प्रो-पंजा लीगच्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना १३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील IGI स्टेडियमवर पार पडला. या पर्वाचे यश साजरे करण्यासाठी लीगचे सह संस्थापक आणि बॉलिवूड अभिनेता परविन डबास आणि प्रिती झांगियानी यांच्यासह बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी नुकतेच एकत्र आले होते. हे यश साजरे करण्यासाठी सुनील शेट्टी, परविन डबास आणि प्रिती झांगियानी एकत्र आले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आर्म रेसलिंग लिगला मिळत असलेल्या प्रतिसादावर चर्चा केली आणि भविष्यातील योजना मांडल्या.
सुनिल शेट्टी म्हणाले, मी लहानपणी शाळेच्या बेंचवर मित्रांसोबत पंजा लढवला आहे. शून्य पैशात खेळला जाणारा हा खेळ पैशात न मोजता येणारा आनंद मिळवून देतो. मी गेल्या २-३ वर्षांत हा खेळ जागतिक पातळीवर लोकप्रिय करण्यासाठी सह संस्थापकांची मेहनत अनुभवत आहे. लीगच्या प्राथमिक टप्प्यात प्रतिसाद मिळविण्यापासून तो टिकविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. आर्म रेसलिंगसाठी हे एक परिपूर्ण व्यासपीठ आहे. सोनी स्पोर्टसने या खेळाला चांगली प्रसिद्धी दिली आहे.
परविन डबास यांनी आपले विचार मांडताना एका वर्षात अनेक लीग आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही एका वर्षात एकच लीग आयोजित करून स्वस्थ बसणार नाहीत. आमच्याकडे वर्षभरात अनेक स्पर्धा रांगेत आहेत. पुढे जाऊन आम्ही आणखी स्पर्धांचे आयोजन करू. अर्थात, पुढील वाटचाल निश्चित करताना आम्ही सुनिल सरांचा अनुभव, त्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि खेळाची समज याचा विचार करू.
अखेरीस प्रीती झांहियानी म्हणाल्या, खेळातील किचकट नियम समजत नाहीत अशी अनेकदा महिला वर्गाची तक्रार असते, पण हा पंजा लढवणे हा खेळ अगदी लहान मुलांना देखील समजायला खूप सोपा आहे. स्त्रियांना आणि लहान मुलांना या खेळातील रोमांचक थरार अनुभवायला खूप मजा येईल. मी जेव्हा पंजा लीगमधील पहिला सामना पाहिला तेव्हा मला खूप आकर्षण वाटले. हा खेळ मनोरंगजक आहे. या खेळाला अधिक चांगला पाठिंबा मिळेल आणि यात महिलाही मागे नसतील असा विश्वास वाटते. महिला पंजा खेळात उतरल्यानंतर या लीगची अधिक वेगाने प्रगती होईल.
प्रो- पंजा लीगची पहिले पर्व सध्या नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरु आहे. गेले दहा दिवस कमालीच्या उत्साहात ही स्पर्धा येथे सुरु होती. अंतिम सामन्यात 30-28 च्या अंतिम स्कोअरसह, कोची केडीने किराक हैदराबादचा रोमांचक सामन्यात पराभव केला. मोठ्या चुरशीने ही स्पर्धा खेळली गेली मुंबई मसल, किराक हैदराबाद, लुधियाना लायन्स, रोहतक राऊडीज, बडोदा बादशाह, कोची केडीज अशा सहरा फ्रॅंचाईजींचे संघ विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावले होते. उपस्थित प्रेक्षकांमध्ये या वेगळ्या लीगबाबत कमालीचे आकर्षण असून, सोनी स्पोर्टस टेन ३ एसही आणि एचडी, तसेच फॅन कोड वरून होत असलेल्या थेट प्रक्षेपणालाही मोठा प्रतिसाद मिळाला.