तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. अनेक विरोधी पक्षांनीही या कायद्यांबाबत आक्षेप नोंदविला. याबाबत राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी विरोधी पक्षनेत्यांचे शिष्टमंडळ उद्या बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाकप नेते डी. राजा, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, द्रमुकचे नेते यांचा समावेश या शिष्टमंडळात असणार आहे. कोरोना गाईडलाईन्सनुसार पाच नेत्यांना भेटण्याची परवानगी राष्ट्रपती भवनाने दिली आहे. शेतकऱयांच्या कृषी कायद्यांविषयीचा आक्षेप, आंदोलन याबाबत राष्ट्रपतींनी दखल घ्यावी, अशी सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यासाठी ही भेट असल्याचे येचुरी यांनी सांगितले.
सौजन्य- सामना