आपल्याकडे कोरोना परतीच्या वाटेवर असल्याने आपण सुटकेचा नि:श्वास टाकत असतानाच तिकडे इंग्लंडमध्ये नवीनच व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तिकडे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. सगळी इंटरनॅशनल उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. यामुळे अभिनेता संतोष जुवेकर तिकडेच अडकून पडलाय. लंडनमध्ये तो आपल्या ‘डेट भेट’चे शूटिंग करतोय.
लोकेश गुप्ते यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण होऊन तो आता परतणार होता, पण तेवढ्यात हे लफडं झालंय. त्यातल्या त्यात बरी गोष्ट ही की तो तिकडे आपल्या मित्राच्या घरी सुखरूप आहे. तेथे तो काय करतोय हे दाखवणारा एक व्हिडीओ त्यानेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. तिकडे तो मित्राच्या घरात झाडलोट करतोय. कॅप्शनमध्ये तो म्हणतो, लंडनमध्ये अडकून पडलोय. घरातच राहावे लागतेय. मला माझे घर आठवतेय. झाडलोट करायला मला मित्राने सांगितलेले नाही, पण घरात नुसतं बसून तरी काय करणार… संतोष जुवेकरच्या या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांना हसावं की रडावं तेच कळेनासं झालंय.