कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षी अनेकांनी नोकरी गमावली. त्यापैकीच एक म्हणजे पिंपरीचा 28 वर्षीय रेवण शिंदे. लॉकडाऊनपूर्वी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून महिन्याकाठी जेमतेम 10 हजार रुपयांची कमाई करणारा रेवण आता लॉकडाऊनमध्ये यशस्वी उद्योजक बनला आहे. ’चालता बोलता’ चहा विपून महिन्याकाठी आता तो 2 लाख रुपयांची उलाढाल करतोय. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे नोकरीसाठी वणवण करणारा हाच रेवण आता कॉलेजतरुणांना रोजगाराची संधी देतोय.
चिंचवडच्या एका खासगी कंपनीत रेवण हा सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला होता. नोकरी गेल्यानंतर पश्चाताच करून काही साध्य होणार नाही हे त्याने ओळखले. त्याने पिंपरीत कॅफे 18 या नावाने छोटसं हॉटेल सुरू केलं. पण गिऱहाईकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक कॉर्पेरेट ऑफीस आहेत. ऑफिसमध्ये काम करणाऱया लोकांना टपरीवर चहा पिताना तो नेहमी पाहायचा. लॉकडाऊनमध्ये हे लोक काय करत असतील, असा प्रश्न त्याला पडला. त्यावरून त्याला ‘चालता बोलता चहा’ची कल्पना सुचली. ‘कॉल करा, 10 मिनिटांत चहा मागवा’ अशी जाहिरात करत त्याने चहा विकायला सुरुवात केली. सुरुवातीला नुकसान सहन करून काही ऑफिसमध्ये त्याने फुकटात चहा वाटला. हळूहळू नोकरदार त्याला चहाच्या ऑर्डर देऊ लागले. सध्या रेवण येथील 70 कॉर्पेरेट ऑफिसमध्ये दिवसाला 700 ते 800 कप चहा पुरवतो. महिन्याकाठी त्याची उलाढाल 2 लाखांहून अधिक आहे.
एकेकाळी नोकरीसाठी वणवण करणारा रेवण आता तरुणांना रोजगार देतोय. सध्या ऑनलाइन चहा पोहोचवण्यासाठी त्याच्याकडे 5 जणांची टिम काम करतेय. याशिवाय भविष्यात ‘चालता बोलता’ चहाचे नेटवर्प वाढवण्यासाठी तो कॉलेज तरुणांची मदत घेणार आहे. शिकता शिकता या तरुणांना रोजगार देण्याची त्याची इच्छा आहे. याशिवाय चहा आणि स्नॅक्स पुरवण्यासाठी लवकरच तो अॅपचीदेखील निर्मिती करणार आहे.
सौजन्य : दैनिक सामना