देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून गणल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशच्या तिरुपती तिरुमाला मंदिराच्या विश्वस्तांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंदिराच्या 2,937 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. याशिवाय अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत जागा मिळाल्यास त्यावर भव्य असे श्रीवारी मंदिर अथवा भजन मंदिर उभारण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. गडगंज श्रीमंती असलेल्या आंध्रच्या तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाची बैठक शनिवारी अध्यक्ष वाईवी सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मंदिराच्या महाअर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासोबतच अयोध्येत श्रीवारी मंदिर अथवा भाविकांसाठी मोठे सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला.
सौजन्य : दैनिक सामना