प्रेगा न्यूज प्रेग्नेन्सी डिटेक्टिव्ह कार्डने भारतीय बाजारपेठेत आपली एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे. महिलांना त्यांच्या मातृत्वाचा संपूर्ण प्रवास आनंदाने अनुभवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या नवीन श्रेणीचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. गरोदर माता आणि त्यांच्या बाळांचे आरोग्य सुरक्षित आणि निरोगी राहण्याकरिता वेळीच गर्भधारणा ओळखणे गरजेचे आहे. याविषयी संपुर्ण माहिती या कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. चुकीच्या तसेच अविश्वसनीय परिणाम देणार्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड उत्पादनांबद्दलही माहिती देण्यात आली तसेच त्याविषयी जनजागृती करण्यात आली. प्रेगा न्युजचे गर्भधारणेच्या तीन विविध टप्प्यांमध्ये उपयोगी ठरणारी सहा नवीन उत्पादने बाजारात दाखल आली आहेत.
गर्भधारणापूर्वीचा टप्पा
I) ओवा न्यूज ओव्हुलेशन डिटेक्शन किट हे सर्वात फर्टाईल असे पाच दिवस ओळखण्यात मदत करते ज्या दिवसांमध्ये गर्भधारणेची शक्यता अधिक असते.
II) गर्भधारणापूर्व टप्प्यासाठी प्रीगाहोप प्रीकॉनसेप्शन टॅब्लेट, आयर्न आणि फॉलीक ऍसिड गोळ्यांच्या मदतीने गर्भधारणेस मदत करते
III) गर्भधारणापूर्व टप्प्यातील प्रेगाहोप फर्टिलिटी लुब्रिकंट हे देखील जोडप्यांना गर्भधारणेस मदत करते.
गर्भधारणा किंवा प्री-नॅटल टप्पा
IV) प्रीगा न्यूज अॅडव्हान्स यात गर्भधारणा ओळखण्यासाठी कंटेनर किंवा ड्रॉपरची आवश्यकता भासत नाही आणि ते वापरण्यासही सोप आणि थंब ग्रिपसह येते. हे जलद गर्भधारणा चाचण्या करण्यास मदत करते.
V) प्रेगा न्यूज व्हॅल्यू या पॅकमध्ये २ प्रेगा न्यूज किट, २ युरीन कंटेनर आणि २ हातमोजे आहेत जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोयीस्कर होईल.
प्री-नेटल आणि पोस्ट प्रेग्नन्सी
VI) प्रेगाहॅपी अँटी स्ट्रेच मार्क क्रीम, हे गर्भधारणेदरम्यान आणि प्रसुतीनंतरच्या टप्प्यात स्ट्रेच मार्क्स आणि खाज कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.
ही संपूर्ण उत्पादन श्रेणी गर्भधारणेच्या आधी, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसुतीनंतरच्या टप्प्यात अशा संपूर्ण गर्भधारणेसंबंधी प्रक्रियेत नक्कीच फायदेशीर ठरते. प्रेगा न्यूजचे ‘प्रेग्नन्सी डिटेक्शन कार्ड’ आता ‘एक्सपर्ट प्रेग्नन्सी केअर सोल्युशन पार्टनर’ मध्ये रुपांतरीत झाले आहे. उत्पादनाचा विस्तार करण्याचा कंपनीचा निर्णय हा महिलांना गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वाचा ठरणार आहे. प्रेगा न्यूज हे संपुर्ण गर्भधारणा प्रक्रियेदरम्यान उपयुक्त ठरत असून त्याला ‘एक्सपर्ट प्रेग्नन्सी केअर सोल्युशन पार्टनर’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यासह ब्रँडने त्यांचा लोगो देखील बदलला आहे.
या मेगा इव्हेंटमध्ये किश्वर मर्चंट, अनिता हसनंदानी रेड्डी, माही विज, पूजा बॅनर्जी आणि इतरांसारख्या सुप्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी मॉम्ससह ६० हून अधिक प्रसिध्द माता उपस्थित होत्या. माता आणि बाळ या दोघांचेही आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच वेळीच गर्भधारणा ओळखण्याचे फायद्यांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अभिनेत्री सोनम कपूर म्हणाली, मातृत्व हा एक सुंदर प्रवास आहे आणि त्याची सुरुवात आपण गरोदर असल्यापासूनच होते. गर्भधारणेची अपेक्षा आणि त्याचा उत्साहा द्विगुणीत करण्यासाठी एक विश्वासार्ह आणि अचूक गर्भधारणा शोधण्याचे साधन असणे किती महत्त्वाचे आहे हे मला समजले. प्रेगा न्यूज गेल्या १३ वर्षांपासून असंख्य महिलांसाठी विश्वासार्ह गर्भधारणा शोधण्यास फायदेशीर ठरत आहे आणि मला याचा एक भाग असल्याचा आनंद होत आहे. इथे केवळ मातृत्वाचा आनंद साजरा केला जात नाही तर, महिलांना त्यांच्या आई होण्याच्या महत्त्वाच्या मार्गावर योग्य उत्पादने पुरवून हा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रेगा न्यूज या ब्रँडशी जोडले जाणे ही एक अभिमानाची बाब ठरत आहे जी गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ मातृत्वाच्या आनंदात सहभागी होते आहे . मी प्रेगा न्यूजला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
जॉय चॅटर्जी (असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटिंग, मॅनकाइंड फार्मा) म्हणाले की, प्रेगा न्यूजच्या मदतीने गर्भधारणा निश्चित करत लाखो महिलांनी यावर विश्वास दाखविला आहे. या विश्वासास आम्ही पात्र ठरल्याचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये गर्भधारणेच्या प्रवास अधिक सुखकर होण्याची खात्री या उत्पादनांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या नवीन उत्पादनांच्या विस्तारासह, आई होण्याचा प्रवास अविस्मरणीय रहावा असे आमचे ध्येय आहे.