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली. या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यानंतर अरविंद केजरीवाल (दिल्ली), जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेशचे), पी. विजयन (केरळ)यांचा क्रमांक लागला आहे. पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत
राष्ट्रीय सरासरीत महाराष्ट्र, पश्चिम बंगालची बाजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकप्रियतेच्या सरासरीपेक्षा अधिक चांगलं काम करत असल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारसहित अन्य तीन भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे.