ऑल्ट बालाजी आणि झी फाईव्ह यांनी नुकत्याच आपल्या आगामी “द मैरिड वुमन” या वेबसिरीजची घोषणा केली आहे. ही वेब मालिका सेलिब्रेटी लेखिका मंजू कपूर यांच्या याच नावाच्या बेस्टसेलर नॉवेलवर आधारलेली आहे. नुकताच या शोचा प्रोमो दाखवला जाऊ लागला आहे. ही वेबसिरीज जाचक परंपरा मोडून महिलांच्या पायातल्या बेड्या उखडून फेकणारी आहे असा निर्मात्यांचा दावा आहे.
प्रेम म्हणजे नक्की काय हे दाखवणारी ही वेबसिरीज 8 मार्चपासून स्ट्रीम होणार आहे. या मालिकेत रिद्धि डोगरा, मोनिका डोगरा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत इमाद शाह, दिव्या शेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास आहुजा यांच्याही भूमिका पाहायला मिळतील. ऑल्ट बालाजी आणि झी फाईव्ह यांनी या वेब मालिकेचे पोस्टर आणि संवेदनशील व्हिडीओ नुकताच प्रकाशित केला आहे. यात खुद्द लेखिका मंजू कपूरही दिसतात. या वेब शोबद्दल त्यांनी त्यांचे मत या व्हिडीओत व्यक्त केलंय.