कलाकारही केवळ पोटापाण्यासाठी अभिनय करत असतात. बऱ्याच कलाकारांचे छंद वेगळेच असतात. थोडा रिकामा वेळ मिळाला की हे कलाकार छंदात बुडून जातात. लॉकडाऊनमुळे मिळालेला भरपूर वेळ अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने छंद जोपासण्यात घालवला. तिला चित्रकलेची भन्नाट आवड आहे. हीच आवड तिने लॉकडाऊनमध्ये जोपासली. सोशल मिडीयावर सक्रीय असणाऱ्या संस्कृतीने याच वेळेत आपण काय केले त्याचा व्हिडीओ आज इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. यात ती सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला हिचे वॉल पेंटिंग रेखाटताना दिसतेय.
संस्कृतीला चित्रकलेची आपली आवड अनेकदा विविध कलाकृतींमधून चाहत्यांसमोर सादर करते. त्यासाठी ती इन्स्ट्राग्रामचा वापर करते. काहीच दिवसांपूर्वी तिने प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मुनरो भिंतीवर साकारली होती. आता तिने सौंदर्याची खाण असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री मधुबाला हिचे वॉल पेंटिंग रेखाटले. संस्कृतीच्या या चित्रकारीवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. मुळातच संस्कृतीला मधुबाला खूप आवडते.