कलर्स या हिंदी वाहिनीवर 23 ऑगस्टपासून ‘नीमा डेंगझोप्पा’ आणि ‘थोडासा बादल, थोडासा पानी’ या दोन नव्या मालिका सुरू होत आहेत. या दोन वेगवेगळ्या मालिका असल्या तरी त्या दोन्ही मालिका दोन प्रेरणादायी स्त्रियांवर बेतलेल्या आहेत. या मालिका सोमवार ते शुक्रवार अनुक्रमे रात्री ९ वाजता व रात्री ९.३० वाजता पाहायला मिळतील. पहिल्या मालिकेत नीमा डेन्झोंग्पाची भूमिका सुरभी दास साकारणार आहे, तर काजल मुखर्जीच्या प्रेरणादायी भूमिकेत इशिता दत्त दिसणार आहे. पहिल्या मालिकेत सिक्कीममधील एक साधीभोळी मुलगी नीमा तिच्या जीवनातील प्रेम मिळवण्यासाठी तिचे मूळगाव व कुटुंबाला सोडून स्वप्ननगरी मुंबईमध्ये येते. एक परिपूर्ण व आनंदी जीवन असण्याची इच्छा असते, पण तिला माहित नसते की तिची स्वप्नं भंग पावणार आहेत. दुसऱ्या मालिकेत निरागस काजोलचा ‘परिपूर्ण’ विवाह जवळपास होणारच असतो. पण तिची सर्व स्वप्न रातोरात भंग पावतात. वडिलांच्या मृत्यूनंतर तिला कुटुंबाची कमावती व्यक्ती बनावे लागते. या दोन प्रेरणादायी व हृदयस्पर्शी कथांचे प्रमोशन करण्यासाठी कलर्सने प्रिंट, टेलिव्हिजन व डिजिटल व्यासपीठांवर राबवली जाणारी प्रबळ मार्केटिंग कॅम्पेन डिझाइन केली आहे.