• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 30, 2020
in घडामोडी
0
आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. इंजेक्शन टोचून घेत त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिल्याचे कळते आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डॉ. शीतल आमटे-करजगी यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.
विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
सौजन्य : दैनिक सामना 
Previous Post

हिंदुस्थानला छळण्याचा चीनचा आणखी एक क्रूर मार्ग, पुढल्यावर्षी काम सुरू करण्याचा प्रस्ताव

Next Post

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वनविभाग बिबट्याला जेरबंद केव्हा करणार? संतप्त नागरिकांचा सवाल

Next Post
तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वनविभाग बिबट्याला जेरबंद केव्हा करणार? संतप्त नागरिकांचा सवाल

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वनविभाग बिबट्याला जेरबंद केव्हा करणार? संतप्त नागरिकांचा सवाल

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.