लहान मुलांना खेळणीचे विशेष आकर्षण असते. आपल्याकडे कितीही खेळणी असली तरी आणखी खेळणी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र गरीब घरांतील मुलांचे काय? जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे त्यांना खेळणी कुठून मिळणार? अशाच गरीब, गरजू मुलांच्या चेहऱयावर आनंद फुलविण्यासाठी दक्षिण दिल्लीतील नजफगढ परिसरात अनोखी टॉय बँक सुरू झाली आहे. आपल्याकडे नको असलेल्या खेळण्या आपण तिथे दान करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे गरीब घरातली मुले या टॉय बँकेतून हवी ती खेळणी मोफत घेऊन जाऊ शकतात. या उपक्रमामुळे गरीब मुलांच्या चेहऱयावर आनंद फुलण्यासोबत खेळण्यांच्या पुनर्वापरामुळे पर्यावरणाचेदेखील संरक्षण होते. दिल्ली म्युनिसिपल काॅर्पेरेशनच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक होतेय.
सौजन्य- सामना