राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकडे विशेष लक्ष देत मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी सुसज्ज रस्ते, कोस्टल रोड, उड्डाणपूल, नद्या पुनरुज्जीवित करणे, खाऱया पाण्यापासून गोडय़ा पाण्याचा प्रकल्प या पायाभूत–मूलभूत सुविधांसह पर्यटनावर भर देण्यात आला आहे. रस्ते, जलमार्ग वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
- मुंबईतील नेहरू सेंटरच्या अत्याधुनिकीकरणासाठी 10 कोटींची तरतूद
- मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संस्थेसाठी 5 कोटींची तरतूद
- पूर्व मुक्त महामार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव.
- दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱया पूर्क मुक्त मार्गाचे नामकरण ‘विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग’ करण्यात येत आहे.
पर्यटन विकासाला चालना,वरळीत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल
वरळीतील दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल उभारले जाणार आहे. त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
हेरिटेज वॉकला उत्स्फूर्त प्रतिसाद
विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मुंबईतील हेरिटेज वॉकला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात आले असून त्याला मुंबईकर तसेच मुंबई बाहेरून आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सायकलिंगसाठी स्वतंत्र मार्गिका
वांद्रे-कुर्ला संकुलातील सायकल मार्गावर बॅटरीवर चालणाऱया सायकलींना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींकरिता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सिंह–वाघ्र सफारी
मुंबई महानगराचे फुप्फुस असणाऱया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी व व्याघ्र सफारीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयात नवीन प्रजातींचे प्राणी आणणे, ई बस, ई-गोल्फ कार्ट, फुलपाखरू उद्यान इत्यादी अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
कोटय़वधीच्या पायाभूत सुविधा, पर्यटनावर भर
प्रकल्प मुंबईच्या विकासाचे
- शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर त्याला जोडणारा वरळी ते शिवडी हा चार पदरी उड्डाणपूल तीन वर्षांत बांधून पूर्ण होणार आहे.
- विरार ते अलिबाग या 126 किमीच्या मल्टीमॉडेल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम सुरू असून त्यासाठी 40 हजार कोटी खर्च येणार आहे.
- 15 किलोमीटरच्या ठाणे कोस्टल रोडची उभारणी सुरू असून त्यासाठी 1 हजार 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- मुंबई, ठाणे-नवी मुंबई जलमार्ग वाहतूक सुरू करणार. त्यासाठी चार ठिकाणी जेट्टी उभारणार. वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
- वांद्रे ते वर्सोवा या 177.17 किलोमीटरच्या सागरी सेतूचे काम सुरू झाले असून त्यासाठी 11 हजार 333 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर वांद्रे-वर्सोवा-विरार या सागरी सेतूचा प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे.
- गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा 6 हजार 600 कोटींचा प्रकल्प.
- मुंबई कोस्टल रोडचे काम 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.
- मुंबईतील 14 मेट्रो लाईन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत.
- रेल्वे रुळांवरील सात उड्डाणपूल बांधणार. बीकेसीतील सिटी पार्क ते माहीम नेचर पार्कपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी 98 कोटींचा खर्च अपेक्षित.
- वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा आणि मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 19 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्या पुनरुजीवित करण्याचे काम सुरू आहे.
- मनोरी येथे खाऱया पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प. डिसेंबर 2021 पूर्वी प्रकल्प अहवाल अपेक्षित आहे.
आरोग्य सेवा
- महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षांत 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये या वर्षी.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 11 शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रूपांतर. 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयांची स्थापना.
- सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपये तरतूद.
- ग्रँट कैद्यकीय महाकिद्यालय, मुंबई क बी. जे. कैद्यकीय महाकिद्यायालय, पुणे यांना अभिमत किद्यापीठाचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.
- कोरोना संसर्गातून बऱया झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुस, यकृत क मूत्रपिंडांच्या तसेच मानसिक तणाकाच्या तक्रारी उद्भकत असल्याने प्रत्येक जिल्हा रूग्णालयामध्ये क शहरी भागात कैद्यकीय महाकिद्यालयांमध्ये, ‘पोस्ट कोकिड काउन्सिलींग क ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्याचा निणऱय शासनाने घेतला आहे.
कृषी विकास
- 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱया व त्याची वेळेवर परतफेड करणाऱया शेतकऱयांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा.
- कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.
- शेतकऱयांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरिता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल.
- थकीत वीजबिलात शेतकऱयांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरिक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱयांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रुपये रक्कम माफ.
- शेतमालाच्या बाजारपेठा व मूल्यसाखळय़ांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प.
महिला व बालविकास
- ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.
- मोठय़ा शहरातील महिलांना प्रवासासाठी तेजस्विनी योजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करून देणार.
- महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय.
मनुष्यबळ विकास
- प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिह्यामध्ये अत्याधुनिक ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’ स्थापन करण्याचा निर्णय. एकूण 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित.
- महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार. दोन लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.
- सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘शिवराज्य सुंदर ग्राम अभियान’ राबविण्यात येणार. उत्कृष्ट कार्य करणाऱया ग्रामपंचायतींना पुरस्कार.
- सिंधुदुर्ग क रत्नागिरी या दोन जिह्यामध्ये नैसर्गिक साधनसामुग्रीकर आधारित पर्यटन,मत्स्य क्यकसाय क सूक्ष्म उद्योगांचा किकास करण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध’ ही पथदर्शी योजना राबकिण्याचा निणऱय घेण्यात आला आहे. या योजनेकरिता पुढील तीन कर्षांत दरकर्षी 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा
राज्याच्या स्थूल उत्पनात 8 टक्के घट झाली आहे.तरीही अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासाकर भर देण्यात आला.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांच्या, तसेच दोन किलोमीटर लांबीच्या दोन पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रूपये किंमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून ते डिसेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सागरी महामार्ग
मुंबई–गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रायगड जिह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिह्यातील रेडी अशा 540 किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाच्या कामासाठी 9 हजार 573 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पुणे चक्राकार मार्ग
परराज्यातून तसेच राज्यातील कोकण, मराठकाडा क उत्तर महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात प्रकासी क मालकाहतूक पुणे शहरातून होत असते. शहरातील काहतुकीकर त्याचा प्रचंड ताण येतो. तो टाळून इंधन तसेच प्रकासी केळेत बचत होण्याच्या दृष्टीने पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रूपये अंदाजित किंमतीच्या आठ पदरी, चक्राकार मार्गाचे काम हाती घेण्यात येईल.
ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची 40 हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेणार. 10 हजार किलोमीटर लांबीची कामे या वर्षी. 1 हजार 700 कोटी रुपये.
रेल्वे किकास
पुणे–नाशिक या मध्यम अतिजलद रेल्के मार्गाचे काम हाती घेण्यास महाकिकास आघाडी शासनाने नुकतीच मान्यता दिली. या रेल्वेमार्गाची प्रस्ताकित लांबी 235 किलोमीटर असून मार्गावर पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण 24 स्थानके प्रस्तावित आहेत. या मध्यम अतिजलद रेल्केची गती 200 किलोमीटर प्रतितास एकढी असणार आहे. प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 16 हजार 39 कोटी रुपये इतका राहील.
सौजन्य : दैनिक सामना