अभिनेत्री सारा खान, अर्जुन मन्हास आणि मीर सरवर अभिनित ‘द एरा ऑफ १९९०’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच पार पडला. या प्रसंगी दिग्दर्शक शाहिद म्हणाले, ‘बॉलिवुड उद्योगावर ऑनलाइन पायरसीचा लक्षणीय परिणाम झाला आहे. ऑनलाइन संगीत आणि चित्रपट पायरसीमुळे होणारे वार्षिक नुकसान चिंताजनक आहे. ऑनलाइन पायरसी किती व्यापक आहे, आणि त्याचा चित्रपट व्यवसायावर कसा परिणाम होतो हे मला प्रेक्षकांना दाखवून द्यायचे होते. ‘द एरा ऑफ १९९०’ सिनेमातून ऑनलाइन पायरसीचा घोटाळा बद्दल भाष्य करण्यासोबत सिनेमातून एक तरल प्रेमकथा उलगडत जाते. या सिनेमातून सिने टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. तीच्यासोबत या सिनेमातील अर्जुन मन्हास, मीर सरवर आणि इतर कलाकारांनी त्यांच्या चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. ‘द एरा ऑफ १९९०’ हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जगजीत सिंग आणि शाहिद काझमी यांनी शाहिद काझमी फिल्म्स आणि एचएस रिसम फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.