प्रसिद्धी आणि लोकप्रियता सर्वांनाच हवीहवीशी वाटते. कलाकारांना तर ती जास्तच गरजेची असते. सावधपणे लोकांशी संपर्क साधण्याची माध्यमे यापूर्वी नव्हती. पण आता ती भरपूर उपलब्ध झाली आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम येथे कलाकारांना आपली प्रायव्हसी राखून लोकांशी संपर्क साधता येतो, त्यांची मतं जाणून घेता येतात, त्यांचं प्रेम मिळवता येतं. सध्या इन्स्टाग्राम रीलचा ट्रेंड जोरात आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या इन्स्टा रीलच्या पेजवर आपापले व्हिडियो शेअर करत आहेत.
अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिनेही आपला पहिलावहिला रील व्हिडीओ नुकताच चाहत्यांशी शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये साडीमधील तिचा घायाळ करणारा अंदाज दिसतोय. तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षक लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. स्वानंदी सोशल मीडियावर आपली आई प्रिया बेर्डे यांच्यासोबतचेही फोटो कधी कधी पोस्ट करत असते. ती लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती किशोर बेळेकर यांच्या ‘रिस्पेक्ट’ सिनेमातून पदार्पण करते आहे. तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.