मनोरंजन विश्वात कोणती पोस्ट कधी प्रचंड व्हायरल होईल सांगणं कठीण आहे. अभिनेत्री, नृत्यांगना संस्कृती बालगुडे हीदेखील आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सध्या भलतीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने ब्रायडल लुक केला आहे. या फोटोंमध्ये ती सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल याच्यासोबत निवांत क्षणांमध्ये असल्याचे दिसतेय. संस्कृतीच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही जोडी यापूर्वी ‘धरला माझा हात’ या सोलो गाण्यातून प्रेक्षकांसमोर आली होती. आता या जोडीचे नवे फोटोशूट समोर आले आहे. यात हे दोघेही वेडिंग लूयुकमध्ये दिसत आहेत. पेस्टल थीम असलेल्या ज्वेलरी आणि लेहंग्यामध्ये संस्कृती खूपच छान दिसतेय यात वादच नाही. विशेष म्हणजे खुद्द सोनाली कुलकर्णी हिनेही तुम्ही एकत्र खूपच छान दिसत आहात अशी कमेंटही केल्यामुळे आगीत तेलच ओतले गेले आहे असेच म्हणावे लागेल.